
नवी दिल्ली (विश्वास टीम): सोशल मीडिया वर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ) लोकांना घर बसल्या काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देत आहे. पोस्ट मध्ये पुढे सांगण्यात आले आहे कि या कामासाठी कुठल्यापण अनुभवाची गरज नाही. आपण फक्त २-३ तास काम करून ५-१०० डॉलर कमाऊ शकता. विश्वास न्यूज ने या पोस्ट चा तपास केला आणि पोस्ट खोटी असल्याचे लक्षात आले.
काय होत आहे व्हायरल?
एका सोशल मीडिया पोस्ट वर लिहले गेले आहे:
JOB AT WORLD HEALTH ORGANISATION
Help us fight CORONAVIRUS by working from home – No experience required SMS sending JOB
Work 2-3 hours daily on mobile
and earn $5-$100 daily
Click Here And Apply Now
https://bit.ly/3emUkei
Vacancy till 31st july, 2020.
अर्थात:
जागतिक आरोग्य संस्था येथे काम करा आणि घर बसल्या आम्हाला कोरोनाव्हायरस सोबत लढण्यास मदत करा- कुठल्याही एक्सपेरियन्स जी गरज नाही फक्त एसएमएस पाठवा.
मोबाईल वरून २-३ तास काम करा
आणि ५-१०० डॉलर कंवा
वॅकन्सी फक्त ३१ जुलै, २०२० पर्यंत
पोस्ट ची अर्चाइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ) च्या ऑफिशिअल वेबसाईट वर या नौकरी संबंधी कुठली जाहिरात आहे का हे सर्च केले. अशी कुठलीही नौकरी संबंधित जाहिरात डब्ल्यूएचओ च्या संकेतस्थळावर नव्हती.
डब्ल्यूएचओ च्या सोशल मीडिया प्रोफाइल वर पण अशी कुठली पोस्ट नव्हती.
त्या पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर देखील आम्ही क्लिक करून बघितले.
आवेदनात आपलं नाव आणि आडनाव लिहण्यास सांगितले होते. आम्ही तसे केले, त्या नंतर आम्हाला एक संदेश मिळाला, ज्यात लिहले होते, “हि न्यूज आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा जेणे करून त्यांना देखील नौकरी मिळेल. ह्या नौकरी बद्दलची माहिती तुम्ही कमीत कमी आपल्या १४ व्हाट्सअँप च्या मित्रांसोबत शेअर करावी लागेल.“
आम्ही whois टूल चा वापर करून वेबसाईट च्या विवरण चा तपास केला, आम्हाला असे कळले कि हि वेबसाईट १९ फेब्रुवारी, २०१९ रोजी बनवली गेली होती.
आम्ही WHO च्या अधिकाऱ्यांना पण संपर्क केला, त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हंटले, “डब्ल्यूएचओ नि नौकरी संदर्भात कुठलीही जाहिरात दिलेली नाही.”
डब्ल्यूएचओ च्या युगांडा च्या फेसबुक पेजवर आम्हाला एक मेसेज मिळाला ज्यात डब्ल्यूएचओ ने लोकांना अश्या व्हायरल मेसेज बद्दल सावध केले आहे.
WHO ने आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वर देखील लोकांना अश्या मजकुरापासून तसेच अश्या लोकांपासून जे संस्थेचा प्रतिनिधित्व करण्याचा दिखावा करतात त्यांच्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे.
विश्वास न्युज ने त्या पेज चे ज्यांनी हि नौकरी संबंधित जाहिरात प्रसारित केले त्याची सोशल सकॅनिंग केली. आम्हाला असे दिसले कि या पेज चे ५२२ फोल्लोवेर्स आहे.
निष्कर्ष: जागतिक आरोग्य संस्थेच्या नावावर बनावट नोकरीची जाहिरात व्हायरल झाली आहे. डब्ल्यूएचओने लोकांना ते लोकं जे संघटनेचे प्रतिनिधित्व करत आहेत असे भासवितात अश्या गुन्हेगारांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.