
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विविध सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, केलेल्या दाव्यांप्रमाणे हे एक दुर्मिळ फुल आहे. विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात या छायाचित्रावर केलेले दावे खोटे आढळले.
काय होतंय व्हायरल?
मराठी भाषेत फेसबुक वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये हे दावे करण्यात आले आहेत: स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबराचे) दुर्मिळ फुल पाठविले आहे. दर्शनाचा लाभ घ्यावा! कृपया झूम करून पहावे. औंदुबराचे फुल कधी कूणास दिसत नाही.दर्शनाचा लाभ घ्यावा!!! ५० वर्षामध्ये एकदाच फूलणारे “ॐ कार पुष्प ”
निसर्गाची अगाध लीला !! (पूढे पाठवा कारण आणखी लोक बघू शकतील.)
हि पोस्ट फेसबुक वर ‘Kishori Malawadkar Upare As’ यांनी शेअर केले.
या पोस्ट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपला तपास गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून सुरु केला. आम्ही चित्रातले छायाचित्र आणि मजकूर वेगळा केला आणि छायाचित्राचा शोध घेतला.
रिव्हर्स इमेज सर्च मध्ये पॉसिबल रिलेटेड सर्च मध्ये “wood” असे लिहून आले (अर्थात लाकूड).
सर्च च्या दुसऱ्या पानावर आम्हाला एक लिंक सापडली ज्यात आम्हाला त्या कथित फुलाचे संपूर्ण छायाचित्र मिळाले.
या लिंक वर मल्याळम मध्ये मजकूर आढळतो: ശിവലിംഗപുഷ്പം.
99 വർഷത്തിൽ ഒരിക്കൽ മാത്രം പൂക്കുന്ന പുഷ്പം. (ഹിമാലയത്തിൽ) #💌 പ്രണയം”
गूगल ट्रान्सलेट प्रमाणे यात म्हंटले आहे: हे शिवलिंग फुल आहे जे ९९ वर्षात एकदा उमलते.
यातून आम्हाला कळले कि हे एक छायाचित्र विविध भाषांमध्ये व्हायरल होत असावे.
आम्ही या दिलेल्या लिंक वरून पूर्ण छायाचित्र डाउनलोड केले आणि नंतर त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केले. गूगल वर आम्हाला तेच निकाल मिळाले आणि म्हणून आम्ही ‘बिंग’ सर्च वापरायचे ठरवले. असे केल्यास आम्हाला बिंग वर एक ‘न्यू इंडियन एक्सप्रेस‘ ची बातमी सापडली, ज्यात अश्याच प्रकारचे छायाचित्र वापरण्यात आले होते.
न्यूज मध्ये सांगितले होते:
हे झाड डायनासोर च्या काळातले आहे. आणि नंतर त्याबद्दल माहिती दिली गेली होती.
तसेच अशेच एक छायाचित्र आम्हाला ‘सायकस’ च्या विकिपीडिया पानावर पण सापडले.
या वरील तपासात आम्हाला कळले कि हे फुल, औदुंबराचे नाही तसेच हे शिवलिंग फुल देखील नाही.
विश्वास न्यूज ने, अरण्य एन्व्हायरॉन्मेंटल ऑर्गनायजेशन चे उपाध्यक्ष, प्रणय तिजारे यांच्या सोबत संपर्क साधला त्यांनी देखील हे औदुंबराचे फुल नसल्याचे सांगितले. औदुंबराचे फुल असे नसतात हे देखील त्यांनी सांगितले. तसेच व्हायरल होत असलेले छायाचित्र हे सायकस प्रजातीचे आहे असे ते म्हणाले.
फेसबुक यूजर ज्यांनी हे छायाचित्र पोस्ट केले त्यांच्यावर सोशल चेक केले असता असे कळले कि त्यांनी प्रोफाइल सप्टेंबर २०१७ रोजी बनवली, त्या मोहोळ, महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि सध्या पुण्यात राहतात.
निष्कर्ष: व्हायरल झालेले छायाचित्र हे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबराचे) दुर्मिळ फुलाचे किंवा शिवलिंग फुलाचे नसून सायकस प्रजाती चे झाड आहे. व्हायरल होत असलेले दावे खोटे आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.