X

Fact Check: खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे 2018 पीटीआय ची रॅली

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल चित्र आताच्या रॅली चे नसून, 2018 मधील पीटीआय (पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ) पार्टी च्या रॅली चे चित्र आहे.

  • By Vishvas News
  • Updated: April 27, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एका रॅली चे चित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, ज्यात खूप गर्दी दिसते. यूजर्स हा फोटो आता इम्रान खान च्या समर्थानात आताच झालेल्या रॅली चे असल्याचा लोकं दावा करत आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हे चित्र 2018 एप्रिल मध्ये झालेल्या पीटीआय पार्टी च्या रॅली चे चित्र असल्याचे समजले. आता हे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
एक फेसबुक यूजर ‘Nida Sheikh’ ने एक चित्र शेअर केले ज्यात एका मैदानात खुपसारे लोक दिसतात. 21 एप्रिल रोजी शेअर केलेल्या ह्या पोस्ट मध्ये लिहले होते: PTI Imran Khan Jalsa, Lahore Congratulations from Karachi & Peshawar! Imran Khan

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
तपासाची सुरुवात विश्वास न्यूज ने व्हायरल चित्र गूगल रिव्हर्स इमेज वर अपलोड करून शोधले, आम्हाला हे चित्र पीटीआय लाहोर च्या अधिकृत फेसबुक पेज वर सापडले. हे चित्र 30 एप्रिल, 2018 रोजी मिनार, पाकिस्तान मध्ये आयोजित पीटीआय च्या रॅली चे सांगून शेअर करण्यात आले आहे.

आम्हाला हे चित्र इम्रान खान च्या अधिकृत फेसबुक पेज वर देखील मिळाले. हे चित्र 29 एप्रिल, 2018 रोजी पोस्ट करण्यात आले होते.

आम्हाला ट्रिब्यून डॉट कॉम वर एप्रिल 2018 मध्ये पीटीआय रॅली च्या संबंधित एका बातमीत सापडले.

हे स्पष्ट होते कि हे चित्र पीटीआय च्या रॅली चे २०१८ मधील चित्र आहे. पण अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने 24 न्यूज एचडी चे रिपोर्टर मोहम्मद क़ामरान ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे चित्र आताचे नाही, २०१८ चे आहे.

खोट्या दाव्यासह पोस्ट शेअर करण्याऱ्या फेसबुक यूजर लीडर चे आम्ही सोशल स्कॅनिंग केले. त्यात कळले यूजर लाहोर चे रहिवासी आहे, ह्यांना 1000 यूजर्स फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल चित्र आताच्या रॅली चे नसून, 2018 मधील पीटीआय (पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ) पार्टी च्या रॅली चे चित्र आहे.

  • Claim Review : PTI Imran Khan Jalsa, Lahore
  • Claimed By : Nida Sheikh
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later