X

Fact Check: चित्रात दिसत असलेली नोट हि ५०० रुपयांची नवीन नोट नाही, व्हायरल दावा खोटा

विश्वास न्युज च्या तपासात ५०० ची नवीन नोट असा दावा करत असलेली पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. असली नोट सरकारने आणलेली नाही, ना तशी बातमी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: May 26, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया वर फिरत असल्याचे दिसले, चित्रात एक पाचशे रुपयांची नोट दिसते ज्यात भगवान श्री रामाचे चित्र दिसते. दावा करण्यात येत आहे कि हि भारतातील नवीन नोट आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Mamon Neog ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले आणि बंगाली मध्ये लिहले: “ভাৰতৰ নতুন পাঁচশ টকীয়া নোটত প্ৰভু শ্ৰী ৰাম চন্দ্ৰৰ ফটো।।
হয়নে/নহয় নাজানো।সছাঁনে বাৰু কথাটো।। কোনোবাই জানিলে ক’বচোন!!
জয় শ্ৰী ৰাম”

अनुवाद: भारताच्या नवीन पाचशे रुपयाच्या नोटेत प्रभू श्री राम चंद्राचा फोटो.
माहित नाही हे खरं आहे का? कोणाला माहित असेल तर कृपया कळवा!!
जय श्री राम

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी हि पाचशे ची नोट, नीट निरखून बघितली.

श्री रामाचे चित्र त्यावर आम्हाला एडिट करून लावल्यासारखे दिसले. आम्ही पहिले तर नोटेवर एक सिरीयल नंबर देखील दिला होता. सिरीयल नंबर होते, ‘9SS 436040’. आम्ही सिरीयल नंबर गूगल मध्ये टाकून शोधल्यावर आम्हाला हे चित्र shutterstock.com वर सापडले.

आता हे सिद्ध झाले होते कि हे चित्र खोटे आहे.

आम्हाला ऑनलाईन असे अँप्लिकेशन देखील सापडले ज्याने खोटी नोट कोणाच्या चेहऱ्यासह बनवता येते.

विश्वास न्यूज ने अशी कुठली मीडिया रिपोर्ट सापडते का ते देखील शोधले. आम्हाला अशी कुठलीच मीडिया रिपोर्ट सापडली नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही दैनिक जागरण चे डेप्युटी एडिटर मनीष मिश्रा ह्यांना संपर्क केला ज्यांनी हि पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

आम्ही आरबीआय च्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन ला देखील संपर्क केला आहे. त्यांचे उत्तर आल्यावर हा फॅक्ट चेक अपडेटव करण्यात येईल.

विश्वास न्यूज ने वरिष्ठ फायनान्स पत्रकार सोपान पांढरीपांडे ह्यांना संपर्क केला, त्यांनी देखील हे चित्र एडिटेड असल्याचे सांगितले, त्यांनी म्हंटले अशी बातमी पसरवणे पागलपणाचे आहे.

आम्ही फ्रीलांस फायनान्स पत्रकार आतिक शेख ह्यांना देखील संपर्क केला त्यांनी पण हि बातमी खोटी असल्याचे सांगितले. हि पोस्ट एडिटेड आहे असे ते म्हणाले.

शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने त्या फेसबुक यूजर चा तपास केला. आम्हाला कळले, Mamon Neog ह्यांना 538 लोकं फॉलो करतात, ते Jorhat, Assam चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्युज च्या तपासात ५०० ची नवीन नोट असा दावा करत असलेली पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. असली नोट सरकारने आणलेली नाही, ना तशी बातमी आहे.

  • Claim Review : भारताच्या नवीन पाचशे रुपयाच्या नोटेत प्रभू श्री राम चंद्राचा फोटो. माहित नाही हे खरं आहे का? कोणाला माहित असेल तर कृपया कळवा!! जय श्री राम
  • Claimed By : Mamon Neog
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later