X

Fact Check: अंबानी कुटुंब नाही देत आहे कंगना रणौत ला २०० कोटी रुपये, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूजच्या तपासात अंबानी कुटुंबाच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे आढळले. अंबानी कुटुंबाने कंगना रणौत ला २०० कोटी देण्याचे जाहीर केले नाही.

  • By Vishvas News
  • Updated: September 14, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर अंबानी कुटुंबाच्या नावावर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. यात असा दावा केला जात आहे कि, अंबानी कुटुंबांनी कंगना रणौत ला तिचं ऑफिस परत बांधण्याकरिता २०० कोटी देण्याचे जाहीर केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. अंबानी कुटुंबांनी असे काहीच जाहीर नाही केले.

काय होत आहे व्हायरल?
‎Anand Chauhan‎ नावाच्या फेसबुक यूजरने एक पोस्ट शेअर केली आहे, “#कंगना_को नया स्टूडियो बनाने के लिये अम्बानीपरिवार 200 करोड़ की मदद करेगा नीता अंबानी अंम्बानी परिवार को साथ देने के लिये आभार #जयमांभवानीजय_राजपुताना

हि पोस्ट यूजरने “अगर आप राजपूत हैं तो Join कीजिये ये ग्रुप,देखते हैं FB पर कितने राजपूत है✅” या फेसबुक ग्रुप वर पोस्ट केली आहे.

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन बघा.

तपास:
पोस्ट मध्ये केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, हे पाहण्याकरिता आम्ही सगळ्यात आधी गूगल चा वापर केला. विविध कीवर्ड च्या माध्यमांनी आम्ही हे जाणून ज्यायचा प्रयत्न केला कि खरंच अंबानी कुटुंबीयांनी कंगना रणौत ला मदत करायचे जाहीर केले आहे का? आम्हाला कुठल्याच अधिकृत मीडिया संगठनांवर अशी बातमी प्रकाशित झालेली आढळली नाही.

तपासाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही रिलायंस इंडस्ट्रीज च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला. त्यांनी व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

कंगना रणौत च्या मुंबई च्या तिच्या राहत्या घरी असलेल्या कार्यालय वर बीएमसी ने अवैध अतिक्रमण हटवण्यावर कारवाई केली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी दैनिक जागरण चे हे वृत्त इथे वाचा.

विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट पसरवणाऱ्या पेजबद्दल अजून जाणून घेतले, ““अगर आप राजपूत हैं तो Join कीजिये ये ग्रुप,देखते हैं FB पर कितने राजपूत है✅” या पेज चे 2,458,718 सदस्य आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात अंबानी कुटुंबाच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे आढळले. अंबानी कुटुंबाने कंगना रणौत ला २०० कोटी देण्याचे जाहीर केले नाही.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later