X

Fact check: C60 कमांडो जल्लोष करतानाचा व्हिडिओ आताचा नाही, जुना आहे

C60 कमांडो चा जल्लोष करतानाच व्हिडिओ आताचा नाही, जुना आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 18, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे ज्यामध्ये C60 कमांडो जल्लोष करताना दिसतात. कुख्यात नक्षलवादी, मिलिंद तेलतुंबडे आणि इतर २६ नक्षलवाद्यांच्या चकमकीनंतर C60 कमांडोंनी केलेला हा जल्लोष असल्याचा दावा पोस्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की व्हायरल व्हिडिओचा सध्याच्या घटनेशी संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक वापरकर्त्या सूरज लोहारने 30 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि मराठीत लिहिले: कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे आणि
२६ लाल माकडांचा एन्काऊंटर अनिवार्य महाराष्ट्र पोलीस दलातील C60 कमांडो जल्लोषी स्वागत😎🎉. C60 #गडचिरोली

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

हाच दावा जम्मू-काश्मीर भाजपचे कार्यकारिणी सदस्य रमण सुरी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

पास:

विश्वास न्यूजने रमण सुरी यांच्या पोस्टवरील कंमेंट्स बघून तपास सुरू केला. पोस्टला 33 रिट्विट्स आणि 187 लाईक्स मिळाले. एका यूजरने लिहिले, “This is old video. This was of May 2021, when Maharashtra police killed 13 naxals.

विश्वास न्यूजसाठी हा एक संकेत होता आणि म्हणून आम्ही तेच कीवर्ड पुढील तपासण्यासाठी वापरले. आम्ही ‘May 2021 C60 commandos’ हे कीवर्ड वापरून तपास सुरु केला.

आम्हाला 22 मे 2021 रोजी ‘ETV भारत‘ वेबसाइटवर पोस्ट केलेला नेमका तोच व्हिडिओ सापडला. बातमीत म्हटले आहे की, “After a successful encounter operation against banned outfits in Maharashtra’s Gadchiroli, C-60 commandos were welcomed by officials at police district headquarters with the ‘band baaja’.”

आम्हाला गडचिरोली पोलिसांचे एक ट्विट देखील सापडले ज्यामध्ये म्हटले आहे की व्हिडिओ सध्याच्या घटनेशी संबंधित नाही.

आम्हाला गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांचे ट्विट देखील सापडले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्याने विश्वास न्यूजला सांगितले की हा व्हिडिओ अलीकडील नाही आणि सध्याच्या चकमकीशी संबंधित नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पोस्ट शेअर केलेल्या ट्विटर अकाउंट चा बॅकग्राऊंड चेक केला. रमणसूरी हे भाजप जम्मू-काश्मीरचे कार्यकारिणी सदस्य आहेत. यूजर 1,373 लोक फॉलो करतात आणि 1,431 लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: C60 कमांडो चा जल्लोष करतानाच व्हिडिओ आताचा नाही, जुना आहे.

  • Claim Review : Warm welcome to team of C60 commandos who wiped out most of the top leadership of Left-Wing Naxals in Gadchiroli, Maharashtra.
  • Claimed By : Raman Suri
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later