X

Fact-check: बाजरीची भाकरी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस पासून संरक्षण मिळत नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि बाजरी हे कोरोनाव्हायरस पासून संरक्षण देते किंवा उपचार करते असे कुठेच पुरावे नाही आहेत. पण कोरोनाव्हायरस मध्ये इम्म्युनिटी वाढवण्यास बाजरा चा समावेश आहारात करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.

  • By Vishvas News
  • Updated: October 16, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला मराठी मध्ये एक व्हायरल होत असलेला दावा आढळला ज्यात लिहले होते कि बाजरी ची भाकरी कोरोनाव्हायरस वर गुणकारी आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात आढळले कि हा दावा खोटा आहे. कुठेच असे सिद्ध झाले नाही आहे, कि बाजरी नि कोरोनाव्हायरस चा उपचार शक्य आहे.

काय होत आहे व्हायरल?
वक्रतुंड फिटनेस क्लब राजगुरूनगर” या फेसबुक पेज ने २९ सप्टेंबर रोजी आपल्या प्रोफाइल वर एक पोस्ट शेअर केली, ती खालील प्रमाणे आहे:

बाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी
नुकत्याच WHO च्या वैज्ञानिकांकडून कडून स्पष्ट करण्यात आले की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे.प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरी मधील टॉर्चमुळे आणि बाजरीतील गर्मी मुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही. म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. खेड्यात कुठल्याही सुविधा नसताना खूप कमी लोकांना कोरोनाची लागण होत आहे.
बाजरीचे फायदे
1) शक्ती वर्धक – बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
2) बाजरी पचायला हलकी असते. त्यामुळे वजन कमी होते.
3) हृदय विकाराचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी होत
4) कर्बोदके, पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराची झीज भरून काढते.
5) बाजरीतील फायबर – ज्यामुळे पाचन क्षमता सुधारते.
6) बाजरी खाल्याने. कब्ज, ऍसिडिटी सारख्या समस्या होत नाही.
7) कॅन्सर – बाजरीची भाकर खाल्याने कॅन्सर सारखे आजार होण्यापासून वाचवते.
असे अनेक फायदे या बाजरीच्या भाकरीचे आहेत
अंबज्ञ नाथसंविध्.🌹👏👌👆🌷🙏🏻🌸

हि पोस्ट आणि त्याचे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात वर्ल्ड हेअल्थ ऑर्गनायजेशन (WHO) यांचे संकेतस्थळ तपासण्यापासून सुरुवात केली. आम्हाला कुठेच बाजरीचा उल्लेख आढळला नाही, जिथे असे लिहले असेल कि बाजरी खाल्ल्याने लोकांना कोरोनाव्हायरस ची लागण होत नाही. पण WHO च्या एका सेक्शन मध्ये आम्हाला एक रिपोर्ट मिळाली, ज्याचे शीर्षक होते, “Nutrition advice for adults during the COVID-19 outbreak“. या रिपोर्ट मध्ये WHO ने बाजरी चा समावेश आपल्या आहारात करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात कुठेच असा उल्लेख केला नाही कि बाजरी कोरोनाव्हायरस पासून संरक्षण देते.

“फळे, भाज्या, दाणे (उदा. डाळ, सोयाबीनचे), शेंगदाणे आणि संपूर्ण धान्य (उदा. प्रक्रिया न केलेले मका, बाजरी, ओट्स, गहू, तपकिरी तांदूळ किंवा स्टार्च कंद किंवा बटाटा, याम, टॅरो किंवा कसावा सारखे मुळे) आणि जनावरांचे पदार्थ खा. स्त्रोत (उदा. मांस, मासे, अंडी आणि दूध).” या पदार्थांचा समावेश करण्यास WHO ने सल्ला दिला आहे.

“योग्य पोषण आणि हायड्रेशन आवश्यक आहे. चांगले संतुलित आहार घेत असलेले लोक अधिक मजबूत रोगप्रतिकारक आणि निरोगी आजार आणि संसर्गजन्य रोगांचे कमी धोका असलेले स्वस्थ असतात. म्हणून आपल्या शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, खनिजे, आहारातील फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स मिळविण्यासाठी आपण दररोज विविध ताजे पदार्थ खावे. पुरेसे पाणी प्या. वजन, लठ्ठपणा, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगाच्या काही प्रकारचे धोका कमी होण्याकरिता साखर, फॅट आणि मीठ टाळा,” असे त्या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.

हि संपूर्ण रिपोर्ट इथे वाचा.

