
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर काही यूजर ने एका अतिमयात्रेचे छायाचित्र शेअर केले आहे. दावा केला जात आहे कि पुण्याच्या एका डॉक्टरची कोरोनाव्हायरस मुळे मृत्यू झाली आणि काही मुसलमान लोकांनी त्यांचे अंतिम संस्कार केले, कारण त्यांचे मुलं परदेशातून भारतात येऊ शकले नाहीत.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. अंतिमयात्रेचा जो छायाचित्र व्हायरल होत आहे, तो पुण्याचा नसून उत्तर प्रदेश मधल्या मेरठ च्या घटनेचा छायाचित्र आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव रमेश चंद माथूर असे आहे जे एका मंदिराची देख रेख करायचे. पण व्हायरल पोस्ट मध्ये मृतक व्यक्तीचे नाव डॉ रमाकांत जोशी सांगण्यात आले आहे जे पुण्याचे रहिवासी आहेत.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया यूजर ‘Roman Kravencheko’ यांनी व्हायरल छायाचित्र (अर्काइव्ह लिंक) शेअर करून लिहले, “@sinha_ankit9 This is a case of Pune doctor who died because of Covid-19… muslims are performing funeral for this man because his own kids are abroad…his name is Dr Ramakant Joshi.. would you have done this for any muslim?”
अर्थात: हि घटना पुण्याच्या एका लॉयर ची आहे, जे Covid मुळे मृत्युमुखी पडले. काही मुसलमान लोकांनी त्यांचे अंतिम संस्कार केले, कारण त्यांचे मुलं परदेशी असतात. त्यांचे नाव डॉ रमाकांत जोशी असे आहे, तुम्ही कुठल्या मुसलमान व्यक्ती साठी असे केले असते का?
हाच दावा वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया यूजर नि केला आहे.
Kohraam.com या संकेतस्थळावर वापरलेल्या बातमीत पण या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे (अर्काइव्ह लिंक). त्या बातमीत दावा केला आहे कि महाराष्ट्रात असलेल्या पुण्यात कोरोनाव्हायरस च्या संक्रमणने एका डॉक्टर ची मृत्यू झाली त्यानंतर तब्लिघी जमातीच्या लोकांनी येऊन त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.
तपास:
व्हायरल चित्राला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज वापरून सर्च केले, हे छायाचित्र आम्हाला ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या संकेतस्थळावर ३० एप्रिल २०२० रोजी प्रकाशित एका बातमीत सापडले.
बातमीत सांगितल्या प्रमाणे, ‘उत्तर प्रदेश च्या मेरठ मधल्या एका मंदिराचे पुजारी, रमेश माथूर यांच्या मृत्यू नंतर मुसलमानांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. माथूर हे आपल्या बायको आणि मुलं बरोबर मेरठ च्या शाहपीर गेट वसाहतीत राहत असे, जो एक मुसलमान बहुसंख्य क्षेत्र आहे.’
न्यूज सर्च केल्यावर आम्हाला या घटनेची विस्तृत रिपोर्ट, ‘दैनिक जागरण‘ च्या वेबसाईट वर २९ एप्रिल ची एक बातमी आम्हाला सापडली. बातमीत अंतिम यात्रेचे अजून एक छायाचित्र आम्हाला संकेतस्थळावर सापडले. रिपोर्ट प्रमाणे, “शाहपीर गेट स्थित कायस्थ धर्मशाळा निवासी पुजारीच्या मृत्यूनंतर अंतिम यात्रेसाठी त्यांचे नातेवाईक नाही येऊ शकले. आजू-बाजूला राहणाऱ्या मुसलमान समुदायाच्या लोकांनी त्यांच्या पार्थिवाला सुरजकुंड दहनघाटावर नेले.’
रिपोर्ट मध्ये सांगितल्या गेले आहे कि, ‘६८ वर्षीय रमेश माथूर कायस्थ धर्मशाळेत आपल्या पत्नी रेखा हिच्याबरोबर राहत होते. रमेश हे त्या धर्मशाळेची देख-रेख करायचे तसेच तिथल्या चित्रगुप्त मंदिर मध्ये पण पूजा करायचे.’
या माहिती नंतर आम्ही आमचे सहयोगी दैनिक जागरण चे मेरठ चे रिपोर्टर यांच्या सोबत संपर्क केला. सिटी रिपोर्टर ओम वाजपेयी यांनी त्याची पुष्टी करत सांगितले, ‘हे छायाचित्र मेरठ च्या शाहपीर गेट स्थित कायस्थ धर्मशाळा निवासी पुजारीच्या अंतिम यात्रेचे आहे.’
रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि, “रमेश यांच्या आमाशय च्या आतमध्ये गाठ होती. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले. घरी एक छोटा मुलगा चंद्रमौली आणि पत्नी असे दोघे होते. रमेश च्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा आणि पत्नी दोघं असहाय हुन गेले होते. हि बातमी ऐकून शेजारी राहणारे, अकील मिया आले. काही वेळातच संपूर्ण शेजारी धर्मशाळेत जमा झालेत. काही मुसलमान बाईक आल्या आणि त्यांच्या पत्नी ला पण सांभाळले. माहिती मिळताच माजी नगरसेवक हिफ्जुर्रहमान तिथे आलेत. अकील मिया हे काही लोकांना सोबत घेऊन गंगा मोटार कमिटी येथे पोहोचले आणि तिथे अंतिम विधी चा सामान घेऊन आलेत. मुसलमान समाजातल्या लोकांनीच अर्थी तयार केली आणि अग्नी चंद्रमौली याने दिली. सहभागी झालेल्या सगळ्यांनी ‘राम नाम सत्य है’ देखील म्हंटले.”
विश्वास न्यूज ने या अंतिम संस्कारात सहभागी झालेल्या हिजबुर्रहमान यांना संपर्क केला. त्यांनी देखील छायाचित्र बघून सांगितले कि ते रमेश माथूर यांच्या अंतिम संस्काराचे आहे.
त्यानंतर आम्हाला पुण्याच्या कुठल्या डॉक्टर रमाकांत जोशी यांची बातमी आढळते का ते शोधले. त्यात आम्हाला कुठलीच बातमी नाही आढळली.
व्हायरल छायाचित्र चुकीच्या डाव्यांनी शेअर करणाऱ्या इसमाचा प्रोफाइल आम्ही तपासला, यूजर कॅनडा चा रहिवासी आहे आणि प्रोफाइल मध्ये त्याने स्वतःला भारतीय अल्पसंख्यांक आणि इस्लाम वर शोध करणारा म्हंटले आहे.
निष्कर्ष: पुण्याच्या डॉक्टर चे कोरोनाव्हायरस च्या संक्रमणांनी मृत्यू झाली आणि नंतर मुसलमान समाजातील लोकांनी त्यांची अंतिम यात्रा काढली, हा दावा खोटा आहे. व्हायरल छायाचित्र उत्तर प्रदेश च्या मेरठ चे आहे, जिथे एका पुजारी च्या मृत्यूनंतर मुसलमान समाजातल्या लोकांनी अंतिम संस्कार करण्यास मदत केली.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.