X

Fact Check: लठ्ठ महिलेने म्हंटले, कोविड वॅक्सीन न घेणाऱ्या लोकांमुळे माझी मृत्यू होणार आहे, सीएनएन ची व्हायरल रिपोर्ट खोटी आहे

सीएनएन ने एक लठ्ठ महिला वॅक्सीन न घेतलेल्या लोकांवर आरोप करते असं आर्टिकल नाही घेतले. व्हायरल इमेज खोटी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: September 11, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला व्हायरल होत असलेल्या सीएनएन च्या एका लेखाचे स्क्रीनशॉट दिसले. ते चित्र वेबसाईट वरून घेण्यात आलेल्या स्क्रीनशॉट चे चित्र दिसत होते. ह्या आर्टिकल चे शीर्षक होते: Healthy 40-year old Covid victim’s last words: “I blame the unvaccinated for this”.
विश्वास न्यूज च्या तपासात, असे कळले कि सीएनएन ने असे कुठलेच आर्टिकल घेतले किंवा लिहले नाही.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Adrienne Smith ह्यांनी व्हायरल चित्र 4 सप्टेंबर रोजी शेअर केले आणि लिहले: From @CNN: Healthy 40-year-old COVID Victim’s Last Words: “I blame the unvaccinated for this.” So … about 400 lbs?

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आर्टिकल सगळ्यात आधी निरखून पहिले.
हे आर्टिकल बुधवार, 25 ऑगस्ट रोजी छापून आल्याचे त्यात दिले होते. आणि आर्टिकल मध्ये दिलेला मजकूर हा मजाक म्हणून दिले असल्याचे दिसत होते. आर्टिकल मध्ये दिले होते:

शीला जॉन्सन कोविडला बळी पडण्याच्या आदल्या दिवशी
शीला जॉन्सन कोणत्याही निरोगी अमेरिकन व्यक्तीप्रमाणे जगली, सकाळी 6 वाजता उठून एक डझन अंडी, 36 पॅनकेक्स, 40 सॉसेज खाऊन मॅपल सिरपच्या देखील प्यायची. तिच्या लस न घेतलेला शेजारी, 58 वर्षीय ट्रायथलीट रिचर्ड सोरेन्सन यांच्याकडून तिला कोविड झाला, परंतु त्याबद्दल माहिती रिचर्ड ला देखील माहिती नव्हते . शीलाला काही महिन्यांपूर्वी फायझर लसीचे लसीकरण करण्यात आले होते आणि ती रिचर्डला सतत लस घेण्यासाठी प्रोत्साहित करत होती, परंतु त्याने नकार दिला कानी म्हंटले “मी 8 फूट उंच आहे, 190 पौंड आहे आणि एक मैल 6 मिनिट 20 सेकंदात पार करतो, मला लसीची गरज का आहे? मी पूर्णपणे निरोगी आहे! ” ज्या दिवशी शीलाचे निधन झाले त्या दिवशी रिचर्डने त्याचे 10 वे ट्रायथलॉन जिंकले. “

ह्या मजकुरामुळे हे आर्टिकल सिरीयस नसल्याचे जाणवले.
विश्वास न्यूज ला सीएनएन च्या वेबसाईट वर देखील हे आर्टिकल सापडले नाही.

त्या नंतर विश्वास न्यूज ने ह्या महिलेचा शोध घेण्यास सुरु केला जिचे चित्र आर्टिकल मध्ये वापरण्यात आले आहे. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला एक आर्टिकल looper.com वर सापडले, ज्यात हेच चित्र वापरण्यात आले होते. पण तिचे नाव शीला नसून Cindy Vela होते आणि ती टीएलसी ची एक रिऍलिटी मालिका My 600-lb Life ह्यात सहभागी झाली होती.

आता हे स्पष्ट झाले होते कि हे आर्टिकल तिचे चित्र वापरून एडिट करण्यात आले होते.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात, मॅट डॉर्निक, सीएनएन च्या स्ट्रॅटेजिक कॉम्म्युनिकेशन चे हेड ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि सीएनएन च्या प्लॅटफॉर्म वर हे आर्टिकल पब्लिश नाही झाले आणि कोणीतरी मजाक म्हणून हे लिहल्याचे समजते.

विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात, त्या यूजर ची प्रोफाइल चेक केली जिने हे आर्टिकल शेअर केले होते. यूजर Adrienne Smith ने डिसेंबर 2018 मध्ये ट्विटर जॉईन केले. तिचे 323 फॉलोवर्स आहे आणि ती 720 जणांना फॉलो करते.

निष्कर्ष: सीएनएन ने एक लठ्ठ महिला वॅक्सीन न घेतलेल्या लोकांवर आरोप करते असं आर्टिकल नाही घेतले. व्हायरल इमेज खोटी आहे.

  • Claim Review : From ⁦ @CNN ⁩ : Healthy 40-year-old COVID Victim’s Last Words: “I blame the unvaccinated for this.” So ... about 400 lbs?
  • Claimed By : Adrienne Smith
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later