X

Fact Check: या व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती बॉलीवूड डायरेक्टर विवेक अग्निहोत्री आहे, काँग्रेस चे आमदार नाही

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केल्यावर असे कळले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती हे काँग्रेस चे आमदार नसून बॉलीवूड डायरेक्टर विवेक अग्निहोत्री आहेत. विश्वास न्यूज ने आधी देखील अश्या पोस्ट चा तपास केला आहे जो एका काल्पनिक आमदार अनिल उपाध्याय च्या नावावर व्हायरल होत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: February 20, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात लोकं दावा करत आहेत कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती काँग्रेस चे आमदार अनिल उपाध्यय आहे. व्हिडिओ मध्ये या व्यक्ती ला काँग्रेस च्या विरुद्ध बोलताना ऐकले जाऊ शकते.

विश्वास न्यूज ने जेव्हा व्हायरल पोस्ट चा तपास केला त्यात लक्षात आले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेला व्यक्ती काँग्रेस चा आमदार नाही पण बॉलीवूड डायरेक्टर विवेक अग्निहोत्री आहे. विश्वास न्यूज ने पहिले देखील अश्या पोस्ट चे तपास केले आहे जे काल्पनिक व्यक्ती अनिल उपाध्याय च्या नावावर व्हायरल होत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Ravi Sharma ने ६ फेब्रुवारी २०२१ रोजी एक व्हिडिओ अपलोड करून दावा केला कि: कोंग्रेस विधायक अनिल उपाध्याय अनजाने में कह गया पर सही बोल दिया इस video को इतना वायरल करो की ये पूरा हिन्दुस्तान देख सके.

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हिडिओ ला नीट पहिले असता, वरती झी न्यूज चा लोगो दिसतो. हा व्हिडिओ एका पॅनल डिस्कशन चा आहे. व्हिडिओ वर बऱ्याच वेळा ब्रेकिंग प्लेट वर #GreatDebatesShow लिहलेले दिसते.

विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला InVID टूल मध्ये उपलोड करून व्हिडिओ चे स्क्रीन ग्रॅब घेतले. या नंतर या स्क्रीन ग्रॅब ला गूगल रिव्हर्स इमेज मध्ये टाकून सर्च केले. आम्ही ‘zee news+#GreatDebatesShow’ या कीवर्डस सोबत सर्च केले. आम्हाला झी न्यूज च्या वेरिफाइड युट्युब चॅनेल वर २१ ऑक्टोबर २०१७ रोजी हा पॅनल डिस्कशन चा व्हिडिओ अपलोड केलेला दिसला. या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: The Great Debate Show: Is nepotism damaging democracy in India?
या संपूर्ण व्हिडिओ मध्ये स्पीकर च्या नावासमोर विवेक अग्निहोत्री लिहलेले दिसते.

अजून माहिती गोळा केल्यावर आम्हाला कळले कि विवेक अग्निहोत्री एक फिल्म निर्माते आहे. ते कुठल्याही पार्टी सोबत जुडलेले राजनेता नाहीत. खाली तुम्ही व्हिडिओ मधल्या स्पीकर ची आणि विवेक अग्निहोत्री च्या छायाचित्राचे एक तुलनात्मक छायाचित्र बघू शकता.

या पोस्ट ची पुष्टी करण्यासाठी आम्ही आमचे दैनिक जागरण चे सहयोगी, बॉलीवूड कव्हर करणारे मुख्य संवाददाता स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले,” व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती हे बॉलीवूड चे प्रसिद्ध फिल्म निर्माते, विवेक रंजन अग्निहोत्री आहेत.”

तपासादरम्यान आम्हाला अनिल उपाध्याय नावाचे कुठलेच नेता काँग्रेस सोबत जुडलेले मिळाले नाही. Myneta.info या वेबसाईट वर देखील आम्हाला अनिल उपाध्याय नावाच्या कुठल्याच नेत्याची माहिती मिळाली नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यावर आम्ही खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणारे फेसबुक यूजर Ravi Sharma यांची सोशल स्कॅनिंग केली. हे दुबई चे रहिवासी आहेत आणि फेसबुक वर यांचे ८१० फ्रेंड्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केल्यावर असे कळले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती हे काँग्रेस चे आमदार नसून बॉलीवूड डायरेक्टर विवेक अग्निहोत्री आहेत. विश्वास न्यूज ने आधी देखील अश्या पोस्ट चा तपास केला आहे जो एका काल्पनिक आमदार अनिल उपाध्याय च्या नावावर व्हायरल होत आहे.

  • Claim Review : काँग्रेस चे आमदार अनिल उपाध्यय पार्टी विरुद्ध बोलत आहेत.
  • Claimed By : Ravi Sharma
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later