X

Fact check: युक्रेनच्या राष्ट्रपतींचे जुने चित्र आताच्या युक्रेनच्या स्तिथी सोबत जोडून व्हायरल

युक्रेन च्या राष्ट्रपती, व्होलोडिमिर झेलेन्स्की ज्यांचे चित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, ते आताचे नसून 2021 मधील आहे.

  • By Vishvas News
  • Updated: February 28, 2022

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): 24 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात मॉस्कोने युरोपियन राष्ट्रावर सर्वात मोठा हल्ला चढवल्यानंतर गुरुवारी युक्रेनच्या सैन्याने रशियन आक्रमकांशी तिन्ही बाजूंनी मुकाबला केला.या लढाईच्या दरम्यान, त्याबद्दलची चुकीची माहिती देखील व्हायरल होत आहे.
अशाच एका प्रकरणात, विश्वास न्यूजला https://www.abplive.com/ वर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचे जुने फोटो शेअर केले जात असल्याचे आढळले जे अलीकडील दाव्यांसह व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला विविध सोशल मीडिया वर पोस्ट्स दिसले ज्यात युक्रेन च्या राष्ट्रपतींचे काही चित्र मिलिटरी च्या वेशात व्हायरल होत आहे. लोकं दावा करत आहेत कि ते जवानांसोबत देशाचे रक्षण करण्यास उतरले आहे.

Nasser F Ayuob ह्यांनी फेसबुक वर चित्र शेअर केले.

https://www.facebook.com/516143105/posts/10158621704458106/?d=n

तसेच एका फेसबुक यूजर ने देखील चित्र शेअर केले.

https://www.facebook.com/107884398208006/photos/a.109408194722293/246317571031354/?type=3

ट्विटर यूजर Oládòkun Eniolá Oluwapelumi ने देखील मिळत्या जुळत्या दाव्यासोबत चित्र शेअर केले.

ट्विटर यूजर Rajesh Chhetri ह्यांनी देखील शेअर केले: Brave person; Ukraine President Himself landed on the landmark of War. 💥💥 #UkraineRussia

https://twitter.com/RaajChhetri07/status/1497229222523568128/photo/2

इतकेच नाही तर एका मीडिया ऑर्गनायझेशन, एबीपी लाईव्ह ने 24 Feb 2022 रोजी एक आर्टिकल शेअर केला:
An article published by ABP Live on 24 Feb 2022 titled, ‘जवानों के साथ युद्ध के मैदान पर उतरे यूक्रेन के राष्ट्रपति वलोडिमिर जेलेंस्की, सेना के लिबास में तस्वीरें वायरल
ह्या आर्टिकल मध्ये देखील व्हायरल चित्र होते आणि त्यांनी बिना कॅप्शन चे चित्र शेअर केले होते.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ह्या आर्टिकल मध्ये वापरण्यात आलेल्या चार चित्रांचा तपास केला.

चित्र १:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली.
आम्हाला फायनान्सियल टाइम्स वर एक आर्टिकल सापडले, आर्टिकल चे शीर्षक होते: ‘Ukraine president fights oligarch on home front as Russia threat looms‘ 19 डिसेंबर 2021 रोजी हे आर्टिकल प्रकाशित झाले होते.

कॅप्शन होते: Rinat Akhmetov, Ukrainian businessman and oligarch, left, and Ukraine’s President Volodymyr Zelensky © FT Montage/AFP/Getty/EPA

आता विश्वास न्यूज ने गेटी इमेजस च्या वेबसाईट वर किवर्डस सोबत हे चित्र शोधले.

आम्हाला हे चित्र गेटी इमेजस च्या वेबसाईट वर दिसले. कॅप्शन प्रमाणे हे चित्र 06 डिसेंबर, 2021 चे आहे.

कॅप्शन प्रमाणे: Ukrainian President Volodymyr Zelensky visits the front-line positions of the Ukrainian military in Donbass, Ukraine on December 06, 2021. (Photo by Ukrainian Presidency / Handout/Anadolu Agency via Getty Images)

चित्र २:

आम्ही दुसऱ्या चित्रावर देखील गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला हे चित्र China Daily वर 10 April 2021 रोजी पोस्ट केलेले दिसले.

कॅप्शन प्रमाणे: Ukraine’s President Volodymyr Zelensky visits positions of armed forces near the frontline in Donbass region, Ukraine, on Thursday. UKRAINIAN PRESIDENTIAL PRESS SERVICE/REUTERS

चित्र ३:

विश्वास न्यूज ला अश्याच प्रकारे तिसरे चित्र देखील गेटी इमेजस च्या वेबसाईट वर सापडले.

कॅप्शन प्रमाणे: Ukrainian President Volodymyr Zelensky visits the front-line positions of Ukrainian military in Donbass, Ukraine on December 06, 2021. (Photo by Ukrainian Presidency / Handout/Anadolu Agency via Getty Images)

चित्र ४:
आम्हाला चौथे चित्र गूगल रिव्हर्स इमेज द्वारे Kyiv Post वर सापडले.

कॅप्शन होते: This handout picture taken and released by Ukrainian Presidential Press Service on April 8, 2021 shows Ukrainian President Volodymyr Zelensky on the frontline near Zolote, Luhansk region, eastern Ukraine.

सगळे चार चित्र आर्टिकल प्रमाणे, 2021 चे असल्याचे कळले.

सोशल मीडिया वर शेअर करण्यात आलेल्या दुसऱ्या चित्रांवर देखील आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.

आम्हाला व्हायरल इमेज Reuters च्या वेबसाईट वर मिळाले. ‘Ukraine’s Zelenskiy to Putin: Meet me for peace talks in conflict zone’ असे त्याचे शीर्षक आहे.
कॅप्शन मध्ये लिहले होते: Ukraine’s President Volodymyr Zelenskiy visits positions of armed forces near the frontline with Russian-backed separatists in Donbass region, Ukraine April 9, 2021. Ukrainian Presidential Press Service/Handout via REUTERS

ह्या सगळ्यातून हेच स्पष्ट होते कि हे चित्र 2021 चे आहे. विश्वास न्यूज ला असे कुठलेच आर्टिकल्स नाही मिळाले ज्यातून हे स्पष्ट होईल कि युक्रेन चे राष्ट्रपती सैनिकांसोबत लढत आहे.

युक्रेन च्या एका पत्रकार Liz Cookman ह्यांना विश्वास न्यूज ने ट्विटर द्वारे संपर्क केला. त्यांनी ह्याची पुष्टी केली कि युक्रेन चे राष्ट्रपती सैनिकांसोबत लढत नाही आहेत.

निष्कर्ष: युक्रेन च्या राष्ट्रपती, व्होलोडिमिर झेलेन्स्की ज्यांचे चित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, ते आताचे नसून 2021 मधील आहे.

  • Claim Review : Recent Pictures of Ukraine President
  • Claimed By : Nasser F Ayuob
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later