X

Fact-Check: मुघल गार्डन चे नाव बदलून ‘अशोक वाटिका’ केल्याचा दावा चुकीचा आणि बनावटी आहे

राष्ट्रपती भवन च्या मुघल गार्डन चे नाव बदलून ‘अशोक वाटिका’ करणार असे सांगणारा दावा खोटा आणि बनावटी आहे. या आधी पण त्याचे नाव बदलून, ‘राजेंद्र प्रसाद गार्डन’ करण्याच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या, विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला.

  • By Vishvas News
  • Updated: August 27, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर मागील काही दिवसांपासून राष्ट्रपती भवन मध्ये स्थित मुघल गार्डन चे नाव बदलल्या जाणार आहे अश्या अफवा बघायला मिळतायत. असा दावा केल्या जात आहे कि मुघल गार्डन चे नाव बदलून ‘अशोक वाटिका’ करण्यात येणार आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. या आधी पण त्याच बगिच्याचे नाव बदलून, ‘राजेंद्र प्रसाद गार्डन’ ठेवण्यात येणार आहे असा दावा व्हायरल झाला होता. त्याच्या नावात कुठलाच बदल होणार नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ‘Barharia Siwan’ ने लिहले, “मुगल गार्डन का नाम बदलकर अशोक वाटिका रखने की तैयारी में है सरकार😂 हमें घंटा 🔔फर्क नहीं पड़ता।

अजून काही यूजर ने अश्याच काही मिळत्या-जुळत्या दाव्यांसह हेच छायाचित्र शेअर केले. पोस्ट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
राष्ट्रपती भवन च्या परिसरात असलेल्या मुघल गार्डन चे ऐतिहासिक महत्व आहे. जर का याचे नाव बदलले, तर ती अर्थात एक मोठी बातमी असेल. पण आम्हाला एक पण अशी बातमी आमच्या न्यूज सर्च मध्ये मिळाली नाही, ज्यात आम्हाला असे समजेल कि मुघल गार्डन चे नाव बदलून अशोक वाटिका केले गेले आहे.

काही कीवर्डस वापरल्यावर आम्हाला जुन्या बातम्यांचे लिंक मिळाले, ज्यांच्या परकामाने अखिल भारतीय हिंदू महासभा ने राष्ट्रपती भवन च्या मुघल गार्डन चे नाव बदलून ‘राजेंद्र प्रसाद गार्डन’ करण्याची मांग केली होती. NBT च्या संकेतस्थळावर २० ऑगस्ट २०१७ च्या एका बातमी प्रमाणे, हिंदू महासभे ने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बगिच्याचे नाव बदलण्यावरून पत्र लिहले होते.

विश्वास न्यूज ने राष्ट्रपती भवनच्या प्रेस सेक्रेटरी अजय कुमार सिंह यांच्या सोबत संपर्क केला. प्रेस सेक्रेटरी ऑफिस ने आम्हाला सांगितले, “आम्ही कोणत्याच प्रकारच्या अफवांवर टिप्पणी करत नाही. कोणत्यापण प्रकारच्या च्या माहिती साठी राष्ट्रपति भवन ची वेबसाईट बघण्यात यायला हवी.”
आम्ही या नंतर राष्ट्रपति भवन ची वेबसाईट तपासली.

राष्ट्रपति भवनाच्या सर्किट १ मध्ये मुख्य भवन आहे आणि सर्किट दोन मध्ये संग्रहालय आहे. तसेच सर्किट ३ मध्ये खूप सारे बगीचे आहेत, ज्यात मुघल गार्डन चा पण समावेश आहे. यात गार्डन च्या नावात काही पण बदल केला गेला नाही आहे.

केंद्र सरकार ची नोडल कम्युनिकेशन एजेंसी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो कडून पण या दाव्याचे खंडन केले गेले आहे. त्यांनी म्हंटले, “केंद्र सरकारनी मुगल गार्डन चे नाव बदलण्याचा निर्णय नाही घेतला गेला आहे.” पीआईबी ने देखील दावा खोटा असल्याचे सांगितले.

व्हायरल दावा शेअर करणाऱ्या पेज चे एक लाख पेक्षा अधिक फोल्लोअर्स आहेत. हा पेज ऑक्टोबर २०१२ साली बनला होता.

निष्कर्ष: राष्ट्रपती भवन च्या मुघल गार्डन चे नाव बदलून ‘अशोक वाटिका’ करणार असे सांगणारा दावा खोटा आणि बनावटी आहे. या आधी पण त्याचे नाव बदलून, ‘राजेंद्र प्रसाद गार्डन’ करण्याच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या, विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later