X

Fact Check: आंध्र प्रदेश च्या धरणाचे चित्र उत्तर प्रदेश च्या भावनी धरणाच्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूजने व्हायरल चा तपास केला. व्हायरल झालेला फोटो आंध्र प्रदेशात बांधलेल्या श्रीशैलम धरणाचा असल्याचे आम्हाला समजले. जे आता खोट्या दाव्यासह शेअर कारण्यात येत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 26, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका धरणाचे चित्र व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे कि व्हायरल चित्र उत्तर प्रदेश च्या बुंदेलखंड शहरातील भावनी धरणाचे आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल चित्राचा तपास केला. तपासाच्या वेळी आम्हाला दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल चित्र आंध्र प्रदेश च्या श्रीशैलम धरणाचा आहे, जो आता चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक आणि ट्विटर वर यूजर्स #बुलन्दबुन्देलखण्ड सोबत एक चित्र शेअर करून दावा करण्यात येत आहे कि हा झाँसी च्या भावनी धरणाचा आहे. फेसबुक पेज Narendra Modi for PM ने व्हायरल चित्र शेअर करून #बुलन्दबुन्देलखण्ड कैप्शन सोबत हे चित्र शेअर केले.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल दाव्याच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही हा फोटो क्रॉप केला आणि गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे सर्च केला. ह्या वेळी आम्हाला व्हायरल चित्राची एक बातमी Deccan Chronicle च्या वेबसाईट वर 3 मे 2015 रोजी प्रकाशित झाल्याचा दिसला. दिलेल्या माहिती प्रमाणे, चित्र आंध्र प्रदेश च्या कृष्ण नदीवरच्या श्रीशैलम धरणाचा आहे. कृष्णा नदी बंगाल मध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश द्वारे जाते.

तपासादरम्यान, आम्हाला तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेबसाइटवर व्हायरल चित्र देखील सापडले. टूर पॅकेज विभागात व्हायरल चित्र शेअर करताना, आंध्र प्रदेशमध्ये बांधलेले श्रीशैलम धरण असे वर्णन केले आहे. तपासादरम्यान, आम्हाला श्रीशैलम धरणाच्या वेबसाइटवर व्हायरल चित्र देखील आढळले.

अधिक माहितीसाठी, आम्ही आमच्या सहयोगी वेबसाइट दैनिक जागरणचे ललितपूरचे रिपोर्टर संजीव बजाज यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेला फोटो भावनी धरणाचा नाही. भावनी धरणाची काही छायाचित्रेही त्यांनी आमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर हा व्हायरल दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासाअंती विश्वास न्यूजने बनावट पोस्ट करणाऱ्या युजरचे सोशल स्कॅनिंग केले. नरेंद्र मोदी हे फेसबुक पेज फॉर पीएम हे एका विचारसरणीने प्रभावित असल्याचे आम्हाला समजले. या फेसबुक पेजला तीन लाख २६ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने व्हायरल चा तपास केला. व्हायरल झालेला फोटो आंध्र प्रदेशात बांधलेल्या श्रीशैलम धरणाचा असल्याचे आम्हाला समजले. जे आता खोट्या दाव्यासह शेअर कारण्यात येत आहे.

  • Claim Review : #बुलन्द_बुन्देलखण्ड
  • Claimed By : Narendra Modi for PM
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later