X

संघाच्या स्वयंसेवकांचे रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटल्या वितरीत करणारे छायाचित्र दिशाभूल करणार्‍या दाव्यांसह होत आहे व्हायरल

हे छायाचित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचेच आहे, पण या छायाचित्रावर केलेले दावे दिशाभूल करणारे आहेत.या छायाचित्रांत स्वयंसेवक रेल्वे स्टेशनवर पाणी विनामूल्य वाटत असून त्यासाठी त्यांनी कुठलेही मूल्य आकारले नाही.

  • By Vishvas News
  • Updated: May 13, 2020

विश्वास न्यूज, नवी दिल्ली: नुकतेच एका ट्विटर हँडलवर एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र शेअर केले गेले. या पोस्ट द्वारे असा दावा करण्यात आला कि संघाचे स्वयंसेवक रेल्वे स्टेशनवर वाढीव दरात लोकांना पिण्याचे पाणी विकत आहेत.

दावा

@Loneranger9new या ट्विटर हॅन्डल नि संघाच्या कार्यकर्त्यांचे एक छायाचित्र खालील मजकुरासह शेअर केले:
“Sanghi chaddis are selling drinking water at exorbitant rates at railway stations to make fast bucks. Shame on these sanghi leeches who posses zero humanity and ethics.

BanRSS #BanRSSHindutvaTerrorists”

या ट्विट ला १७५० लाईक्स आणि ६०० रीट्वीट मिळाले होते.

तपास:

विश्वास न्यूज ला हेच छायाचित्र विविध ट्विटर हॅन्डल वर वेगळ्या मजकुरासह यापुर्वी देखील आढळले होते.
या ट्विटर हॅन्डल प्रमाणे, हा फोटो संघाच्याच कार्यकर्त्यांचा आहे पण ते त्यात सेवा देत असल्याचे आणि विनामूल्य पाणी वाटत असल्याचा दावा केला आहे.  

पण @Loneranger9new ने केलेला दावा याच्या अगदी उलट आहे.

विश्वास न्यूज च्या तपासादरम्यान असे आढळले कि @Loneranger9new हे ट्विटर हॅन्डल सस्पेंड झाले आहे.

पण अश्याच मजकुरासह फेसबुक वर देखील काही लोकांनी हे छायाचित्र शेअर केले आहे.

सुप्रियो सरकार यांची फेसबुक वरची पोस्ट खालील प्रमाणे:

‘Sanghi chaddis are selling drinking water at exorbitant rates at railway stations to make fast bucks. Shame on these sanghi leeches who posses zero humanity and ethics.’

या पोस्ट ला आता पर्यंत ७७ वेळा शेअर केल्या गेले आहे.

तसेच, अजून एका फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीने तेच छायाचित्र खालील मजकुरासह पोस्ट केले:

“Sanghi chaddis are selling drinking water at exorbitant rates at railway stations to make fast bucks. Shame on these sanghi leeches who posses zero humanity and ethics. BanRSS #BanRSS_😡”

कस्तुरी भट यांनी देखील ही पोस्ट शेअर केली:
“Sales man Chaddis..RSS sales man r selling bottled water at premium in railway stations”

हे छायाचित्र या मजकुरासह व्हायरल जाण्याआधी बऱ्याच ट्विटर प्रोफाईल्स वर आढळले त्यापैकी काही खालील प्रमाणे:

@iRupND यांनी हे छायाचित्र खालील मजकुरासोबत शेअर केले:
“RSS swamsevaks providing water to migrant workers going back to their homes in trains”

तसेच राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी देखील हेच छायाचित्र शेअर केले, या मजकुरासह:
“RSS Swayam Sevaks, at Railway Station, distributing water to migrant workers going back to their home in train.”

@friendsofrss यांनी @Loneranger9new नि केलेल्या ट्विट ला रिट्विट करून खालील उत्तर देखील दिले:
“झूठ का चेहरा नही होता। बोलो और निकल लो। कौन चेक करने जा रहा है।

@RahulGandhi
 ने जो RSS के ख़िलाफ़ जो झूठ बोला था उसके लिए वो कोर्ट के चक्कर लगा रहें हैं।

इसलिए जब आपके प्रधानमंत्री उम्मीदवार झूठ बोल सकते हैं तो पार्टी कार्यकर्ताओं को तो उनका अनुसरण करना ही पड़ेगा।”

इतक्या ट्विटर हॅन्डल वर शेअर केलेल्या ह्याच छायाचित्रावरून आता हे नक्की होते कि, चित्रात संघाचे स्वयंसेवकच आहेत. विश्वास न्यूज ने नंतर हे छायाचित्र, काही स्वयंसेवकांना पाठवले, त्यातून असे कळले कि हे छायाचित्र मोरबी, गुजरात चे आहे. राजकोटच्या जवळ असलेले हे गाव.
विश्वास न्युज ने नंतर राजकोट चे सहविभाग कार्यवाह, विपुल अघारा यांच्या सोबत संवाद साधला, त्यांनी असे स्पष्ट केले कि हे छायाचित्र मोरबी या गावाच्या रेल्वे स्टेशन वर घेतलेले आहे. पुढे यांनी असेहि स्पष्ट केले, कि हे छायाचित्र ८ मे रोजी घेण्यात आले, जेव्हा दोन श्रमिक स्पेशल ट्रेन रेल्वे स्टेशन वरून सुटल्या. त्या ट्रेन मध्ये आपल्या गावी परतणाऱ्या मजुरांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी पाण्याची बाटली, अन्न आणि ताक विनामूल्य प्रवासासाठी वाटले.

२५०० मजूर या ट्रेन नि आपल्या गावी परतले. ४५ संघाचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन वर या मजुरांना मदत करण्यास उपस्थित होते असे देखील विपुल अघारा यांनी सांगितले. पुढे ते म्हणालेत कि, ८, ९ आणि १० तारखेला कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन वर सेवा दिली त्यानंतर ११ तारखॆला कुठलीही श्रमिक स्पेशल ट्रेन नव्हती. श्रमिक स्पेशल ट्रेन जेव्हा सुटतात तेव्हा स्वयंसेवक तिथे  आपली सेवा विनामूल्य देतात. विपुल अधारा यांनी त्या दिवशी घेतलेले स्टेशन वरचे छायाचित्र आणि व्हिडीओ देखील विश्वास न्युज ला पाठवले जे शेअर केलेल्या छायाचित्रासोबत अगदी मिळते जुळते आहे.

@Loneranger9new या ट्विटर हॅन्डल चे तपास करताना असे आढळले कि सस्पेंड होण्यापूर्वी, याचे ८,४९१ फोल्लोर्वस होते, तसेच हे हॅन्डल ७,०६७ लोकांना फोल्लो करत होते. फेब्रुवारी २०१९ रोजी, दोन द सस्पेंड झाल्यानंतर हे त्या युजरनेम चे तिसरे अकाउंट होते.

निष्कर्ष: हे छायाचित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचेच आहे, पण या छायाचित्रावर केलेले दावे दिशाभूल करणारे आहेत.या छायाचित्रांत स्वयंसेवक रेल्वे स्टेशनवर पाणी विनामूल्य वाटत असून त्यासाठी त्यांनी कुठलेही मूल्य आकारले नाही.

  • Claim Review : Sales man Chaddis..RSS sales men r selling bottled water at premium in railway stations
  • Claimed By : Kasturi Bhatt
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later