X

Fact-Check: मुंबई मध्ये नाही लागणार आहे फ्रेश लोकडाऊन, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे

विश्वास न्यूजने केले असता, हे दावे दिशाभूल करणारे असल्याचे आढळले, शहरात नवीन ताळेबंद (लोकडाऊन) करण्याचे कोणतेही आदेश नाहीत, कलम १४४ सीआरपीसी अंतर्गत जारी केलेला आदेश केवळ ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मागील आदेशाचा मुदतवाढ आहे. कोणतेही नवीन निर्बंध लादलेले नाहीत.

  • By Vishvas News
  • Updated: September 19, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): गुरुवार च्या संध्याकाळ पासून व्हाट्सअँप वर एक मेसेज फॉरवर्ड करण्यात येत होता. हा मेसेज पीडीएफ फॉरमॅट मध्ये, ‘डिसिपी मुंबई पोलीस इशूज फ्रेश लोकडाऊन ऑर्डर’ या नावाने शेअर केला जात होता. विश्वास न्यूज च्या तपासात, हा दावा दिशाभूल करणारा आढळला.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर चिराग दोषी, याने कमिश्नर ऑफ पोलीस, ग्रेटर मुंबई यांनी शेअर केलेला ऑर्डर आपल्या वॉल वर शेअर केला, आणि त्या दोन छायाचित्रांसह लिहले, “DCP Mumbai Police issues Fresh Lockdown Orders“.
या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी कमिश्नर ऑफ पोलीस, ग्रेटर मुंबई, यांची प्रेस रिलीज सापडते का ते बघितले. मुंबई पोलिसांची वेबसाईट mumbaipolice.gov.in वर आम्हाला ती प्रेस रिलीज सापडली.

विश्वास न्यूज ने त्या नंतर काही कीवर्डस वापरून, मुंबईत परत लोकडाऊन लागण्याचे वृत्त सापडते का ते बघितले.
आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक बातमी सापडली, ‘Section 144 in Mumbai: No lockdown, routine order reissued, cops say,’ (मुंबई मध्ये सेक्शन १४४: लोकडाऊन नाही, पोलीस म्हणाले ऑर्डर नियमितपणे काढला जातो ) पूर्ण रिपोर्ट इथे वाचा.
रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, ‘मुंबई पोलिसांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले की लोकांच्या हालचालींवर कोणतेही नवीन निर्बंध लादले गेले नाहीत आणि त्यांनी सीआरपीसीच्या कलम १४४ अंतर्गत अस्तित्त्वात असलेल्या आदेशाचा चा सप्टेंबरपर्यंत पुन्हा विस्तार केला आहे.

आम्हाला तशीच एक रिपोर्ट, ‘Section 144 in Mumbai: Does anything change? All you need to know,’ हिंदुस्थान टाइम्स मध्ये पण मिळाली. त्यात म्हंटल्या प्रमाणे, ‘मुंबईत कलम १४४ पुन्हा लागू केल्यास काहीही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आम्ही नंतर मुंबई पोलिसांचे सोशल मीडिया हॅन्डल्स तपासले. आम्हाला मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंट वर हि माहिती शेअर केलेली आढळली, ‘प्रिय मुंबईकरानों, फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १४४ नुसार सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती/हालचालींवर मनाई बाबतचा आदेश नवा नसून यापूर्वीचे आदेश यापुढे नियमित करण्यात आले आहेत.

नवीन निर्बंध लागू करण्यात आले नसून राज्य सरकारने शिथिल केलेल्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.’


राज्याचे पर्यटन व महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विटरवर या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी एन अंबिका यांनी विश्वास न्यूजशी संवाद साधताना सांगितले की, हा एक नियमित आदेश आहे.
विश्वास न्यूजने डीसीपी ऑपरेशन्स कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या सेक्शन १४४ मधील ताज्या लॉकडाऊनच्या दाव्यांना नाकारले. एका ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्रित करण्यास मनाई आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून मुंबईत ही बंदी कायम आहे.

व्हायरल दावा शेअर करणारे फेसबुक युजर चिराग दोशी हा गुजरातच्या सुरतचे रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने केले असता, हे दावे दिशाभूल करणारे असल्याचे आढळले, शहरात नवीन ताळेबंद (लोकडाऊन) करण्याचे कोणतेही आदेश नाहीत, कलम १४४ सीआरपीसी अंतर्गत जारी केलेला आदेश केवळ ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मागील आदेशाचा मुदतवाढ आहे. कोणतेही नवीन निर्बंध लादलेले नाहीत.

  • Claim Review : DCP Mumbai Police issues Fresh Lockdown Orders
  • Claimed By : Chirag Doshi
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later