X

Fact Check: सेने द्वारे दगडफेक करणाऱ्यांवर गोळ्या चालवल्यास एफआयआर न केल्यागेल्याचा दावा खोटा

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि सुप्रीम कोर्टाने असे कोणतेच आदेश नाही दिले आहेत ज्यात सांगितले गेले आहे कि जर सेनेच्या लोकांनी दगडफेक करणाऱ्यांवर फायरिंग केली तर त्यांच्यावर एफआयआर होणार नाही. व्हायरल दावा खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: February 19, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात सुप्रीम कोर्टाचा संदर्भ देऊन दावा केला जात आहे कि, सेने वर दगडफेक करणाऱ्यांवर सरळ गोळी चालवल्यास कुठलाच एफआयआर करण्यात येणार नाही. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. तपासात कळले कि सुप्रीम कोर्टाकडून असा कुठलाच निर्णय देण्यात आला नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘‘Rajesh Barnwal’ ने ‘सौ करोड़ हिंदुओ का समूह समूह से जुड़ते ही अपने 50 मित्रो को जोड़े’ नावाच्या एका ग्रुप वर पोस्ट शेअर करून लिहले, ‘सेना पर पत्थर चलाने वालों को सीधा गोली मारने पर भी कोई FIR नही होगी- सुप्रीम कोर्ट। जय हिन्द’.

पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
सोशल मीडिया वर बरेच यूजर हाच खोटा दावा शेअर करत आहेत.

तपास:
आपल्या तपासाची सुरुवात विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी कीवर्डस टाकून न्यूज सर्च करून व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यास केले. सर्च मध्ये आम्हाला सुप्रीम कोर्ट तर्फे देण्यात आलेला कुठलाच निर्णय दिसला नाही, जो व्हायरल दावा खरे असल्याचे सांगेल.

दैनिक जागरण च्या वेबसाईट वर १२ फेब्रुवारी २०१८ आम्हला एक बातमी मिळाली. या बातमी प्रमाणे, “श्रीनगर च्या शोपियाँ मध्ये २७ जानेवारी रोजी सेनेच्या ताफ्यावर हिंसक गर्दी ने केलेल्या हल्ला आणि दगडफेकी ला थांबवण्यासाठी सेने द्वारे फायरिंग केली गेली ज्यात दोन लोकांची मृत्यू झाली. या बाबतीत जम्मू-काश्मीर पोलीस ने सैन्याच्या ताफ्याचे नेतृत्व करणारे मेजर आदित्य यांच्या विरुद्ध रणवीर पैनल कोड ची धारा 336, 307 आणि 302 अंतर्गत एफआयआर प्रविष्ट केली. पण सुप्रीम कोर्टाने मेजर आदित्य कुमार यांच्या विरुद्ध कारवाई थांबवली आहे”, संपूर्ण बातमी इथे वाचा.

फेब्रुवारी २०१८ मध्ये हिंसक गर्दी वर फायरिंग करणारे आरोपी मेजर आदित्य यांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एफआयआर थांबवली आहे. आता या संदर्भात खोटा दावा शेअर करण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्ट च्या वेबसाईट वर आम्हाला असा कुठलाच निर्णय दिसला नाही, जो दावा व्हायरल पोस्ट मध्ये केला गेला असेल.

विश्वास न्यूज ने अजून पुष्टी करून घेण्यास, दैनिक जागरण चे लीगल ब्युरो हेड माला दीक्षित यांना संपर्क केला आणि त्यांच्या सोबत व्हायरल पोस्ट शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हि पोस्ट खोटी आहे. सुप्रीम कोर्टाने असा कोणताच निर्णय दिला नाही. विश्वास न्यूज सोबत मेजर आदित्य कुमार च्या केस बद्दल बोलताना त्यांनी सांगितले कि हे प्रकरण २०१८ चे आहे जेव्हा मेजर आदित्य कुमार यांच्या घरच्यांच्या अर्जानंतर कारवाई थांबवली. हे फक्त याच केसबद्दल आहे. आता याला सुप्रीम कोर्टाचा संदर्भ देऊन, व्हायरल करून हे म्हंटले जात आहे कि दगडफेक करणाऱ्यांवर गोळी चालवली तरी सेने वर एफआयआर करण्यात येणार नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर असे झाले असते तर हि खूप मोठी बातमी झाली असती.

पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Rajesh Barnwal चे सोशल स्कॅनिंग केल्यावर आम्हाला कळले कि यूजर ला २०७ लोकं फोल्लो करतात. यूजर उत्तर प्रदेश चा रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि सुप्रीम कोर्टाने असे कोणतेच आदेश नाही दिले आहेत ज्यात सांगितले गेले आहे कि जर सेनेच्या लोकांनी दगडफेक करणाऱ्यांवर फायरिंग केली तर त्यांच्यावर एफआयआर होणार नाही. व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : सेने द्वारे दगडफेक करणाऱ्यांवर गोळ्या चालवल्यास एफआयआर नाही करणार
  • Claimed By : Rajesh Barnwal
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later