X

Fact Check: तामिळ नाडू च्या विद्यार्थ्यांनी जगातील सगळ्यात छोटे सॅटेलाईट नुकतेच बनवले, व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात आलेली घटना कि चेन्नई च्या विद्यार्थ्यांनी जगातील सगळ्यात छोटा सॅटेलाईट लाँच केला आहे, हि जुनी आहे आताची नाही.

  • By Vishvas News
  • Updated: March 25, 2022

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला फेसबुक वर एक पोस्ट दिसली, पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि तामिळ नाडू च्या विद्यार्थ्यांने नुकतेच जगातील सगळ्यात छोटे सॅटेलाईट चे निर्माण केले आहे ज्याला नासा ने लाँच केले. ह्या पोस्ट मध्ये असा देखील दावा करण्यात आला कि देशातील मीडिया काश्मीर फाईल्स चित्रपट कव्हर करण्यात इतकी व्यस्त आहे कि ते हि घटना दाखवत नाही आहेत.
विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल दावा जुनी घटना असल्याचे समजले. हे चित्र देखील जुने आहे. चेन्नई च्या विद्यार्थ्यांनी जगातील सगळ्यात छोटे सॅटेलाईट 2017 साली बनवले होते आता नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Mubeen Vaskar ने एक पोस्ट फेसबुक ग्रुप धर्म मराठी ( DHARM – marathi ) वर 24 मार्च रोजी शेअर केले. फेसबुक पोस्ट वर ANI देखील लिहले होते. यूजर ने दावा केला: भारत ने कल इतिहास रच दिया जब तमिलनाडु की 18 वर्षीय विद्यार्थी रिफात फारुक द्वारा तैयार किए गए दुनिया के सबसे छोटे सैटलाइट को ‘NASA’ ने लांच किया.
भूतपूर्व राष्ट्रपति कलाम साहब को सम्मान देते हुए इस सैटेलाइट का नाम ‘Kalamsat’ रखा गया है. इसका वजन सिर्फ 64 ग्राम है.
लेकिन भारत की गोदी मीडिया ‘कश्मीर फाइल’ खेलने में व्यस्त है.

मराठी अनुवाद: काल भारताने इतिहास रचला जेव्हा ‘NASA’ ने तामिळनाडूमधील 18 वर्षीय विद्यार्थ्याने रिफत फारूकने डिझाइन केलेला जगातील सर्वात लहान उपग्रह प्रक्षेपित केला.
माजी राष्ट्रपती कलाम साहेबांच्या स्मरणार्थ या उपग्रहाला ‘कलामसेट ‘ असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वजन फक्त 64 ग्रॅम आहे.
पण भारताची गोदी मीडिया ‘काश्मीर फाइल’ दाखवण्यात व्यस्त आहे.

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास गूगल इमेज सर्च सोबत केला.

आम्हाला हे छायाचित्र ANI च्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वर शेअर केलेले दिसले.

पोस्ट मध्ये लिहले होते: Chennai: Students who built the world’s smallest satellite, rejoice after its launch. The satellite weighing 64 grams was launched by NASA.

ह्या पोस्ट मध्ये तीन चित्र दिसत होते जे जून 22, 2017 रोजी पोस्ट केले होते.

साधे किवर्ड सर्च केल्यावर आम्हाला हि बातमी विविध मीडिया वेबसाईट्स वर सापडली.

द इंडियन एक्सप्रेस ची एक बातमी, ‘NASA launches world’s smallest satellite designed by 18-year old Tamil Nadu student’ आम्हाला सापडली, ज्यात दिले होते, “तामिळनाडूचा १८ वर्षीय विद्यार्थी रिफथ शारूक आणि त्याच्या टीमने तयार केलेला जगातील सर्वात लहान उपग्रह नासाने प्रक्षेपित केल्यानंतर भारताने गुरुवारी इतिहास रचला. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून कलामसॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहाचे वजन सुमारे ६४ ग्रॅम आहे.”

हि बातमी जून 23, 2017 रोजी केली होती. हि बातमी इथे वाचा.

india.com ने देखील हि बातमी जून 22, 2017 रोजी केली होती.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात, चेन्नई मधील ANI करस्पॉण्डेण्ट रोनाल्ड जाबराज ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितलं कि हि बातमी आताची नाही. “हि बातमी जुनी आहे आणि Kalamsat सॅटेलाईट जून 2017 मध्ये बनवण्यात आले होते. मी Rifath Sharook ह्यांचा इंटरव्यू देखील केला होता,” असे ते म्हणाले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट करणाऱ्या फेसबुक यूजर चा बॅकग्राऊंड चेक केला, त्यात कळले कि व्हायरल पोस्ट करणारे Mubeen Vaskar रोहे, महाराष्ट्राचे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात आलेली घटना कि चेन्नई च्या विद्यार्थ्यांनी जगातील सगळ्यात छोटा सॅटेलाईट लाँच केला आहे, हि जुनी आहे आताची नाही.

  • Claim Review : काल भारताने इतिहास रचला जेव्हा 'NASA' ने तामिळनाडूमधील 18 वर्षीय विद्यार्थ्याने रिफत फारूकने डिझाइन केलेला जगातील सर्वात लहान उपग्रह प्रक्षेपित केला. माजी राष्ट्रपती कलाम साहेबांच्या स्मरणार्थ या उपग्रहाला 'कलामसेट ' असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वजन फक्त 64 ग्रॅम आहे. पण भारताची गोदी मीडिया 'काश्मीर फाइल' दाखवण्यात व्यस्त आहे.
  • Claimed By : Mubeen Vaskar
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later