
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): दिल्ली मध्ये २६ जानेवारी रोजी शेतकरी रॅली मध्ये झालेल्या उपद्रवा नंतर सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात काही पोलीस एका माणसासोबत गैरवर्तन करताना दिसतात. हे छायाचित्र आताचे सांगून लोकं शेअर करत आहेत. विश्वास न्यूज ने पोस्ट चा तपास केल्यावर समजले कि हे छायाचित्र दिल्ली मध्ये झालेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅली चे नसून, २०१३ मध्ये झालेल्या शीख प्रोटेस्ट चे आहे, ज्यात शीख समुदाय आणि पोलिसांमध्ये झडप झाली. आता हे छायाचित्र मुद्दाम चुकीच्या दाव्यांसह व्हायरल करण्यात येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Bashir Chaudhary ने व्हायरल छायाचित्र अपलोड करून लिहले, “This picture will shake the foundations of #India #JaagPunjabiJaag #IndianRepublicBlackDay #TractorMarchDelhi #KisanTractorRally #FarmersProtest“
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
आपला तपास सुरूकरण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून हे छायाचित्र शोधण्यास सुरुवात केली. सर्च च्या वेळी आम्हाला हे छायाचित्र dailymail च्या वेबसाईट वर ५ मे २०१३ रोजी पब्लिश केलेल्या एका आर्टिकल मध्ये सापडले. बातमीत आम्हाला हेच छायाचित्र सापडले जे आताचे सांगून व्हायरल करण्यात येत आहे. बातमीत दिलेल्या माहितीनुसार, शिखांचा एक समूह रविवार १९८४ च्या शीख विरोधी दंग्यांमध्ये काँग्रेस नेता सज्जन कुमार यांची सुटका झाल्याचे विरोध करण्यास पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या घराकडे मार्च करत गेले. पूर्ण बातमी इथे बघा.
गेटी इमेजेस वर देखील आम्हाला हे व्हायरल छायाचित्र दिसले, छायाचित्र ५ मे २०१३ चे सांगून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा दिल्ली मध्ये शिखांनी १९८४ च्या दंग्यांचे दोषी सज्जन कुमार यांना मुक्त करण्याच्या विरोधात प्रोटेस्ट केले होते, त्याच दरम्यान पोलीस आणि प्रदर्शनकारी यांच्यात झडप झाली. आम्हाला छायाचित्र काढणाऱ्या फोटोग्राफर चे नाव, शेखर यादव’ असल्याचे या छायाचित्राद्वारे समजले.
विश्वास न्यूज ने छायाचित्र काढणारे फोटोग्राफर शेखर यादव यांना संपर्क केला आणि त्यांच्यासोबत हा व्हायरल दावा शेअर केला, यादव यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र खूप जुने आहे.
आता आम्ही खोटी पोस्ट शेअर करणारे ट्विटर यूजर, Bashir Chaudhary यांची सोशल स्कँनिंग केली. त्यात आम्हाला कळले कि यूजर हे पाकिस्तान मधील इस्लामाबाद सोबत संबंधित आहेत. तसेच यूजर ला ६८७७ लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष:
निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेले छायाचित्र दिल्ली मध्ये नुकत्याच झालेल्या ट्रॅक्टर रॅली चे नाही, २०१३ मध्ये झालेल्या शीख समुदाय च्या प्रोटेस्ट चे आहे, ज्याला आता खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.