X

Fact-check: सुप्रीम कोर्टानी आपले बोधवाक्य बदलले नाही, व्हायरल दावे खोटे आहे

सुप्रीम कोर्टानी आपले बोधवाक्य बदलले नाही. ते आधी पासूनच ‘यतो धर्मस्ततो जयः’ हेच आहे. केलेले दावे खोटे आहे.

  • By Vishvas News
  • Updated: August 25, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काही दिवसांपासून एक दावा सगळ्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट वर व्हायरल होत आहे. केलेल्या दाव्यांमध्ये असे सांगण्यात येत आहे कि सुप्रीम कोर्टाने आपले बोधवाक्य, ‘सत्यमेव जयते’ असे बदलून, ‘यतो धर्मस्ततो जय:’ असे केले आहे . विश्वास न्यूज च्या तपासात केलेला दावा खोटा ठरला.

काय होत आहे व्हायरल:
Raj Vasava (indegenous) यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइल वर प्रोफाइल वर पोस्ट शेअर केली, “We are going back in 18th century again… So no more सत्यमेव जयते। now यतो धमॅस्ततो जयः onwards. Shame on you dictator.”
अर्थात: आपण परत १८ व्या शतकाकडे वाटचाल करत आहो. आता सत्यमेव जयते नाही यतो धमॅस्ततो जयः. तानशाही चा धिक्कार असो.
हा दावा त्यांनी सुप्रीम कोर्ट च्या वेबसाईट च्या स्क्रीनशॉट सोबत शेअर केला.
या ट्विट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
पासाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही, दावा केलेला वाक्य कीवर्ड म्हणून वापरला, “यतो धर्मस्ततो जय:” वापरून गूगल वर सर्च केले. रिसल्ट च्या पहिल्याच पानावर आम्हाला “यतो धर्मस्ततो जय” हे सुप्रीम कोर्टचे बोधवाक्य असल्याचे दिसले.

विश्वास न्यूज ला आता खात्री पटली होती कि ‘यतो धर्मस्ततो जय:’ हेच सुप्रीम कोर्ट चे बोधवाक्य आहे.
नंतर, आम्ही कुठे सुप्रीम कोर्टाने बोधवाक्य बदलल्याचे न्यूज रिपोर्ट सापडतात का ते बघितले, पण विश्वास न्यूज ला कुठेच अश्या बातम्या आढळल्या नाहीत.

विश्वास न्यूज ने, सुप्रीम कोर्टाचे संकेतस्थळ देखील बघितले, तिथे आपल्याला सहज सुप्रीम कोर्टाच्या खाली त्याचे बोधवाक्य लिहलेले दिसते.

सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट वर आम्हाला, ‘म्युसियम’ हे ऑप्शन डाव्या बाजूला दिसले. त्यात सुप्रीम कोर्टाची संपूर्ण माहिती मिळते.
एका डॉक्युमेंट मध्ये ‘history of Supreme Court of India’ (सुप्रीम कोर्टचा इतिहास) त्यात असे लिहलेले सापडले:
DHARMA CHAKRA LOGO OF THE SUPREME COURT: Its design is reproduced from the wheel that appears on the abacus of the
Sarnath Lion capital of Ashoka with 32 spokes. The inscription in Sanskrit “yatodharmastato jayah” means – Truth alone I uphold. It is also referred to – as the wheel of righteousness, encompassing truth, goodness and equity
.

हि संपूर्ण माहिती इथे वाचा.

\तसेच अजून एका डॉक्युमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाच्या इतिहासाची तशीच त्याच्या बोधवाक्याची माहिती दिली होती.
त्यात दिल्या प्रमाणे: “The ground floor Gallery traces the history of Indian legal system from ancient period to British time. It depicts Indian legal system through various periods with the help of relevant texts, artifacts and other exhibits. An impression is created at the entrance of ground floor by displaying the logo of the Supreme Court (Dharamchakra upheld by the Lion Capital of 3rd Century B.C.) in an appropriate ambience.

हे डॉक्युमेंट इथे वाचा.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने सुप्रीम कोर्ट चे वकील, ऍडव्होकेट प्रशांत पटेल यांच्या सोबत संपर्क साधला. मार्च २०१५ मध्ये आपल्या २१ आमदारांना संसदीय सचिवांच्या नियुक्तीच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाला उलट करण्यासाठी अ‍ॅड प्रशांत पटेल यांनी वर्षभर लढाई लढवली.
पटेल यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, सुरुवातीपासूनच (१९५०) सुप्रीम कोर्ट चे बोधवाक्य ‘यतो धर्मस्ततो जयः’ हेच आहे, सत्यमेव जायते नाही.

शेवटी आम्ही दावा करण्याऱ्या व्यक्ती चे प्रोफाइल तपासलॆ. ट्विटर यूजर Raj Vasava (Indigenous) हे BTP चे उपाध्यक्ष असल्याचे आम्हाला समजले. त्यांना ३,८१२ लोक फोल्लो करतात.

निष्कर्ष: सुप्रीम कोर्टानी आपले बोधवाक्य बदलले नाही. ते आधी पासूनच ‘यतो धर्मस्ततो जयः’ हेच आहे. केलेले दावे खोटे आहे.

  • Claim Review : We are going back in 18th century again... So no more सत्यमेव जयते। now यतो धमॅस्ततो जयः onwards. Shame on you dictator.
  • Claimed By : Raj Vasava (Indegenous)
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later