X

Fact check: रस्त्यावर गाड्या घसरतानाचा व्हिडिओ सानपाडा, नवी मुंबई चा नसून कराची, पाकिस्तान चा आहे

व्हायरल व्हिडिओ ज्यात गाड्या घसरताना दिसतात, तो सानपाडा, नवी मुंबई चा नसून, कराची, पाकिस्तान चा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: June 27, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसला. ह्या व्हिडिओ मध्ये दुचाकी गाड्या रस्त्यावर घसरून पडताना दिसतात. असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ सानपाडा, नवी मुंबई चा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे लक्षात आले. हा व्हिडिओ नवी मुंबई चा नसून, कराची, पाकिस्तान चा आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ सोशल मीडिया वर तसेच युट्युब वर देखील शेअर होत असल्याचे दिसले.

ट्विटर यूजर H Sultan @h_sultan_ ने हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आणि लिहले:

Today at Sanpada station.
@ndtv

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

हा व्हिडिओ युट्युब वर देखील ह्याच दाव्यासह अपलोड केला होता.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात व्हायरल व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड करून व्हिडिओ चे स्क्रीनग्रेब्स घेतले.

आम्ही ह्या स्क्रीनशॉट वर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.

विश्वास न्यूज ला एक रिपोर्ट रिपब्लिक भारत वर सापडली.

ह्या रिपोर्ट चे शीर्षक होते: Pakistan: Several Motorcyclists Fall On Slippery Road In Karachi Amid Heavy Rain; Watch

ह्या रिपोर्ट मध्ये ह्या घटनेचा व्हिडिओ देखील होता.

आम्हाला डेली पाकिस्तान नावाच्या एका वेबसाईट वर देखील हि रिपोर्ट सापडली. शीर्षक होत: Watch: Scores of bikes skid as first monsoon rain turns Karachi roads to ‘butter’

विश्वास न्यूज ला काही व्हिडिओस पाकिस्तानी ट्विटर हॅन्डल्स वर देखील अपलोड केलेला दिसला. एका व्हिडिओ मध्ये पाकिस्तान रिपब्लिक चा लोगोची देखील होता.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने पाकिस्तान मधील पत्रकार, सागर सुंहिंडेरो जे डॉन न्यूज साठी काम करतात. त्यांनी सांगितले कि हि घटना कराची, सिंध ची राजधानी कराची, पाकिस्तान येथील आहे. हा एरिया रशीद मिन्हास रोड, गुलिस्तान -ए-जोहर पाशी आहे. त्या एरिया चे काही चित्र देखील त्यांनी आमच्या सोबत शेअर केले.

शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. यूजर चे २२८ फॉलोवर्स आहेत आणि त्यांनी 2015 साली ट्विटर वर अकाउंट सुरु केले.

निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यात गाड्या घसरताना दिसतात, तो सानपाडा, नवी मुंबई चा नसून, कराची, पाकिस्तान चा आहे.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later