
नवी दिल्ली (विश्वास न्युज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात असदुद्दीन ओवैसी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सोबत पहिले जाऊ शकते. दावा केला जात आहे कि हे छायाचित्र, हैदराबाद नगरपालिका निवडणूक (जीएचएमसी) सोबत संबंधित आहे. सोशल मीडिया वर बऱ्याच यूजर्स ने हे छायाचित्र ग्रेटर हैदराबाद च्या नगरपालिका निवडणुकांसोबत जोडून त्यांच्या मध्ये खाजगी बोलणे झाले या दाव्यासोबत व्हायरल झाले.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल असल्याचे कळले. असदुद्दीन ओवैसी आणि स्मृती इराणी यांचे जुने छायाचित्र आता चुकीच्या दाव्यासोबत व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Nilanjan Das’ ने हे छायाचित्र शेअर केले आणि लिहले, “What is Asaduddin Owaisi discussing with Smriti Zubin Irani? Mr. Goebbels Amit Malviya should be able to tell.”
याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
सोशल मीडिया वर हा दिशाभूल करण्यात आलेला दावा मराठीत खालील प्रमाणे:
“असदुद्दीन ओवैसी हे स्मृती इराणी यांच्यासोबत काय विचार-चर्चा करत आहेत? मिस्टर गोएबल्स आणि अमित मालवीय हे सांगू शकतात”
हे छायाचित्र ३० नोव्हेंबर रोजी शेअर केले गेले होते, यामुळे असे भासते कि हि नुकतीच झालेली घटना आहे. एक डिसेंबर रोजी हैदराबाद मध्ये मतदान झाले होते. आणि त्या निवडणुकांच्या दरम्यान हे छायाचित्र खूप सोशल मीडिया यूजर्सने शेअर केले.
आर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
न्यूज रिपोर्ट्स प्रमाणे, ग्रेटर हैदराबाद नगरपालिका निवडणुकांच्यावेळी स्मृती इराणी यांनी हैदराबाद येथे जाऊन पार्टी चा निवडणुकांचा प्रचार केला होता. त्याशिवाय गृह मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बऱ्याच मोठया नेत्यांनी हैदराबाद येथे जाऊन प्रचार केला.
पण कुठलेच न्यूज रिपोर्ट आम्हाला असे सापडले नाही ज्यात ओवैसी आणि स्मृती इराणी यांच्या मुलाखतीची कुठेच बातमी नाही आहे. सर्च मध्ये आम्हाला अश्या बऱ्याच बातम्या मिळाल्या ज्यात सांगितल्या प्रमाणे, गृह मंत्री सोबतच बाकी वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, ओवैसी आणि तेलंगना चे मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर टीका केल्या.
यानंतर आम्ही व्हायरल छायाचित्रात केलेल्या दाव्याची पडताळणी करायला, गूगल रिव्हर्स इमेज सर्च ची मदत घेतली. सर्च मध्ये आम्हाला हे छायाचित्र असदुद्दीन ओवैसी यांच्या ट्विटर प्रोफाइल वर मिळाली.
२३ ऑगस्ट २०१६ रोजी स्मृती इराणी यांच्यासोबत मुलाखतीचे दोन छायाचित्र असलेल्या एका पोस्ट ला रिट्विट करून ओवैसी यांनी लिहले:
आखिर क्यों कांग्रेस का एक सांसद भी पावरलूम से जुड़ी मीटिंग में शामिल नहीं हुआ, जहां मैंने समस्याओं को सामने रखा। यह बताता है कि कांग्रेस बेहाल है।
२२ ऑगस्ट रोजी त्यांनी या बैठकीची माहिती आपल्या फेसबुक च्या अधिकृत प्रोफाइल वर पण शेअर केली.
इथे मिळालेल्या काही कीवर्ड च्या आधारावर सर्च केल्यावर, आम्हाला ओवैसी यांच्या ट्विटर प्रोफाइल वर आम्हाला १० ऑगस्ट २०१६ रोजी केलेला एक ट्विट मिळाला, ज्यात त्यांनी केंद्रीय कापड मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीची माहिती दिली. त्यांनी लिहले होते, ‘माननीय कपड़ा मंत्री स्मृति ईरानी से मिलकर उन्हें महाराष्ट्र और देश के पावर लूम सेक्टर के संकट की जानकारी दी।’
सर्च मध्ये आम्हाला एक अजून ट्विट मिळाला, ज्यात त्यांनी या बैठिकेचे दोन छायाचित्र शेअर केले.
विश्वास न्यूज ने या छायाचित्रावरून हैदराबाद च्या टीव्ही-९ चे रिपोर्टर नूर मोहम्मद यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले, “ग्रेटर हैदराबाद च्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान स्मृती इराणी सोबतच बऱ्याच मोठ्या भाजप नेत्यांनी प्रचार केला, पण हे छायाचित्र त्यासोबत संबंधीत नाही आहे.“
व्हायरल छायाचित्र ला चुकीच्या दाव्यांसह शेअर करणाऱ्या यूजर च्या प्रोफाइल ला फेसबुक वर जवळपास हजार लोकं फोल्लो करतात. हा प्रोफाइल जनुकारी २०११ पासून फेसबुक वर सक्रिय आहे.
या आधी पण केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे एक जुने छायाचित्र बंगाल च्या निवडणुकींसोबत जोडून व्हायरल केले जात आहे, ज्याचा तपास तुम्ही इथे बघू शकता.
निष्कर्ष: ग्रेटर हैदराबाद नगरपालिका निवडणुकीच्या वेळी असदुद्दीन ओवैसी हे केंद्रीय कापड मंत्री स्मृती इराणी यांना भेटले असा दावा करणारी व्होराल पोस्ट खोटी आहे. दोन्ही नेत्यांची झालेली भेट याचे छायाचित्र हे जवळपास चार वर्ष जुने आहे, ज्याला आता चुकीच्या संदर्भासोबत व्हायरल केले जात आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.