Fact Check: न्यूज चॅनेल द्वारे नाही करण्यात आला हा ट्विट, व्हायरल स्क्रीनशॉट खोटा आहे
न्यूज 24 च्या ट्विटर हॅन्डल चा स्क्रीनशॉट खोटा आहे. चॅनेल ने असा कुठलाच ट्विट केला नाही.
- By Vishvas News
- Updated: December 30, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): कानपूर येथील उद्योगपती पीयूष जैन हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे. आता सोशल मीडिया यूजर्स एक स्क्रीनशॉट व्हायरल करत आहे ज्यात दावा केला आहे की न्यूज 24 नावाच्या चॅनेलने पीयूष जैन यांना भाजपचे सदस्य म्हटल्याबद्दल सपा प्रमुख अखिलेश यादव यांची माफी मागितली आहे.
विश्वास न्यूज ने ट्विट च्या स्क्रीनशॉट चा तपास केला, त्यात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. न्यूज चॅनेल च्या ट्विटर हॅन्डल ने असे ट्विट केले नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Ramakant yadav-M.P Sahab वर 26 डिसेंबर रोजी हा स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आला, त्यात लिहले होते: अखिलेश यादव जी News 24 से अनजाने में गलती हुई है, हमने भाजपा के कहने पर आपकी छवि धूमिल किया जिसके लिए हमारा चैनल आपसे माफी मांगता है।
ह्यात स्क्रीनशॉट देखील शेअर केला गेला आहे. स्क्रीनशॉट मध्ये लिहले होते.
स्क्रीनशॉट सोबत यूजर ने लिहले: माननीय अखिलेश यादव से गलती करने पर शिष्टाचार माफी मांगती NEWS24 चैंनल।

तपास:
व्हायरल झालेला स्क्रीनशॉट पाहता त्यात काही चुका असल्याचे आम्हाला समजले. जसे, ‘हमने भाजपा के कहने पर आपकी छवि धूमिल किया।’ असे लिहले आहे जेव्हाकी, ‘ इसमें ‘छवि को धूमिल किया’ किंवा ‘छवि धूमिल की’ असे हवे. ‘धूमिल किया’ नंतर स्वल्पविराम नाही आहे.

अधिक तपास करण्यासाठी, आम्ही Advance Twitter Search ने हे ट्विट शोधले, परंतु आम्हाला 26 डिसेंबर रोजी News24 च्या ट्विटर हँडलवरून असे कोणतेही ट्विट सापडले नाही.

२६ डिसेंबर रोजी न्यूज २४ नि ट्विट केले: This fake screenshot is viral on social media. Pls ignore this.
Please take cognisance
@TwitterIndia @TwitterSupport
यासंदर्भात न्यूज 24 चे वरिष्ठ रिपोर्टर प्रभाकर मिश्रा ह्यांना आम्ही संपर्क केला, ते म्हणाले, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट फोटोशॉपचा वापर करून बनवण्यात आला आहे. चॅनलनेही ट्विट करून हे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.”
फेक स्क्रीनशॉट शेअर करणाऱ्या फेसबुक पेज Ramakant yadav-M.P Sahab चा आम्ही तपास केला. त्यात आम्हाला कळले कि ते एका राजनेतिक कालापासून प्रेरित आहेत. त्यांना 14 हजार लोकं फॉलो करतात. हा पेज 23 अक्टूबर 2014 रोजी बनवण्यात आला.
निष्कर्ष: न्यूज 24 च्या ट्विटर हॅन्डल चा स्क्रीनशॉट खोटा आहे. चॅनेल ने असा कुठलाच ट्विट केला नाही.
- Claim Review : माननीय अखिलेश यादव से गलती करने पर शिष्टाचार माफी मांगती NEWS24 चैंनल।
- Claimed By : Ramakant yadav-M.P Sahab
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com