
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बिहार च्या निवडणुकांच्या निकालाच्या मध्ये एक पोस्ट सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये एक लहान मुलगा स्ट्रेचर ओढताना दिसतो. यूजर्स दावा करत आहे कि हा व्हिडिओ बिहार चा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. हा उत्तर प्रदेश मधील देवरिया चा व्हिडिओ आहे, जो काही लोकं आता बिहार चा सांगून व्हायरल करत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर रंजन झा यांनी ६ नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ पोस्ट करून लिहले: ‘मानवता को शर्मसार करने वाला ये वीडियो बिहार की सत्ता में बैठी भाजपा-जदयू सरकार की निर्ममता को दर्शाता है। चुनाव में जनता के ही कीमती वोट से जीतकर उसे अस्पतालों में मरने के लिए छोड़ देते हैं। #बोलेबिहारबदलेंसरकार #नभूलेहैंन_भूलेंगे
अर्थात: मानवते ला शरमेने मान खाली घालायला लावणारा हा व्हिडिओ बिहार मध्ये सत्तेत बसलेल्या भाजप आणि जेडीयू सरकारची निर्ममता दर्शवते. निवडणुकांमध्ये जनतेचेच वोट मागून त्यांना दवाखान्यात मारायला सोडून देतात.
या फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
पडताळणी च्या सुरुवातीला आम्ही InVID आणि गूगल रिवर्स इमेज टूल हे दोन टूल वापरून केली. सगळ्यात आधी आम्ही व्हायरल व्हिडिओ ला InVID मध्ये अपलोड करून त्याचे बरेच स्क्रीन ग्रॅब काढले, नंतर या ग्रॅब ला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून शोधले. हा व्हिडिओ आम्हाला बऱ्याच वेबसाईट वर सापडला त्यात दिल्या प्रमाणे, हा व्हिडिओ उत्तर प्रदेश मधील देवरिया चा सांगितले जात होते.
दैनिक जागरण च्या संकेतस्थळावर असलेल्या बातमीत सांगितले गेले होते कि, देवरीयाच्या जिल्हा दवाखाण्यात एका घटनेने खळबळ माजवली. एका व्हिडिओ मध्ये दिसत आहे कि एक महिला लहान मुलं सोबत, एक जखमी व्यक्ती असलेल्या स्ट्रेचर ला ओढत आहे. महिलेचा आरोप होता कि, वॉर्ड मध्ये असलेल्या दाई ने स्ट्रेचर ओढायचे पैसे मागितले. हि बातमी २० जुलै २०२० रोजी प्रकाशित झाली होती.
तपासादरम्यान आम्हाला हाच व्हिडिओ बऱ्याच युट्युब चॅनेल वर देखील मिळाला. १९ जुलै २०२० रोजी, भारत समाचार च्या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेल्या बातमीत सांगितले गेले कि देवरिया मध्ये एका महिलेला आणि तिच्या लाहान मुलाला स्वतःच स्ट्रेचर ला धक्का मारून, घायाळ व्यक्ती ला वॉर्ड मध्ये पोहोचवावे लागले. पूर्ण बातमी इथे बघा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने देवरिया मध्ये संपर्क केला. दैनिक जागरण चे जिल्हा प्रभारी महेंद्र कुमार त्रिपाठी यांनी आम्हाला सांगितले कि हा व्हिडिओ तिथल्या जिल्हा दवाखान्यातील आहे. वॉर्ड मध्ये आपल्या आई सोबत असलेल्या मुलाचा हा व्हिडिओ आहे.
या घटनेत तिथल्या वॉर्ड बॉय आणि स्टाफ नर्स च्या विरोधात कारवाई देखील झाली होती. त्या दोघांची पण बदली करण्यात आली होती. या घटनेत जिल्हाधिकारी यांनी २ सदस्यांची टीम गठीत केली होती, ज्यात उप जिल्हाधिकारी आणि सीएमओ चा समावेश देखील होता.
तपासाच्या शेवटी आम्ही फेसबुक यूजर रंजन झा यांचा तपास केला. या यूजर ने देवरिया चा व्हिडिओ बिहार चा सांगून व्हायरल केला होता. आम्हाला कळले कि यूजर हा बिहार च्या मधुबनी चा रहिवासी आहे. त्याच्या अकाउंट ला १४०० पेक्षा जास्तं लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: उत्तर प्रदेशच्या देवरिया च्या जिल्हा दवाखान्याचा व्हिडिओ आता बिहार ची घटना असल्याचा सांगून होत आहे व्हायरल.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.