X

Fact check: टाटा ने नवी टॅक्सी सेवा सुरु केली असल्याचा दावा खोटा

टाटा ने नवीन टॅक्सी सेवा सुरु केली नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: March 31, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक दावा सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर तसेच व्हाट्सअँप वर देखील मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आल्याचे देखील आढळले. ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि टाटा ने नवी टॅक्सी सर्विस सुरु केली आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Smruti Desai ने व्हायरल होत असलेला में सेज आपल्या फेसबुक प्रोफाइल वर शेअर केला आणि लिहले:

TATA has launched new taxi service Cab E in Mumbai & Pune.. better alternative to Ola & Uber… TATA always helps the Nation in difficult times.. I request all of you to share this as much as possible.
Download the app on play store.
https://play.google.com/store/apps/details?id=com.cabe.rider

ह्या दाव्यात हि अँप्लिकेशन डाउनलोड करायची लिंक देखील होती.

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात साध्य किवर्ड सर्च पासून केली. आणि सगळ्यात आधी मेसेज मध्ये देण्यात आलेली लिंक तपासली.

लिंक आम्हाला गूगल प्ले स्टोर ला घेऊन गेली जिथे आम्हाला Cab-E अँप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.

विश्वास न्यूज ने नंतर Cab-E चा तपास केला.
आम्हाला ह्या कंपनी ची वेबसाईट सापडली आणि त्यात आम्ही कंपनी बद्दल अजून माहिती घेतली.

आम्हाला कंपनी चा अबाऊट अस पेज सापडला.

पेज वर लिहले होते, “CAB-EEZ Infra Tech (P) Limited (Brand Name: “Cab-e”) is a Technology Marketplace providing Technology Platform (built in-house) which supports a mobile-based online Cab booking service for an All-Electric Fleet of Cabs – for Local, Inter-City, Rentals, Tailored B2B services and customized trips – with the sole aim of significantly contributing to the Indian government’s push for 100% electric mobility by 2030.”

ह्या संपूर्ण सेक्शन मध्ये कुठेच टाटा चा उल्लेख नव्हता.

त्या नंतर आम्ही ह्याच कंपनी चे सोशल मीडिया प्रोफाईल्स बघितले. आम्हाला ह्या कंपनी द्वारे त्यांच्याच फेसबुक पेज वर करण्यात आलेली एक पोस्ट सापडली.
29th मार्च, 2019 रोजी केलेल्या ह्या पोस्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Cab-E एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि ह्याचा टाटा सोबत काही संबंध नाही.

विश्वास न्यूज ला हीच पोस्ट लिंक्डइन वर देखील केली असल्याचे सापडले.

विश्वास न्यूज ने Cab-E ला पुढच्या टप्प्यात फेसबुक द्वारे संपर्क केला, त्यांनी सांगितले कि आम्ही एक स्वतंत्र कंपनी असून, टाटा चे काहीच योगदान आमच्या कंपनीत नाही. हि पोस्ट खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने व्हायरल मेसेज शेअर करणारे यूजर Smruti Desai चा सोशल बॅकग्राऊंड चेक केला. त्यात कळले कि त्या अहमदाबाद च्या रहिवासी असून त्यांचे 457 मित्र आहे.

निष्कर्ष: टाटा ने नवीन टॅक्सी सेवा सुरु केली नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : TATA has launched new taxi service Cab E in Mumbai & Pune.. better alternative to Ola & Uber… TATA always helps the Nation in difficult times.. I request all of you to share this as much as possible. Download the app on play store.
  • Claimed By : Smruti Desai
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later