Fact Check: राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत नाश्त्याच्या टेबलवर खरगे यांना जागा न दिल्याचा दावा चुकीचा, फोटो फेक आहे
विश्वास न्यूजला आपल्या तपासात आढळले की सोफ्यावर एकटे बसलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा व्हायरल फोटो एडिटेड आहे. ओरिजिनल फोटोमध्ये खरगे नाहीतच. यामध्ये फक्त राहुल आणि प्रियंका गांधी मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत नाश्ता करताना दिसत आहेत.
- By: Pragya Shukla
- Published: Sep 18, 2026 at 02:22 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). ब्रिक्स परिषद २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलेले मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत नाश्ता करताना विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम काही अधिकाऱ्यांसोबत टेबलवर बसून नाश्ता करताना दिसत आहेत. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मागे सोफ्यावर एकटेच बसलेले आहेत. हा फोटो शेअर करून राहुल गांधी यांच्यावर टीका करत दावा केला जात आहे की, दलित असल्यामुळे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना मागे बसवले.
विश्वास न्यूजला आपल्या तपासात व्हायरल फोटो एडिटेड असल्याचे आढळले. मूळ फोटोमध्ये मल्लिकार्जुन खरगे उपस्थित नाहीत आणि मागील सोफाही रिकामा आहे. एडिटिंगच्या मदतीने फोटो बदलण्यात आला आहे आणि आता तो चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
काय व्हायरल होत आहे?
फेसबुक युझर ‘राष्ट्रवादी ब्राह्मण शरद द्विवेदी’ यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी व्हायरल फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “दिवस-रात्र दलित-दलित ओरडणाऱ्या राहुल गांधींच्या नाश्त्याच्या टेबलवर दलित नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी जागाच नाही.”
पोस्टची आर्काइव्ह लिंक येथे पहा.

तपास
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने फोटो शोधला. आम्हाला मूळ फोटो काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर मिळाला. हा फोटो १३ सप्टेंबर २०२६ रोजी अपलोड करण्यात आला होता. येथील माहितीनुसार, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांची नाश्त्यावर भेट घेतली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही गूगलवर संबंधित कीवर्ड्सच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला दाव्याशी संबंधित बातमी रिपोर्ट ‘दैनिक जागरण’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आढळली. ही बातमी १३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झाली होती. बातमीनुसार, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर दिल्लीत झालेल्या ब्रिक्स २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. या दरम्यान त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यांनी दिल्लीत दोघांसोबत नाश्ता केला होता.
‘नवभारत टाईम्स’नेही मलेशियाच्या पंतप्रधानांची राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या भेटीची एक बातमी १३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली होती.
व्हायरल आणि मूळ फोटोमधील फरक खाली दिलेल्या फोटोत पाहता येऊ शकतो.

फोटोमध्ये एआयचा वापर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही एआय डिटेक्टशन टूल ‘Hive Moderation’ च्या मदतीने शोध घेतला. या टूलने फोटोत जवळपास १०० टक्क्यांपर्यंत एआयचा वापर झाल्याची शक्यता वर्तवली.

आम्ही दुसरे टूल Faux Lens च्या मदतीनेही फोटो शोधला. या टूलनेही फोटोत एआयच्या वापराचे संकेत दिले.

अधिक माहितीसाठी आम्ही काँग्रेस प्रवक्ते अभय दुबे यांच्याशी संपर्क साधला. आम्ही त्यांच्याशी व्हायरल फोटो शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा चुकीचा आहे. फोटो एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून चुकीच्या पद्धतीने शेअर केला जात आहे.
काय आहे संदर्भ?
राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून दलितांच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. त्यांनी ऑगस्ट २०२६ मध्ये एका पत्रकार परिषदेत दलितांचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी देशात दलितांवर होणाऱ्या भेदभावावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) वर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की देशात अजूनही दलितांवर अत्याचार होत आहेत आणि चहाच्या दुकानांवर दलितांसाठी वेगळे कप ठेवले जातात. संपूर्ण रिपोर्ट येथे वाचा.
१८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे करण्यात आले होते. ही शिखर परिषद १२ ते १३ सप्टेंबरदरम्यान पार पडली. अनेक देशांचे मोठे नेते या परिषदेचा भाग बनण्यासाठी भारतात आले होते. भारताने चौथ्यांदा या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले होते. संपूर्ण रिपोर्ट येथे वाचता येईल.
शेवटी आम्ही फोटो चुकीच्या दाव्यासह शेअर करणाऱ्या युझरचे अकाऊंट स्कॅन केले. आम्हाला आढळले की युझरला फेसबुकवर जवळपास दोन हजार लोक फॉलो करतात. युझरने प्रोफाईलमध्ये स्वतःला गुरुग्रामचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासात आढळले की सोफ्यावर एकटे बसलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा व्हायरल फोटो एडिटेड आहे. ओरिजिनल फोटोमध्ये खरगे नाहीतच. यामध्ये फक्त राहुल आणि प्रियंका गांधी मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत नाश्ता करताना दिसत आहेत.
- Claim Review : राहुल गांधींनी नाश्त्याच्या टेबलवर मल्लिकार्जुन खरगे यांना जागा दिली नाही.
- Claimed By : FB User राष्ट्रवादी ब्राह्मण शरद द्विवेदी
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











