X

Fact Check: शिव सेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइल मधून ‘मिनिस्टर’ शब्द गाळला हा दावा खोटा

व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि आदित्य ठाकरे ह्यांनी आपल्या बायो मधून मिनिस्टर शब्द गाळला तो खोटा आहे. ट्विटर वर त्यांनी कधीच मिनिस्टर ह्या पोस्ट चा उल्लेख केला नव्हता.

  • By Vishvas News
  • Updated: June 22, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): महाराष्ट्रात सध्याची स्थिती अनिश्चित आहे. सरकार देखील स्थिर नाही, अश्यातच एक दावा चांगलाच सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. दावा करण्यात येत आहे कि शिव सेने चे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी आपल्या ट्विटर बायो मधून ‘मिनिस्टर’ हा शब्द गाळला आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?

बरेच सोशल मीडिया यूजर्स हा दावा करत आहेत कि शिव सेने चे नेते आणि आमदार तसेच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ह्यांनी आपल्या ट्विटर बायो मधून ‘मिनिस्टर’ हा शब्द काढला आहे.

पुणे मिरर नि देखील ह्या दाव्याबद्दल ट्विट केले.

तसेच काही मीडिया ऑर्गनायझेशन्स देखील ह्या खोट्या बातमी ला बळी पडले.

फेसबुक यूजर Revan Siddappa ह्यांनी देखील हा दावा केला आणि लिहले, “Aaditya Thackeray – आदित्य ठाकरे Removes “Minister” Designation from his profile…!!!

All set for #BJP Government in #maharashtra”

हा दावा आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

बाकी यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.

https://twitter.com/HinduDharma1/status/1539487995262160897
https://twitter.com/KothadiyaSpeaks/status/1539485840505679873

तपास:

विश्वास न्यूज ने गूगल कीवर्ड सह आपला शोध सुरु केला. आम्हाला बऱ्याच मीडिया ऑर्गनायझेशन ने हि बातमी घेतल्याचे लक्षात आले.

आम्ही त्यानंतर ट्विटर कडे आपला शोध वळवला, आम्हाला Gaurav Kadam ह्यांचे ट्विट सापडले, ज्यात त्यांनी म्हंटले कि ठाकरेंनी मिनिस्टर कधी आपल्या बायो मध्ये लिहले नव्हते.

विश्वास न्यूज ने त्यानंतर वेबॅक मशीन ची मदत घेतली.

April 28, 2022 च्या स्नॅपशॉट प्रमाणे, त्यांनी बायो चेंज केला नाही.

तसेच 13 June, 2022 च्या स्नॅपशॉट प्रमाणे देखील बायो चेंज झालेला नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही आदित्य ठाकरे ह्यांना व्हाट्सअँप द्वारे संपर्क केला. त्यांना आम्ही व्हायरल दाव्याविषयी सांगितले. आदित्य ठाकरे ह्यांनी रिप्लाय केला, “व्हायरल दावा खोटा आहे. मी ट्विटर वर कधीच मिनिस्टर असे बायो वर लिहले नाही. हे मी इंस्टाग्राम वर लिहले होते.

आम्ही त्यांचे इंस्टाग्राम प्रोफाइल तपासले, त्यावर लिहले होते, “Minister for Tourism, Environment & Protocol, Govt of Maharashtra, President: Yuva Sena, Vice President: WIFA, President of the Mumbai District FA”

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर चा बॅकग्राऊंड चेक केला. त्यात कळले, Revan Siddappa हे बंगलोर चे रहिवासी आहेत आणि त्यांना 528 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि आदित्य ठाकरे ह्यांनी आपल्या बायो मधून मिनिस्टर शब्द गाळला तो खोटा आहे. ट्विटर वर त्यांनी कधीच मिनिस्टर ह्या पोस्ट चा उल्लेख केला नव्हता.

  • Claim Review : आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायो मधून मिनिस्टर शब्द काढले.
  • Claimed By : Revan Siddappa
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later