
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): जो बायडेन यूएस चे राष्ट्रपती झाल्यानंतर सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात यूएस कैपिटल बिल्डिंग च्या बाहेर मोठ्या संख्येत लोकं नमाज वाचताना दिसतात. व्हायरल छायाचित्रात दावा करण्यात येत आहे कि जो बायडेन अमेरिका चे राष्ट्रपती बनल्यानंतरचे हे छायाचित्र आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल छायाचित्रासोबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे कळले. हे छायाचित्र २००९ साल चे आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर रवींद्र भारतीय ने हे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहले, “जो बाइडेन का नया अमेरिका कैपिटल हिल के सामने जुम्मे के दिन।”
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाच्या सुरुवातीला व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधले. आम्हाला gettyimages.in च्या वेबसाईट वर हे छायाचित्र मिळाले. छायाचित्रासाबत डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, “WASHINGTON – SEPTEMBER 25: Muslims say prayer during the “Islam on Capitol Hill 2009” event at the West Front Lawn of the U.S. Capitol September 25, 2009 in Washington, DC. Thousands of Muslims gathered for the event to promote the diversity of Islam. (Photo by Alex Wong/Getty Images)”
अर्थात: वॉशिंग्टन- सप्टेंबर २५: “इस्लाम ऑन कैपिटल हिल” हा कार्यक्रम, यूएस कैपिटल हिलच्या वेस्ट फ्रंट लॉन या कार्यक्रमाच्या वेळी मुसलमान, सप्टेंबर २५, २००९ रोजी नमाज वाचताना. हजारोंच्या संख्येत मुसलमान या कार्यक्रमांत जमले. (अलेक्स वोन्ग यांचे छायाचित्र/ गेटी इमेजेस)
आम्हाला हे छायाचित्र ibtimes.com च्या एका बातमीत देखील मिळाले. या बातमीत दिलेल्या कॅप्शन मधून पण हे समजते कि हे छायाचित्र २००९ साल चे आहे.
विश्वास न्यूज ने ई-मेल द्वारे हे व्हायरल छायाचित्र काढणाऱ्या फोटो जर्नालिस्ट अलेक्स वोन्ग यांना संपर्क केला. अलेक्स वोन्ग ने आम्हाला ई-मेल द्वारेच सांगितले कि हे छायाचित्र त्यांनी २००९ साली काढले होते.
फेसबुक वर व्हायरल पोस्ट, ‘रवींद्र भारतीय’ या नावाच्या यूजर ने शेअर केली आहे. प्रोफाइल ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर लखनऊ चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि व्हायरल छायाचित्र खोट्या दाव्यासह शेअर करण्यात आले. हे छायाचित्र २००९ साल चे आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.