X

Fact Check: फ्री राशन वरून योगी आदित्यनाथ ने नाही केले व्हायरल वक्तव्य

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी निघाली. फ्री राशन ला घेऊन योगी आदित्यनाथ ने व्हायरल वक्तव्य नाही केले.

  • By Vishvas News
  • Updated: March 24, 2022

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर एक न्यूज चॅनेल ची ब्रेकिंग प्लेट व्हायरल होत आहे. ह्यात युपी च्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांचे चित्र वापरून दावा करण्यात येत आहे कि त्यांनी म्हंटले, आता फ्री राशन मिळणार नाही. ह्या ब्रेकिंग प्लेट ला आता झालेल्या विधानसभा निवडणुकांसोबत जोडण्यात येत आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात कळले कि न्यूज चॅनेल च्या ब्रेकिंग प्लेट ला एडिट करून पोस्ट तयार करून व्हायरल करण्यात येत होती. ह्या पोस्ट मध्ये काही तथ्य नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ललित कुमार ने 15 मार्च रोजी एक पोस्ट अपलोड करून दावा केला: ‘अब फ्री राशन नहीं,बाबा जी का घंटा मिलेगा।’
फॅक्ट चेक च्या उद्देशाने पोस्ट मध्ये लिहलेलय गोष्टी इथे जशाच्या तश्या देण्यात आल्या आहेत. अन्य यूजर्स देखील ह्याला मिळत्या जुळत्या दाव्यासह शेअर करत आहे.

तपास:

योगी आदित्यनाथ च्या नावाने व्हायरल होत असलेल्या वक्तव्याचा तपास विश्वास न्यूज ने गूगल ओपन सर्च टूल सोबत सुरु केले. सर्च च्या वेळी आम्हाला अशी कुठली मीडिया रिपोर्ट मिळाली नाही, ज्यात युपी मध्ये फ्री मध्ये राशन वाटण्यासंबंधी वक्तव्य केले असेल. आम्हाला योगी ने हि सेवा निवडणुकांनंतर बंद केल्याची देखील बातमी कुठे मिळाली नाही. दैनिक जागरण ची वेबसाइट जागरण डॉट कॉम वर 15 मार्च रोजी बातमी पब्लिश झालेली सापडली. त्यात लिहले होते कि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक रॅलींमध्ये मोफत रेशन योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. आता या योजनेला लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यावर राज्य सरकार मंथन करत आहे. राज्यात या योजनेचे 15 कोटी लाभार्थी आहेत. अन्न व रसद विभागाने पाठविलेल्या प्रस्तावात कालावधीचा उल्लेख नसून, तो शासनाच्या इच्छेवर सोडण्यात आला आहे. हि पूर्ण बातमी इथे वाचा.

विश्वास न्यूज च्या तपासाच्या पुढच्या टप्प्यात यूपी भाजपा चे प्रवक्‍ता राकेश त्रिपाठी ह्यांना संपर्क केला. त्यांनी देखील वक्तव्य स्पष्ट करत ते खोटे असल्याचे सांगितले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने यूजर चे सोशल स्कॅनिंग केले. फेसबुक यूजर ललित कुमार चे तीन हजार पेक्षा अधिक मित्र आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी निघाली. फ्री राशन ला घेऊन योगी आदित्यनाथ ने व्हायरल वक्तव्य नाही केले.

  • Claim Review : सीएम योगी ने म्हंटलं आता मोफत राशन नाही मिळणार
  • Claimed By : फेसबुक यूजर ललित कुमार
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later