
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): राजधानी दिल्ली मध्ये सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात सोशल मीडिया वर खोट्या व्हायरल पोस्ट चा जसा पूर आला आहे. असेच एक छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे.
या छायाचित्रात, काही लोकं एक बॅनर हातात पकडून दिसतात. या बॅनर वर धारा ३७० आणि ३५ ए ला परत रिस्टोर करण्याची मागणी करत आहेत. यूजर्स या छायाचित्राला दिल्ली च्या शेतकरी आंदोलनासोबत जोडून शेअर केले जात आहे. सोशल मीडिया च्या माध्यमातून असे दर्शवले जात आहे कि शेतकऱ्यांच्या अजेंडा मध्ये ३७० आणि ३५ ए चा देखील समावेश आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. तपासात आम्हाला कळले कि हे जुने छायाचित्र आता काही लोकं शेतकरी आंदोलनासोबत जोडून व्हायरल करत आहेत. आमच्या तपासात हि व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. व्हायरल छायाचित्र २०१९ चे आहे. याचा शेतकरी आंदोलनासोबत काही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर डॉक्टर अभिलाषा द्विवेदी ने ३० नोव्हेंबर रोजी एक छायाचित्र अपलोड केले आणि लिहले: शानदार…. किसान एजेंडा में 370, 35A भी शामिल है। क्या बात, बहुत खूब। तालियां………….
अर्थात: मस्तं … शेतकऱ्यांच्या अजेंडा मध्ये ३७० आणि ३५ ए चा देखील समावेश आहे.
फेसबुक पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
हे छायाचित्र दुसरे लोकं पण त्याला खरे मानून शेअर करत आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी हे छायाचित्र निरखून बघितले. आम्हाला काही लोकं एका ग्रुप मध्ये पोस्टर पकडलेले दिसले. पोस्टर व लिहले होते: Restore Article 370, 35A. We Stand with Kashmir & Kashmiries. विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्राला जेव्हा रिव्हर्स इमेज सर्च टूल मध्ये अपलोड केले तेव्हा सर्च च्या वेळी आम्हाला ‘शिरोमणी अकाली दल’ नावाच्या फेसबुक पेज वर आम्हाला व्हायरल होत असलेले छायाचित्र मिळाले.
या विषयावर अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने अमृतसर स्थित दैनिक जागरण चे रिपोर्टर नितीन धिमान यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल छायाचित्राचा आता चालू असलेल्या शेतकरी आंदोलनासोबत काही संबंध नाही. हे छायाचित्र जुने आहे. हे छायाचित्र २०१९ चे आहे जेव्हा शिरोमणी अकाली दल यांनी धारा ३७० आणि ३५ ए हटवण्याचा विरोध केला होता“.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर डॉक्टर अभिलाषा पी. द्विवेदी यांचे अकाउंट तपासले. आम्हाला त्यात कळले कि यूजर दिल्ली ची रहिवासी आहे. त्यांना सात हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. जुने छायाचित्र खोट्या दाव्यांसह आता व्हायरल केले जात आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.