X

Fact Check: निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणुकांची घोषणा केली नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. भारत च्या निवडणूक आयोगाने पंजाब आणि अन्य राज्यच्या विधानसभा निवडणुकांबद्दल कुठली घोषणा केली नाही. व्हायरल होत असलेल्या पीडीएफ चा स्क्रिनशॉट हा अन्य राज्यातील सरकारांच्या कार्यकाळ ची शेवटची तारीख आहे.

  • By Vishvas News
  • Updated: October 18, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर व्हिधानसभा निवडणुकांना घेऊन एक पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्ट सोबत एक पीडीएफ चा स्क्रीनशॉट देखील दिसतो. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि आगामी 2022 पंजाब च्या निवडणुकांच्या तारखा आयोगाद्वारे जारी करण्यात आल्या आहेत. असा दावा करण्यात येत आहे कि पंजाब मध्ये 27 मार्च 2022 रोजी पंजाब मध्ये निवडणूक होतील. सोबतच हि पोस्ट गोआ मध्ये 15 मार्च, मणिपुर 19 मार्च, उत्तराखंड 23 मार्च और उतर प्रदेश 14 मे 2022, ह्या तारखांचे सांगून व्हायरल होत आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा दावा केला आणि त्यात कळले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. तपासात आम्हाला कळले कि निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत पंजाब 2022 च्या निवडणुकांबद्दल कुठलीच घोषणा करण्यात आली नाही. 27 मार्च 2022 हि निवडणुकांची तारीख नसून, पण पंजाब सरकार च्या कार्यकाळाची शेवटची तारीख आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज “Punjab News Agency” ने व्हायरल पोस्ट शेअर करत लिहले: मुख्य चुनाव आयोग ने पंजाब सहित पांच राज्यों में चुनाव करवाने की घोषणा की है। अगले साल गोवा में 15 मार्च, मणिपुर में 19 मार्च और उत्तराखंड में 23 मार्च को, पंजाब में 27 मार्च को और उत्तर प्रदेश में 14 मई 2022 को विधान सभा के चुनाव होंगे।

पोस्ट सोबत एक पीडीएफ पेज देखील शेअर करण्यात येत आहे. पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

तपासाची सुरुवात विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी न्यूज सर्च द्वारे केली. आम्हाला संबंधित किवर्ड वापरून सर्च केल्यावर जगबानी च्या फेसबुक पेज वर एक बातमी मिळाली, व्हायरल पीडीएफ ला देखील आपण बातमीत बघू शकता. रिपोर्ट प्रमाणे, निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणुकांना घेऊन हि घोषणा केली नाही. निवडणूक आयोगाने एक नोटीस जारी केली आहे आणि एक अपील केली आहे कि कुठल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे तीन वर्ष एका जिल्ह्यात झाले असतील तर त्वरित त्यांची बदली करण्यात यावे. ह्यात सांगितले गेले आहे कि पंजाब सरकार चे कार्यकाल 27 मार्च 2022 रोजी पूर्ण होईल. पूर्ण बातमी इथे वाचा.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकांबद्दल आम्हाला कुठलीच बातमी मिळाली नाही, जर निवडणुकांची तारीख घोषित झाली असती तर ह्याबद्दल नक्कीच काही बातमी आली असती. पण आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही सरळ इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट बघितली. इथे आम्हाला विधानसभा निवडणुकांबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही पीडीएफ परत बघितली. आम्हाला कळले कि व्हायरल पीडीएफ मध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर आणि गोवा च्या सरकार चा कार्यकाल च्या शेवटच्या तारखेबद्दल सांगण्यात आले होते. आम्हाला व्हायरल होत असलेली पीडीएफ भारत निर्वाचन आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर देखील मिळाली. ह्या पीडीएफ च्या एका पेज चा स्क्रिनशॉट सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

अधिकृत माहिती साठी आम्ही निवडणूक आयोगाचे जॉईंट डायरेक्टर अनुज चांडक ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. निवडणूक आयोगाने अशी कुठलीच घोषणा केली नाही. पीडीएफ चा जो स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे तो अधिकाऱ्यांच्या बदलीला घेऊन एक सामान्य आदेश आहे. जर निवडणूक आयोगाने अशी कुठली घोषणा केली असती तर बातम्या नक्कीच आल्या त्याबद्दल निवडणूक आयोगाने एक प्रेस नोट देखील जारी केली असती. हि बातमी पूर्णपणे खोटी आहे.

आता आम्ही फेसबुक वर हि पोस्ट खोट्या दाव्यासह शेअर करणाऱ्या फेसबुक पेज Punjab News Agency ची सोशल स्कॅनिंग केली. त्यात आम्हाला कळले कि पेज चे 1,850 फॉलोवर्स आहे आणि हा ओइज 2 सितंबर 2018 रोजी बनवला गेला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. भारत च्या निवडणूक आयोगाने पंजाब आणि अन्य राज्यच्या विधानसभा निवडणुकांबद्दल कुठली घोषणा केली नाही. व्हायरल होत असलेल्या पीडीएफ चा स्क्रिनशॉट हा अन्य राज्यातील सरकारांच्या कार्यकाळ ची शेवटची तारीख आहे.

  • Claim Review : मुख्य चुनाव आयोग ने पंजाब सहित पांच राज्यों में चुनाव करवाने की घोषणा की है।
  • Claimed By : Punjab News Agency
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later