X

Fact Check: हत्तीने एका वाघिणीचे पिल्ल घेतले, असे दर्शवणारे चित्र खोटे आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि एप्रिल फूल्स डे च्या निमित्ताने 2018 साली बनवण्यात आलेली खोटी पोस्ट आता परत एप्रिल फूल्स डे 2022 च्या जवळ पास व्हायरल होत आहे. व्हायरल चित्र खरे नाही, एडिटेड आहे.

  • By Vishvas News
  • Updated: March 30, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक छायाचित्र व्हाट्सअँप आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होताना दिसले. ह्या चित्रात एक हत्ती, वाघिणीच्या पिल्लाला सोंडेत नेताना दिसतो तसेच, वाघीण त्याच्या बाजूने चालताना दिसते. ह्या चित्रांद्वारे सांगण्यात येत आहे कि माणसाने प्राण्यांकडून शिकावे असे खूप आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र एडिटेड असल्याचे समजले, तसेच 2018 साली हे चित्र एप्रिल फूल्स डे च्या दृष्टीने बनवण्यात आले होते असे समजले.

काय होत आहे व्हायरल?

एक युट्युब चॅनेल, ‘Vichitra Dunia’ ने फेब्रुवारी 14, 2022 रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यात १ मिन १३ सेकंदांवर हे चित्र शेअर केले. ह्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले, ‘This photo has been shared hundreds of thousands of times on social networks this week, with a caption explaining that it shows an elephant helping a mother lion by carrying her tired baby in the crook of his trunk.’

मराठी अनुवाद: हा फोटो सोशल मीडियावर या आठवड्यात शेकडो हजारो वेळा शेअर करण्यात आला आहे, एका कॅप्शनसह हे स्पष्ट केले आहे की यात एक हत्ती तिच्या थकलेल्या बाळाला त्याच्या सोंडेत घेऊन आई सिंहाला मदत करताना दिसत आहे.

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून तपास सुरु केला.

आम्हाला हे चित्र मुंबई मिरर च्या आर्टिकल मध्ये सापडले. ह्याचे शीर्षक होते: An elephant, a lioness, a cub and an April Fool’s joke.

आर्टिकल मध्ये सांगण्यात आले होते कि हे चित्र एप्रिल फूल चा जोक म्हणून Kruger National Park च्या ट्विटर हॅन्डल कडून शेअर करण्यात आले होते.

हे आर्टिकल इथे वाचा.

विश्वास न्यूज ला हे चित्र Kruger National Park च्या ओरिजिनल ट्विटर हॅन्डल Kruger Sightings, @LatestKruger वर देखील सापडले.

त्यात इंग्रजीत लिहले होते: We were following a lioness carrying her cub & she was getting really tired. An elephant showed up wanting to help the lioness. The elephant put its trunk down, the cub jumped up & the elephant carried the lion cub!!
S28, 3km from S entrance
Tinged by Sloof Lirpa

हे चित्र एप्रिल 1, 2018 रोजी अपलोड करण्यात आले होते.
कॅप्शन मधल्या शेवटच्या दोन शब्दांना ‘Sloof Lirpa’ ला उलटे वाचल्यास ‘April Fools’ असे दिसते.

आम्हाला ह्या पोस्ट च्या कमेंट सेक्शन मध्ये, भारतीय आयएफएस परवीन कासवान ह्यांचा एक कमेंट सापडला ज्यात त्यांनी हि पोस्ट कशी बनवली गेली असावी हे सांगितले आहे.

विश्वास न्यूज ला Nadav Ossendryver जे @LatestKruger पेज चालवतात, सीईओ, Kruger Sightings ह्यांचा देखील एक ट्विट सापडला. त्यांनी लिहले होते: Yesterday I shared an April Fool’s joke that went super viral.
It reached a total of 6million people with an engagement coming in every 0.5 seconds!

It took a lot of planning, so here is how to make your April
Fool’s go viral

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने Nadav Ossendryver ह्यांना ट्विटर द्वारे संपर्क केला. त्यांनी मान्य केले कि हि पोस्ट खोटी आहे आणि छायाचित्र एडिट केलेले आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही युट्युब पेज चा तपास केला. त्यात कळले कि Vichitra Dunia चे सध्या तरी कुठलेच स्बस्क्राइबर्स नाहीत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि एप्रिल फूल्स डे च्या निमित्ताने 2018 साली बनवण्यात आलेली खोटी पोस्ट आता परत एप्रिल फूल्स डे 2022 च्या जवळ पास व्हायरल होत आहे. व्हायरल चित्र खरे नाही, एडिटेड आहे.

  • Claim Review : मराठी अनुवाद: हा फोटो सोशल मीडियावर या आठवड्यात शेकडो हजारो वेळा शेअर करण्यात आला आहे, एका कॅप्शनसह हे स्पष्ट केले आहे की यात एक हत्ती तिच्या थकलेल्या बाळाला त्याच्या सोंडेत घेऊन आई सिंहाला मदत करताना दिसत आहे.
  • Claimed By : Vichitra Dunia
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later