
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या दोन छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात आसाम चे काँग्रेस नेता अमजात अली यांच्या सफरचंद च्या पेटी मधून हत्यार आणि गोळ्या मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले गेले. विश्वास न्यूज ने या आधी पण या छायाचित्राचे तपास केले. त्यात देखील हे छायाचित्र खोटे ठरले होते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Anurag Agnihotri यांनी हि पोस्ट २ नोव्हेंबर रोजी हि पोस्ट अपलोड केली. पहिल्या छायाचित्रात काही सुरक्षाकर्मी सोबत एक व्यक्ती दिसतो आणि दुसऱ्या छायाचित्रात एक सफरचंदाची पेटी दिसते ज्यात हत्यार दिसतात. या छायाचित्रासोबत लिहले होते, “#असम के कांग्रेस नेता अमजात अली सेब की पेटी में हथियार और गोलियां के साथ हिरासत में। काफिरो को मारने का कर रहा था प्लान। पुलिस ने दबोचा।। इनकी पूरी तैयारी है #हिंदुओ“
अर्थात: आसाम चे काँग्रेस नेता अमजात अली यांच्या सफरचंदाच्या पेटिट हत्यार आणि गोळ्या मिळाल्या. काफिरांना मारायचा करत होते प्लॅन. पोलिसांनी त्यांना पकडले.
व्हायरल पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल छायाचित्राचा तपास करण्यासाठी आम्ही दोन्ही छायाचित्रांना वेगळे वेगळे क्रॉप करून गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये सर्च केले. पहिले छायाचित्र सर्च केल्यावर आम्हाला ते बंगाली मध्ये लिहलेल्या एका ब्लॉग मध्ये हे छायाचित्र सापडले. त्या ब्लॉग प्रमाणे, “मुबारक हुसेन नावाच्या एका टीचर यांना यौन उत्पीहड़न च्या आरोपात २०१८साली बांगलादेश मध्ये ताब्यात घेतले गेले.”
दुसऱ्या छायाचित्राला जेव्हा आम्ही गूगल रिव्हर्स इमेज मध्ये सर्च केले, ते आम्हाला, greatkashmir.com या लिंक वर मिळाले. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी पब्लिश एका बातमीत हे छायाचित्र आम्हाला सापडले. कॅप्शन मध्ये लिहले होते, “श्रीनगर के बाहरी इलाके में बड़ी मात्रा में हथियार बरामद हुए हुए।”
या नंतर आम्ही आसाम प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वेबसाईट वर अमजात अली नावाच्या नेत्या बद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला. आम्हाला कुठेच अश्या कुठल्या नेत्याचे नाव नाही मिळाले.
आम्ही या बातमीच्या पुष्टी साठी आसाम काँग्रेस समिती चे अध्यक्ष, रिपून बोरा यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि या पोस्ट मध्ये काहीच तथ्य माही आहे. अमजात अली नावाचा कुठलाच नेता आसाम काँग्रेस मध्ये नाही आहे.
शेवटी आम्ही खोटी पोस्ट पसरवणाऱ्या यूजर चे सोशल सकॅनिंग केले. Anurag Agnihotri हे दिल्ली चे रहिवासी आहे.
पूर्ण तपास इथे बघा.
निष्कर्ष: आमच्या तपासात असे कळले कि हे छायाचित्र जे आसाम च्या नेत्याचे सांगून व्हायरल केले जात आहे, ते बांगलादेश च्या एका मदरसाच्या टीचर चे आहे. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.