
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे, कि काळ्या मिरची चा उपयोग करून बनवलेल्या गरम जेवणामुळे कोरोनाव्हायरस चा उपचार होतो. संक्रमित व्यक्ती अगदी २४ तासात बारा होतो. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. या गोष्टीचा कुठलाच पुरावा नाही कि काळी मिरची चा वापर केल्यानी २४ तासात कोरोनाव्हायरस संक्रमण बरे होत नाही.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला हा दावा वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर फॅक्ट-चेक साठी यूजरने पाठवला. या पोस्ट मध्ये लिहले होते,
“कोरोनाव्हायरस संक्रमित व्यक्ती ला गरम जेवण आणि काळी मिरची दिल्यास, २४ तासात संक्रमण कमी होतं आणि व्यक्ती ठीक होतो.”
तपास:
विश्वास न्यूज ने हा दावा इंटरनेट वर सर्च केला. आम्हाला ‘मिथ बस्टर‘ नावाची WHO वर एक रिपोर्ट मिळाली. WHO प्रमाणे, जेवणात काळी मिरची स्वादासाठी वापरू शकतो पण, कोरोनाव्हायरस संक्रमणापासून उपचारासाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही. कोरोनाव्हायरस पासून बचावासाठी लोकांपासून अंतर ठेवणे, नियमित हाथ धुणे असे काही उपाय सांगितले गेले आहे. बॅलन्स डाएट घेणे, शरीराला हाइड्रेट ठेवणे, नियमित एक्सारसाईझ करणे आणि छान झोप घेणे या गोष्टींचा देखील समावेश आहे.
वर्जीनिया डिपार्टमेंट ऑफ हेल्थ च्या वेबसाईट वर पण आम्हाला एक रिपोर्ट मिळाली. ती रिपोर्ट कोरोनाव्हायरस संबंधित मिथकांवर आधारित आहे. त्यात लिहले आहे कि जेवणात वापरली गेलेली काळी मिरची तुम्हाला कोरोनाव्हायरस पासून वाचवू किंवा त्याचा उपचार करू शकत नाही. गरम काळ्यामिरची नि काही लोकांचे नाक नक्की वाहू शकते, म्हणून तिखट काही पण खाताना, टिशू चा वापर करावा.
विश्वास न्यूज ने या संबंधी आयुष्य मंत्रालय चे डॉक्टर विमल यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी सांगितले, “या गोष्टीचा काहीच पुरावा नाही कि काळी मिरची ने कोरोनाव्हायरस चा उपचार होतो. आता पर्यंत कोरोनाव्हायरस चा कुठलाच उपचार मिळालेला नाही. व्हायरल दावा खोटा आहे.”
WHO प्रमाणे, आतापर्यंत कुठलाच उपचार आणि वैक्सीन देखील सापडलेले नाही. यावर वैज्ञानिक संशोधन करत आहेत, आणि काही प्रोजेक्ट्स ट्रायल फेज मध्ये आहेत.
Disclaimer: विश्वास न्यूजच्या कोरोनाव्हायरस (COVID-19) संबंधित फॅक्ट-चेक स्टोरी वाचताना किंवा शेअर करताना, आम्ही वापरलेला डेटा किंवा संशोधन डेटा बदलू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाव्हायरस संबंधित डेटा (संक्रमित असलेले, बरे झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेले रुग्ण यांची संख्या) सतत बदलत राहते. तसेच लस (व्हॅक्सिन) शोधण्याच्या दिशेने संशोधनाचे ठोस परिणाम यायचे आहेत आणि त्यामुळे, उपचार आणि प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेला डेटा देखील बदलू शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही फॅक्ट-चेक वाचाल तेव्हा त्याची तारीख पडताळणे आवश्यक आहे.
निष्कर्ष: जेवणात काळीमिरची खाल्ल्याने कोरोनाव्हायरस च्या संक्रमणापासून उपचार केला जाऊ शकत नाही. व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.