
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि पोस्ट मध्ये दिलेले निर्देशांचे पालन केल्यास फोन मधून कोरोनाव्हायरस संबंधित कॉलर ट्यून हटवली जाऊ शकते. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Mᴏʜᴅ Kᴀsʜɪғ ᴋʜᴀɴ ने व्हायरल होत असलेली पोस्ट शेअर केली ज्यात लिहले होते कि कोरोनाव्हायरस संबंधित कॉलर ट्यून हटवायला, एयरटेल यूजर्स ने 646224# डायल करून १ दाबावे, बीएसएनएल यूजर्स ने “UNSUB” टाईप करून 56799 वर एसेमेस करावे, वोडाफोन यूजर्स ने “CANCT” लिहून 144 वर पाठवावे, आणि जियो यूजर्स ने “STOP” लिहून 155223 वर सेंड करावे.
क्या है वायरल पोस्ट में?
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये केलेल्या दाव्यांचा तपास आम्ही सगळ्यात आधी इंटरनेट सर्च पासून केला. आम्ही कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून ला कसे हटवावे हे सर्च केले, पण आम्हाला एयरटेल, बीएसएनएल, वोडाफोन आणि जियो च्या अधिकृत वेबसाईट वर अशे कुठलेच उपाय सापडले नाही.
आम्ही एयरटेल नंबर वरून 646224# डायल केले, पण आम्हाला यावर मेसेज मिळाला कि आम्ही बरोबर स्ट्रिंग डायल केली नाही आहे. तसेच आम्ही जियो वरून देखील 155223 वर “STOP” लिहून पाठवले, पण आम्हाला उत्तरात, जियो नंबर वर आधी ऍक्टिव्ह व्हॅल्यू अड्डेड सर्व्हिसेस जसे कि जियो ट्यून सर्व्हिस रेंटल प्लॅन डिऍक्टिव्हेट करण्याचे निर्देश मिळाले. असे केल्यावर देखील आमची कॅलरट्यून फोन मधून हटली नाही.
या नंतर विश्वास न्यूज ने एयरटेल चे कस्टमर केयर अधिकारी इरफान यांच्या सोबत बोललो. त्यांनी सांगितले कि भारत सरकारच्या निर्देशांवरून हि कॉलर ट्यून लावण्यात आली आहे. अजून पर्यंत या कॉलर ट्यून ला हटवण्याचे आदेश मिळालेले नाहीत आणि म्हणून त्यांना हटवले जाऊ शकत नाही. व्हायरल पोस्ट मध्ये सांगितलेल्या सूचनांद्वारे देखील हि कॉलर ट्यून हटवू शकत नाही.
आम्ही जियो चे कस्टमर केयर अधिकारी, अलमास यांच्या सोबत संवाद साधला. त्यांनी पण आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा आहे. हि कॉलर ट्यून भारत सरकार ने दिलेल्या सूचनेनुसार लावण्यात आली आहे, सध्या तरी याला हटवले जाऊ शकत नाही.
ट्विटर वर हि पोस्ट, Mᴏʜᴅ Kᴀsʜɪғ ᴋʜᴀɴ नावाच्या यूजर ने शेअर केली आहे. यूजर च्या प्रोफाइल ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि ते लखनऊ चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: व्हायरल पोस्ट मध्ये दिलेल्या सूचना पाळल्यास कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून हटवता येत नाही, केलेले दावे चुकीचे आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.