X

Fact Check: जपानने वॅक्सीन रोलआउट थांबवले नाही, व्हायरल दावा खोटा आहे

व्हायरल दावा ज्यात सांगण्यात आले कि जपान ने लस देणे थांबवले आणि ivermectin चा वापर सुरु केला, खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 22, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूजला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करण्यात येत आहे जी एखाद्या आर्टिकल च्या स्क्रीनशॉटसारखी दिसत होती. लेखात असा दावा करण्यात आला आहे, “जपानने वॅक्सीन रोलआउट थांबवला, Ivermectin चा वापर करून, जवळजवळ रात्रभर कोविड समाप्त करण्यात आले”. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Wayne Kennedy ह्यांनी एक आर्टिकल चा स्क्रीनशॉट 20 नोव्हेंबर रोजी आपल्या प्रोफाइल वर शेअर केले. आर्टिकल मध्ये लिहले होते, “Japan drops vax rollout, goes to Ivermectin, ENDS COVID almost overnight.”

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात व्हायरल पोस्ट ला निरखून पाहण्यापासून केली. आर्टिकल halturnerradioshow.com ह्या वेबसाईट वर 27 ऑक्टोबर रोजी पब्लिश करण्यात आला होता.

हे आर्टिकल इथे वाचा.

आम्ही हि बातमी कुठल्या न्यूज मीडिया ऑर्गनायझेशन ने कव्हर केली का ते सुद्धा बघितले पण आम्हाला हे आर्टिकल कुठेच सापडले नाही.

जपान च्या सरकारी वेबसाईट प्रमाणे, “The Government recommends that people get vaccinated because the benefits of vaccination are greater than the risk of side reactions.

आम्हाला Japan’s Pharmaceuticals and Medical Devices Agency ह्या वेबसाईट वर ‘ivermectin‘ च्या उपयोगाचा कुठेच उल्लेख सापडला नाही.

तपासाच्या शेवटच्या तपासात विश्‍वास न्यूजने जपानमधील प्रथम भारतीय वंशाचे आशियाई वंशाचे विधानसभा सदस्य योगेंद्र पुराणिक यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “जपान लस पासपोर्ट डिजिटलायझेशनवर लक्ष केंद्रित करत आहे, जपानी लसीचे पासपोर्ट स्वीकारण्यासाठी अधिक देशांशी करार केला आहे आणि 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फेब्रुवारी 2022 पासून लसीकरण सुरू करण्याचे घोषित केले आहे. जपानने लसींचा वापर थांबवला नाही.”

आम्ही फेसबुक यूजर, ‘Wayne Kennedy’ हे अलाबामा मध्ये राहतात.

निष्कर्ष: व्हायरल दावा ज्यात सांगण्यात आले कि जपान ने लस देणे थांबवले आणि ivermectin चा वापर सुरु केला, खोटा आहे.

  • Claim Review : Japan drops vax rollout, goes to Ivermectin, ENDS COVID almost overnight.
  • Claimed By : Wayne Kennedy
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later