X

Fact Check: अयोध्येला भगव्या रंगानी सजवल्याच्या दाव्यांनी प्रयागराज चे छायाचित्र व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: July 31, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): राम मंदिर मध्ये होणाऱ्या भूमी पूजन च्या तयाऱ्या सुरु असताना सोशल मीडियावर बरेच चित्र व्हायरल होताना दिसत आहेत, ज्यात भगव्या रंगानी घरं आणि गल्ल्या सजवलेल्या दिसतात. असा दावा करण्यात येत आहे कि, राम मंदिर निर्माण साठी होणाऱ्या भूमी पूजनच्या आधी, अयोध्या शहराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आणि संपूर्ण शहराला भगव्या रंगात सजवले गेले.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला, अयोध्येच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र हे प्रयागराज चे आहेत.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर, ‘Nitesh Kumar’ ने काही छायाचित्र (आर्काइव लिंक) शेअर करून लिहले, “अयोध्या तैयार, पुरे अयोध्या शहर को भगवा रंगो से सजा दिया!!!
बोलो जोर से #जयश्रीराम 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻जयश्रीराम 🚩🚩🚩”

https://twitter.com/Niteshkrai/status/1287353542110404608

सोशल मीडियाच्या वेग-वेगळ्या प्लॅटफॉर्मवर याच छायाचित्रांना अयोध्येचे सांगून शेअर केले गेले.

तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये चार छायाचित्रांचा वापर केला गेला आहे. विश्वास न्यूज ने एक-एक करून सगळ्या छायाचित्रांची तपासणी केली.

पहिले आणि दुसरे छायाचित्र:

गूगल रिवर्स इमेज सर्च मध्ये पहिले छायाचित्र आम्हाला ‘डेक्कन हेराल्ड’ च्या वेबसाईट वर १५ जुलै रोजी प्रकाशित केलेल्या एका बातमीत सापडले.

न्यूज एजेंसी पीटीआई च्या छायाचित्रासोबत दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश च्या प्रयागराज मध्ये एका व्यावसायिकाने भाजप नेत्याच्या सांगण्यावरून त्याच्या घराला भगव्या रंगात सजवण्यावरून तक्रार केली होती. भाजप नेते आणि उत्तर प्रदेश चे कॅबिनेट मंत्री, गोपाल गुप्ता ‘नंदी’ यांच्यावर या प्रकरणात दोषी ठरवून आरोप करण्यात आले होते.

याच बातमीत आम्हाला, याच प्रकरणासंबंधित दुसरे छायाचित्र देखील सापडले.

तिसरे छायाचित्र:

गूगल रिवर्स इमेज सर्च मध्ये आम्हाला हे छायाचित्र ‘नॅशनल हेराल्ड’ या वेबसाईटवर १४ जुलै रोजी प्रकाशित बातमीत सापडले. हे छायाचित्र पण, प्रयागराज प्रकरणासोबत संबंधित आहे.

बातमी प्रमाणे, प्रयागराजच्याच्या एका व्यावसायिकाने त्याचं घर जबरदस्ती भगव्या रंगात रंगवल्याची तक्रार केली होती. व्यावसायिकाचे म्हणणे होते कि त्याने असे करण्यास मनाई केल्यास, काही लोकांनी त्याला शिवीगाळ केला आणि धमकी देखील दिली. ज्या गल्लीच्या घरांना रंग देण्यात आला होता त्यात, गोपाल गुप्ता ‘नंदी’, जे उत्तर प्रदेश चे कॅबिनेट मंत्री आहे, यांचा देखील समावेश आहे.

न्युज सर्च मध्ये आम्हाला ANI चा एक जुना ट्विट मिळाला, ज्यात या तिन्ही छायाचित्रांची पुष्टी होते. १३ जुलै रोजी एका ट्विट मध्ये प्रयागराजचे पोलीस अधीक्षक (क्राईम) आशुतोष मिश्रा यांनी पण बयान दिला आहे. त्यांच्याप्रमाणे, “दोन लोकांनी आपल्या तक्रारीत म्हंटले कि त्यांच्या घरावर काही लोकांनी जरबारदस्ती भगवा रंग मारला. या प्रकरणात तक्रार नोंदवून तपास सुरु केला आहे.”

आमचे सहयोगी दैनिक जागरण चे ब्यूरो चीफ (प्रयागराज) राकेश पांडेय यांनी आम्हाला हे छायाचित्र प्रयागराज चे असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले, “हे प्रकरण बहादुरगंज गल्ली चे आहे. गल्लीतल्या घरांना जबरदस्ती भगवा रंग देण्यात आला आणि त्याबाबतीत तक्रार देखील करण्यात आली होती.
दैनिक जागरण च्या वेबसाईट वर १५ जुलै रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीत याबद्दल संपूर्ण माहिती वाचली जाउ शकते.

चौथे छायाचित्र:

गूगल रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला हे छायाचित्र गेट्टी इमेज च्या वेबसाईटवर मिळाले. हे छायाचित्र पण प्रयागराजचे आहे पण याचा वर सांगितल्या गेलेल्या प्रकरणासोबत काहीच संबंध नाही.

दिलेल्या माहितीनुसार हे छायाचित्र ९ डिसेंबर २०१८ रोजी लावण्यात आले होते. हे छायाचित्र, ‘‘पेंट माय सिटी’ प्रोजेक्ट अंतर्गत गंगा नदीवर बनलेल्या शास्त्र पुलाच्या पिल्लरवर बनवले गेले आहे. ‘‘पेंट माय सिटी’ प्रोजेक्ट चे आयोजन कुंभ मेळ्याच्या तयारी दरम्यान शहर ला सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी केले गेले होते. म्हणजेच ज्या छायाचित्रांना अयोध्येचे सांगून व्हायरल केले जात आहे ते सगळे प्रयागराज चे आहे.

दैनिक जागरण चे अयोध्या ब्यूरो चे प्रभारी रमाशरण अवस्थी यांनी सांगितले, “अयोध्या मध्ये काही क्षेत्रांना एका रंगानी रंगण्याची योजना होती, पण अजून पर्यंत याची सुरुवात केली गेली नाही. व्हायरल छायाचित्रांचा अयोध्येंसोबत काहीही संबंध नाही.

व्हायरल पोस्ट शेअर केलेल्या यूजर ने आपल्या प्रोफाइल मध्ये म्हंटल्याप्रमाणे तो बक्सर चा रहिवासी आहे. हि प्रोफाइल ऑक्टोबर २०१४ रोजी बनवण्यात आली आहे. हि व्यक्ती एका विशिष्ठ विचारधारेचा आहे.
अयोध्येमध्ये बनवण्यात येणाऱ्या राम मंदिर ला घेऊन सोशल मीडियावर अशे बरेच व्हिडिओ आणि छायाचित्र शेअर करण्यात येत आहेत जे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. विश्वास न्यूज ने या आधी देखी अश्या दाव्यांचा तपास केला आहे. विश्वास न्यूज च्या वेबसाईटवर राम मंदिर निर्माण सोबत जोडले गेलेले फॅक्ट-चेक आपण वाचु शकता.

निष्कर्ष: राम मंदिर निर्माण आणि आता होणाऱ्या भूमी पूजन ला घेऊन अयोध्या शहराला भगव्या रंगात रंगवण्याचा दाव्याने व्हायरल होत असलेले छायाचित्र प्रयागराज चे आहे.

  • Claim Review : अयोध्या तैयार, पुरे अयोध्या शहर को भगवा रंगो से सजा दिया!!!
  • Claimed By : Nitesh Kumar
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later