X

Fact Check: स्वामी विवेकानंद क्रिकेट खेळत असल्याचे व्हायरल चित्र एडिटेड आहे

हेडली व्हेरिटी ह्यांचे एडिटेड चित्र स्वामी विवेकानंदांच्या नावावर होत आहे व्हायरल. व्हायरल चित्र मॉर्फ केलेले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: December 6, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): स्टेडियममध्ये क्रिकेट खेळताना एका व्यक्तीचा, गोलंदाजी करतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. असा दावा करण्यात येत आहे की 1880 च्या दशकाच्या मध्यात कधीतरी ईडन गार्डन्सवर झालेल्या एका सामन्यात नरेंद्रनाथ दत्ताने सात विकेट घेतल्या होत्या. असा दावा केला जात आहे की त्याने क्रिकेटचा न खेळता, स्वामी विवेकानंद या नावाने संन्यासी बनला. विश्वास न्यूजने ह्या दाव्याचा तपास केला आणि त्यात असे समजले की हे चित्र मॉर्फ केलेले आहे आणि चित्रातील व्यक्ती स्वामी विवेकानंद नाहीत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक युजरMrk Kumaran यांनी 1 डिसेंबर रोजी फेसबुकवर व्हायरल चित्र पोस्ट केले.
चित्रावर लिहिले होते: It was sometime in the mid 1880s. Eden Gardens was around 20 years old, and hosting a match between Calcutta Cricket Club (CCC), the then occupants of the ground, and Town Club. Representing the latter, one Narendranath Datta took seven wickets. He did not pursue cricket, but went on to become a global figure known by another name: Swami Vivekanand.

अनुवाद: हे चित्र 1880 च्या मध्यात कधीतरीचे आहे. ईडन गार्डन्स सुमारे 20 वर्षे जुने होते, आणि कलकत्ता क्रिकेट क्लब (CCC), त्यावेळचे मैदान आणि टाऊन क्लब यांच्यातील सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. एकाचे प्रतिनिधित्व करताना, नरेंद्रनाथ दत्ताने सात विकेट घेतल्या. त्यांनी क्रिकेटचा पाठपुरावा केला नाही, परंतु ते स्वामी विवेकानंद या दुसर्‍या नावाने ओळखले जाणारे जागतिक व्यक्तिमत्त्व बनले.

हा पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात साध्य गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केले. आम्हाला ओरिजिनल चित्र गेटी इमेजस च्या वेबसाईट वर सापडला.

ह्या चित्राच्या मजकुरात लिहले होते: Yorkshire cricketer Hedley Verity (1905 – 1943) in action, circa 1940. (Photo by Hulton Archive/Getty Images)

अनुवाद: यॉर्कशायरचा क्रिकेटर हेडली व्हेरीटी (1905 – 1943), 1940 च्या सुमारास.

आम्ही त्यानंतर साधे कीवर्ड सर्च केले, आम्हाला हे चित्र ESPN Cric Info च्या वेबसाईट वर सापडले. इथे आम्हाला ह्या मॅच चे अजून काही चित्र ह्या वेबसाईट वर सापडले.

विश्वास न्यूज ने तपासाच्या शेवटच्या टप्प्यात सच्चीदानंद शेवडे, जे एक लेखक, अभ्यासक आणि वक्ता आहेत त्यांना संपर्क केला. शेवडे ह्यांनी स्वामी विवेकानंदांवर बरेच व्याख्यान देखील दिले आहेत.

त्यांनी सांगितले, “स्वामी विवेकानंद हे क्रिकेट खेळात असल्याची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. जर का ते खेळात जरी असतील तरी 1880 मध्ये ते सोळा वर्षांचे असतील. तरी हे चित्र स्वामी विवेकानंद ह्यांचे नाही. हे एडिटेड आहे. हे चित्र हेडली व्हेरिटी ह्यांचे आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने Mrk Kumaran, ज्यांनी व्हायरल चित्र शेअर केले, ह्या प्रोफाइल चे बॅकग्राऊंड चेक केले. त्यात कळले कि ते अडूर चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: हेडली व्हेरिटी ह्यांचे एडिटेड चित्र स्वामी विवेकानंदांच्या नावावर होत आहे व्हायरल. व्हायरल चित्र मॉर्फ केलेले आहे.

  • Claim Review : It was sometime in the mid 1880s. Eden Gardens was around 20 years old, and hosting a match between Calcutta Cricket Club (CCC), the then occupants of the ground, and Town Club. Representing the latter, one Narendranath Datta took seven wickets. He did not pursue cricket, but went on to become a global figure known by another name: Swami Vivekanand.
  • Claimed By : Mrk Kumaran
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later