X

Fact Check: रिलायन्स जियो नाही करत आहे फेडरल बँक चे अधिग्रहण, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. रिलायन्स स्पोक्सपर्सन ने विश्वास न्यूज सोबत बोलताना देखील सांगितले कि हे पत्र फक्त एक अफवा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: September 17, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक लेटर व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि रिलायन्स जियो फेडरल बँक चे अधिग्रहण करत आहे. हि डील 73616 कोटी मध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. रिलायन्स स्पोक्सपर्सन ने देखील विश्वास न्यूज सोबत बोलताना ह्या दाव्याचे खंडन केले आहे. कॉर्पोरेट फॅमिलीज ला बँक चा मालकी हक्क मिळवण्याची अनुमती नसते असे त्यांनी सांगितले.

काय होत आहे व्हायरल?
व्हाट्सअँपवर व्हायरल होत असलेल्या एका पत्रात लिहले आहे: MEDIA RELEASE: RELIANCE JIO TO ACQUIRE FEDERAL BANK AT 10 BILLION USD
VALUATION; JIO TO ENTER BANKING INDUSTRY WITH THE ACQUISITION; Mumbai, September 13, 2021: Reliance Jio Infocomm Ltd (“RJIL”) announced today that it has concluded the definitive Agreement entered with Federal Bank Limited for acquisition of it’s bank. RJIL has paid total consideration of Rs. 73,616 crores (inclusive of taxes) to Federal Bank and has assumed ownership. With this trading of information the Federal Bank will be wholly-owned subsidiary of Reliane Jio Infocomm Ltd(“RJIL”)

तपास:
ह्या पोस्ट चा तपास आम्ही फेडरल बँक च्या वेबसाईट पासून केला आणि त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील तपासले. आम्हाला कुठेच अशी बातमी मिळाली नाही.

रिलायन्स जियो च्या वेबसाईट आणि सोशल मीडिया हॅन्डल्स वर देखील अशी कुठली बातमी मिळाली नाही.
ह्या लेटर च्या वर प्रेस रिलीज असे लिहले आहे. मीडिया चा एक भाग असल्या कारणाने, विश्वास न्यूज च्या बिजनेस टीम ला जियो चे सगळे प्रेस रिलीज मिळतात. आम्ही आमचा मेल बॉक्स देखील तपासला आम्हाला जियो संबंधी अशी कुठलीच प्रेस रिलीज मिळाली नाही. रिलायन्स तर्फे आलेली शेवटची प्रेस रिलीज सरकारी रिफॉर्म्स बद्दल होती. ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही इथे बघू शकता.

ह्यानंतर विश्वास न्यूज ने रिलायन्स च्या प्रवक्ता ला संपर्क केले. आमच्या सोबत बोलताना ते म्हणाले, “हे लेटर खोटे आहे. आरबीआई च्या निर्देशांप्रमाणे, जियो किंवा कुठली पण कॉर्पोरेट कंपनी बँकेचे अधिग्रहण करू शकत नाही.
ह्या दाव्याला सोशल मीडिया वर Kanika Devani नावाच्या ट्विटर यूजर ने शेअर केले. यूजर चे 18 फॉलोवर आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. रिलायन्स स्पोक्सपर्सन ने विश्वास न्यूज सोबत बोलताना देखील सांगितले कि हे पत्र फक्त एक अफवा आहे.

  • Claim Review : Reliance Jio acquires Federal Bank
  • Claimed By : Kanika Devani
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later