X

Fact Check: मोबाईल टॉवर मध्ये आग लागल्याचा तीन वर्ष जुना व्हिडिओ खोट्या दाव्यांसह व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: January 5, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मध्ये सोशल मीडिया वर अंबानी आणि अडानी यांना घेऊन बरेच दुष्प्रकार सुरु असल्याचे दिसत आहेत. वेग-वेगळ्या दाव्यांची त्यांचे नावं पुढे येत आहे. असंच आता एका मोबाईल टॉवर चा जळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे कि जियो ला बॉयकॉट करण्यासाठी काही लोकांनी त्याच्या टॉवर ला आग लावली. काही लोकं या व्हिडिओ ला शेतकरी आंदोलनासोबत जोडून व्हायरल करत आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आम्हाला कळले कि देहरादूनच्या एका घाटी मध्ये झालेल्या एका जुन्या घटनेचा व्हिडिओ आता काही लोकं जियो आणि शेतकरी आंदोलनासोबत जोडून व्हायरल करत आहेत. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे कळले.

काय होत आहे व्हायरल?
Voice of people नावाच्या एका फेसबुक पेज ने ३० डिसेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला कि जियो ला बॉयकॉट करण्यासाठी काही लोकांनी त्याच्या टॉवर ला आग लावली. दावा केला गेले कि, ‘Jio ki boycott per logon ne kiya jio tower ki ye halat

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ ला नीट निरखून बघितले. त्यावर डाव्या बाजूला Tik Tok लिहलेले दिसले. पण टिकटॉक शेतकरी आंदोलन सुरु झाले त्याधीपासूनच भारतात बॅन झाले आहे. आता हे स्पष्ट होते कि हा जुना व्हिडिओ आहे याचा शेतकरी आंदोलनासोबत काहीच संबंध नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही रिव्हर्स इमेज टूल ची मदत घेतली आणि ओरिजिनल सोर्स पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओ ला InVID टूल मध्ये अपलोड केल्यावर आम्हाला बरेच स्क्रीनशॉट मिळाले त्यांना आम्ही रिव्हर्स इमेज टूल मध्ये टाकून सर्च केले. खूप तपास केल्यावर आम्हाला हे छायाचित्र अमर उजाला च्या वेबसाईट वर एका बातमीत मिळाले. २८ जून २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीत सांगितले गेले होते कि देहरादून च्या घराच्या गच्चीवर लावलेल्या मोबाईल टॉवर ला अचानक आग लागली. हि घटना शक्ती कुमार मेहता यांच्या घराच्या गच्ची वर लागली. पूर्ण बातमी तुम्ही इथे वाचू शकता.

सर्च च्या वेळी आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ न्‍यूज18 च्या वेबसाईट वर मिळाला. याला २९ जून २०१७ रोजी अपलोड करण्यात आले होते. हे तुम्ही इथे बघू शकता.
या नंतर विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ आणि ओरिजिनल व्हिडिओ ची तुलना केली. आम्हाला यात बऱ्याच सारख्या गोष्टी मिळाल्या. एक सगळ्यात मोठी सारखी गोष्टं म्हणजे व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या गच्ची चे रेलिंग चे डिजाइन एकच होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही विश्वास न्यूज च्या देहरादून स्थित दैनिक जागरण च्या ऑनलाईन स्‍टेट डेस्‍क चे प्रभारी सुनील नेगी यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल व्हिडिओ मध्ये दाखवलेली घटना बरीच जुनी आहे. २८ जून २०१७ च्या सकाळी देहरादून च्या जीएमएस रोड वर असलेल्या अंकितपुरम कॉलोनी मध्ये शक्ती कुमार मेहता नावाच्या व्यक्ती च्या घरच्या गच्चीवर असलेल्या मोबाईल टॉवर ला आग लागली. हा तेव्हाच्या घटनेचा व्हिडिओ आहे.

सुनील नेगी यांनि आम्हाला जून २०१७ मधली प्रकाशित बातमी देखील पाठवली. हि बातमी तुम्ही इथे वाचू शकता.

तपासाच्या शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला असे कळले कि Voice of people हा पेज 15 दिसंबर 2020 रोजी बनवला गेला आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मोबाइल टॉवर ला लागलेल्या आगेचा व्हिडिओ जुना असल्याचे समजले. याचा शेतकरी आंदोलनासोबत काही संबंध नाही.

  • Claim Review : जियो टॉवर ला शेतकरी आंदोलनात आग लागली
  • Claimed By : Voice of People
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later