
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे, यात एका शीख शेतकऱ्यावर एक पोलीसकर्मी लाठी उचलताना दिसतो. त्या शेतकऱ्याच्या बरोबर मागे एक पोस्टर बघितले जाऊ शकते. या पोस्टर मध्ये नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दिसते, ज्यात लिहले आहे, “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अबकी बार मोदी सरकार”
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि शेतकरी आंदोलनाच्या खऱ्या छायाचित्रासोबत खोडतोड करून नरेंद्र मोदी यांचे पोस्टर चिपकवण्यात आले आहे. खरे छायाचित्र लाठीचार्ज चे आहे, यात कोणतेच पोस्टर नाही. तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. छायाचित्राला एडिट करून आता व्हायरल केले जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर अजहर सिद्दीकी ने ३ डिसेंबर रोजी एक फोटो अपलोड केले आणि लिहले:
“पीछे तो देखो. बहुत हुआ किसान पर अत्याचार. अबकी बार मोदी सरकार. वाह र दोगली सरकार. #farmersprotestchallenge”
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये अपलोड करून सर्च करण्यास सुरुवात केली. खरे छायाचित्र आम्हाला बऱ्याच न्यूज वेबसाईट्स वर सापडले. ओरिजिनल छायाचित्रात कुठेच नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दिसत नाही आहे. बीबीसी च्या वेबसाईट वर या छायाचित्रावरून सांगण्यात आले कि हे छायाचित्र पीटीआय चे रवी चौधरी यांनी काढले आहे. रवी चे हे छायाचित्र शेतकरी आंदोलनामधील सगळ्यात चर्चेत असलेल्या छायाचित्रांपैकी एक आहे. हे छायाचित्र तुम्ही इथे बघू शकता.
रवी चौधरी यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर देखील आम्हाला हे छायाचित्र सापडले. अजून माहिती जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूज ने फोटो जर्नलिस्ट रवि चौधरी यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल छायाचित्र सिंघू बॉर्डर चे आहे. तिथे असे कुठलेच पोस्टर लागले नव्हते, जसे व्हायरल छायाचित्रात दिसत आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही, अजहर सिद्दीकी यांच्या अकाउंट चे सोशल स्कॅनिंग केले, ज्यांनी हे खोटे छायाचित्र अपलोड केले होते. आम्हाला असे कळले कि या अकाउंट ला ५३१ लोकं फोल्लो करतात. आम्हाला त्यांच्या अकाउंट वर व्हायरल कन्टेन्ट जास्ती प्रमाणात मिळाले.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. लाठीचार्ज च्या छायाचित्राला एडिट करून एक वेगळे पोस्टर जोडण्यात आले आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.