व्हायरल मेसेज मध्ये असे देखील म्हंटले गेले आहे कि देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाव्हायरस चे रुग्ण कमी आहे, पण आम्ही जेव्हा इंटरनेट वर ह्या दाव्याचा तपास केला, आम्हाला एक PTI ची डेक्कन हेराल्ड मधली, ५ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित केलेली बातमी सापडली. त्या बातमीत लिहले आहे:

“Though there are no exact numbers about the spread of the virus into rural areas, there is enough evidence to suggest it has reached most corners of India and there is ommunity transmission, say experts”

(अर्थात: “ग्रामीण भागात विषाणूचा प्रसार होण्याविषयी कोणतीही अचूक संख्या नसली तरी भारताच्या बहुतेक कोपर्यत याचा प्रचार झाला आहे असे सांगणारे पुरावे आहेत आहेत आणि तेथे सर्वत्र रोगाचा प्रसार आहे,” तज्ज्ञांचे म्हणणे आहे.)

हि संपूर्ण रिपोर्ट इथे वाचा:

आम्हाला, “इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिटयूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिकस (आयसीआरआयएसएटी)” यांनी मे २४, २०२० रोजी एक आर्टिकल पोस्ट केले. त्या आर्टिकल चे शीर्षक होते, “COVID-19 CALLS FOR RENEWED FOCUS ON EATING RIGHT AND NATURAL“.
त्या आर्टिकल मध्ये लिहले होते, “सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये बाजरीच्या समृद्धीचा अंदाज एखाद्या व्यक्तीमध्ये सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी नैसर्गिक पर्याय असू शकतो. उदाहरणार्थ, फिंगर बाजरी (नाचणी) मध्ये दुधापेक्षा तीनपट जास्त कॅल्शियम आहे; आणि मोत्याच्या बाजरीमध्ये, आणखी एक लोकप्रिय पोषक-धान्य, तृणधान्यांमध्ये सर्वाधिक फोलेट असते.”

संपूर्ण आर्टिकल इथे वाचा.

इंटरनेट सर्च च्या वेळी आम्ही काही कीवर्डस वापरून पण तपास केला, जसे कि, “बाजरा, इम्युनिटी, कोरोनाव्हायरस” आणि आम्हाला, द हिंदू बिसनेस लाईन मध्ये एक रिपोर्ट सापडली. एप्रिल २८, २०२० रोजी पोस्ट केलेल्या आर्टिकल चे शीर्षक होते, “Strong immunity is a key weapon in the fight against Covid-19
त्यात सांगितले आहे कि बाजरी ने आपली इम्युनिटी वाढवा: IIMR (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मिल्लेट रिसर्च)

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि, रोगप्रतिकारक बूस्टर म्हणून ओळखल्या जाणार्‍या खाद्यपदार्थाचे बरेच स्त्रोत आहेत आणि मुख्य अन्नधान्य म्हणून, बाजरी हे एक आशादायक स्त्रोत असल्याचे सिद्ध होऊ शकतात, विशेषत: कोरोनाव्हायरस विषाणूच्या साथीच्या प्रसंगाच्या परिस्थितीशी संबंधित.
हि संपूर्ण रिपोर्ट इथे वाचा.

या रिपोर्ट मध्ये बाजरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे दिले आहे, पण कुठेच असे म्हंटले नाही आहे कि बाजरी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस पासून संरक्षण मिळते.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने, डॉ विलास ए टोनापी, डायरेक्टर इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मिल्लेट्स रिसर्च, यांच्या सोबत संवाद साधला. आमच्यासोबत बोलताना ते म्हणालेत, “इम्म्युनिटी चा सरळ संबंध आपण काय खातो या सोबत आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरस महामारी च्या वेळी बाजरी चा उपयोग आपल्या आहारात केल्याने इम्म्युनिटी वाढते. ते म्हणाले की, ज्वारी, नाचणी, फॉक्सटेल, बाजरी आणि इतर धान्य हे पौष्टिक दृष्ट्या श्रेष्ठ आहेत. प्रोटीन, उच्च आहारातील फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्सचा चांगला स्रोत म्हणून हे काम करतात. आणि म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास हे सगळे मूल्य गुणकारक ठरतात.
डॉ टोनापी यांनी असे देखील सांगितले कि, बाजरा मुळे कोरोनाव्हायरस पासून संरक्षण होते किंवा त्याचा उपचार होतो असे सिद्ध करणारे कुठलेच अध्ययन अजून तरी केलेले नाही.

शेवटी आम्ही “वक्रतुंड फिटनेस क्लब राजगुरूनगर” या पेज चा तपास केला, त्यात आम्हाला असे कळले कि महाराष्ट्रातील राजगुरू या गावातून हा पेज बनवण्यात आला आहे आणि या पेज ला ४५७ लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि बाजरी हे कोरोनाव्हायरस पासून संरक्षण देते किंवा उपचार करते असे कुठेच पुरावे नाही आहेत. पण कोरोनाव्हायरस मध्ये इम्म्युनिटी वाढवण्यास बाजरा चा समावेश आहारात करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.

  • Claim Review : बाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी
  • Claimed By : वक्रतुंड फिटनेस क्लब राजगुरूनगर
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later