
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): कोरोनाव्हायरस च्या संक्रमण असताना, बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. छायाचित्रासोबत दावा करण्यात येत आहे कि कोरोनाव्हायरस मधून ठीक झाल्यानंतर अमिताभ बच्चन हे हाजी अली दरगाह वर चादर चढवायला गेले. विश्वास न्यूज ने छायाचित्र आणि त्याबरोबर केलेल्या दाव्याचा तपास केले असता, आम्हाला असे कळले कि हे छायाचित्र २०११ साली अजमेर शरीफ येथे घेतलेले आहे, जे आता खोट्या दाव्यांसह व्हायरल केले जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Rohit Jaiswal Sujit ने अमिताभ बच्चन चे एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यात ते डोक्यावर टोपी घालून गर्दीत दिसतात आणि सोबतच मजार वर चढवणारी चादर पण छायाचित्रात दिसते. यूजर ने पोस्ट शेअर करून त्यासोबत लिहले, “‘जब इस को कोरोना हुआ था तब इसके जल्द ही स्वस्थ होने के लिए मंदिरों मे आरती..यग..सुंदर काण्ड का अखंड पाठ हो रहा था…और ये ठीक होने के बाद चादर चढ़ाने हाजी अली की दरगाह गया…So sad…Boycott कौन बनेगा करोड़पति”
(जेव्हा यांना कॉरोन झाला होता तेव्हा हे लौकर बरे व्हायला हवे म्हणून लोकांनी आरती, यज्ञ, सुंदर कांड आणि अखंड पाठ केले आता हे ठीक झाले त हाजी अली दरगाह ला चादर चढवायला चालले…So sad…Boycott कौन बनेगा करोड़पति)
पोस्ट चा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
पोस्ट च्या तपासात आम्ही सगळ्यात आधी व्हायरल झालेले छायाचित्र Google reverse Image च्या मदतीने शोधले. सर्च मध्ये आम्हाला इंडिया टुडे ची एक बातमी मिळाली. ४ जुलै, २०११ ला प्रकाशित झालेल्या बातमी प्रमाणे, मिताभ बच्चन अजमेर शरीफ दरगाह ला गेले होते. फोटो गॅलरी मध्ये आम्हाला अमिताभ बच्चन यांचे ते छायाचित्र पण दिसले, जे हाजी अली दरगाह च्या नावावर व्हायरल होत आहे.
त्या नंतर आम्ही कीवर्ड सर्च केले, त्यात आम्हाला बॉलीवूडच्या बातम्या कव्हर करणारे यूट्यूब चॅनेल ‘झूम’ वर ६ जुलै २०११ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. हा तेव्हाचाच व्हिडिओ आहे जेव्हांचे अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र खोट्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे.
हे त नक्की होते कि व्हायरल छायाचित्र जुने आहे आणि अजमेर शरीफ च्या मजार चे आहे. पण असा दावा केला जात आहे कि कोरोनाव्हायरस संक्रमणापासून ठीक झाल्यानंतर अमिताभ बच्चन हे हाजी अली ला गेले होते. विश्वास न्यूज ने गूगल ओपन सर्च टूल च्या मदतीने या बाबत कुठली बातमी आहे का ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही, ज्यात असे नमूद केले असेल कि कोरोनाव्हायरस मधून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन हाजी अली मजार वर गेले होते.
पुढे या बातमी ची पुष्टी करण्यासाठी आम्ही दैनिक जागरण चे बॉलीवूड कव्हर करणारे पत्रकार, मुख्य संवाददाता स्मिता श्रीवास्तव यांच्या सोबत संपर्क केला आणि त्यांना व्हायरल पोस्ट बद्दल विचारणा केली. त्यांनी आम्हाला सांगितले, “अमिताभ बच्चन यांचे हे छायाचित्र आताचे नाही, व्हायरल होत असेलेला दावा पूर्णपणे खोटा आहे.”
आम्ही शेवटी खोट्या दाव्यांसोबत व्हायरल पोस्ट शेअर करणारे यूजर Rohit Jaiswal Sujit यांची सोशल स्कैनिंग केली. त्यात आम्हाला असे कळले कि यूजर दिल्ली चा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले, कि अमिताभ बच्चन यांचे जे छायाचित्र कोरोनाव्हायरस मधून ठीक झाल्यानंतर हाजी अली ला गेल्याचे सांगून शेअर करण्यात येत आहे, ते २०११ रोजी अजमेर शरीफ दरगाह येथे घेतले गेले होते. या छायाचित्राचे सध्याच्या परिस्थितीशी काहीच घेणे देणे नाही. व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.