
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नुकतेच ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) चे सरसंघचालक मोहन भागवत यांना नागपुरात भेटले. या सगळ्या रिपोर्ट्स च्या मध्ये, एक ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त यांचे छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि मोहन भागवत आहेत. जेव्हाकी बॅरी ओ’ फॅरल हे ज्यांना नमस्कार करत आहे ते मोहन भागवत नाहीत. विश्वास न्यूजच्या तपासात असे समजले कि व्हायरल छायाचित्रात ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त यांच्यासोबत मोहन भागवत नसून विकास तेलंग आहेत.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्युज ला व्हायरल होत असलेले छायाचित्र, Megh Updates @MeghUpdates यांच्या ट्विटर प्रोफाइल वर दिसले. यूजर नि व्हायरल छायाचित्र शेअर करून लिहले होते, “In a Burnol Movement Australian High Commissioner meets @RSSorg Chief Dr Mohan Bhagwat and acknowledges the Organisation’s work in #Covid relief“
अर्थात: बरनॉल मोमेन्ट, ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल हे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांना भेटले, आणि संघाचे महामारी च्या काळातील कामाची प्रशंसा केली.
हि पोस्ट आणि आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सध्या कीवर्ड सर्च ने केली आणि ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल यांची संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत नागपुरात झालेल्या भेटीची कुठे माहिती आणि बातमी मिळते का हे बघितले.
विश्वास न्यूज ला द इकॉनॉमिक टाइम्स मध्ये प्रकाशित एक बातमी मिळाली, ज्यात ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल यांनी मोहन भागवत यांची नागपुरात भेट यावर विस्तृत माहिती दिली.
हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
या रिपोर्ट मधेच आम्हाला, ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर शेअर केलेले ट्विट्स देखील आम्हाला मिलाले. व्हायरल होणारे छायाचित्र हे देखील त्या ट्विट मध्ये होते.
या छायाचित्रांना निरखून पाहिल्यास असे लक्षात आले, कि शेअर केलेल्या तीन छायाचित्रांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आहेत, पण एका छायाचित्रात मोहन भागवत नाहीत. शरीर यष्टी वरून देखील ते मोहन भागवत नसल्याचे लक्षत आले.
आम्ही हे छायाचित्र परत निरखून बघितले आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे मुख्यालय याचे छायाचित्र इंटरनेट वर शोधले. आम्हाला नागपुरात संघाच्या दोन प्रमुख इमारती असल्याचे लक्षात आले. नागपुरात महाल मध्ये संघाचे मुख्यालय आहे आणि रेशीमबाग, नागपुरात हेडगेवार स्मृती मंदिर आहे. आम्हाला रिपोर्ट्स द्वारे आणि छायाचित्रांद्वारे हे माहिती होते कि ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल हे मोहन भागवत यांना महाल कार्यालयात भेटलेत. आणि तसेच चौथे छायाचित्र हे निरखुन बघितल्यास असे लक्षात आले कि ते स्मृती मंदिर परिसर रेशीमबागेतले आहे.
आम्ही हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातल्या अधिकाऱ्यांसोबत तपासाच्या शेवटच्या टप्प्यात संवाद साधला. त्यात आम्हाला असे कळले कि व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल यांच्या सोबत हेडगेवार स्मारक समिती चे व्यवस्था प्रमुख विकास तेलंग आहेत. विश्वास न्यूज सोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले कि, “ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल यांच्या सोबत व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात मी आहे मोहन भागवत नाही, पण त्यांनी शेअर केलेल्या बाकीच्या छायाचित्रात मोहन भागवतच आहेत. इतर छायाचित्रात ते स्पष्ट दिसतात.”
आम्ही Megh Updates या ट्विटर प्रोफाइल चे सोशल स्कॅनिंग केले त्यात असे कळले कि हे अकाउंट २०१९ साली बनवण्यात आले. त्याचे ४८.८K इतके फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: व्हायरल छायाचित्रात ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत नसून हेडगेवार स्मारक समिती चे व्यवस्था प्रमुख विकास तेलंग हे आहे. व्हायरल छायाचित्र दिशाभूल करणारे आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.