X

Fact Check: बीएमसी ने नाही जारी केले लहान मुलांमध्ये Covid होण्यावरून हि अडवायजरी, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल करण्यात येणारी पोस्ट खोटी आहे. बीएमसी ने कोणतीच अडवायजरी दिली नाही. विश्वास न्यूज ला बीएमसी च्या पीआरओ ने देखील पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

  • By Vishvas News
  • Updated: April 4, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन (बीएमसी) च्या नावावर एक खोटी अडवायजरी शेअर करण्यात येत आहे, ज्यात बीएमसी चा लोगो लागला आहे आणि सोबत लिहले आहे, कोरोना ची परत साथ आली आहे ज्यात लहान मुलांपासून ते ३० वर्षापर्यंतच्या लोकांना जास्ती धोका आहे, म्हणून पालकांना निवेदन आहे कि त्यांनी लहान मुलांना मैदानात खेळायला पाठवू नये.

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. बीएमसी ने हि अडवायजरी जारी केली नाही. विश्वास न्यूज सोबत बोलताना देखील बीएमसी च्या पीआरओ ने व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ने खोटी अडवायजरी शेअर केली ज्यात लिहले होते, “Area Local Management, Important Message, To all Residents from BMC. Dear Friends We have received a message from BMC health department that there is a higher stage of corona which cannot be detected but is infected to small children till the age of 30. We request all the parents not to leave their children to play in open spaces. Avoid going public places. Avoid going to malls. Avoid going to theaters. Avoid going to beaches. Society Chairmain/ Secretary/ Members please note that your family safety is your priority so maintain social distancing and avoid social gathering in your society”.

पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आपल्या तपासाची सुरुवात आम्ही हे जाणून घेण्यास सुरुवात करून केली कि खरंच बीएमसी ने अशी कुठली अडवायजरी जारी केली आहे का. सर्च मध्ये आम्ही सगळ्यात आधी आम्ही बीएमसी च्या स्टॉप कोरोनाव्हायरस च्या ऑफिसिअल वेबसाईट वर गेलो पण तिथे आम्हाला अशी अडवायजरी सापडली नाही.

आम्ही नंतर बीएमसी चे अधिकृत ट्विटर हॅन्डल @mybmc बघितले. सर्च मध्ये आम्हाला ३१ मार्च रोजी शेअर केलेला एक ट्विट मिळाला, ज्यात व्हायरल होत असलेली अडवायजरी दिसते. व्हायरल पोस्ट ला शेअर करून लिहले गेले आहे, “The following image making rounds on social media is fake and we urge citizens to not circulate it any further. We request Mumbaikars to continue following all COVID-prevention norms and help the city beat the virus.”

विश्वास न्यूज ने पोस्ट बद्दल जाणून घेण्यासाठी बीएमसी चे पीआरओ, तानाजी कांबळे यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हि पोस्ट खोटी आहे. बीएमसी ने अशी कोणतीच अडवायजरी दिली नाही.

२७ मार्च २०२१ रोजी livemint च्या बातमी प्रमाणे, कोरोनाव्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, १५ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागला आहे. सोशल डिस्टेंसिंग पाळण्यास पण गाईडलाईन्स दिले गेले आहे. बातमी इथे वाचा.

खोटी पोस्ट खोट्या दाव्यासह व्हायरल करणारे फेसबुक यूजर ज़फर अली शेख यांचे आम्ही सोशल स्कॅनिंग केले, त्यात आम्हाला कळले कि ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि त्यांना १२७ लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल करण्यात येणारी पोस्ट खोटी आहे. बीएमसी ने कोणतीच अडवायजरी दिली नाही. विश्वास न्यूज ला बीएमसी च्या पीआरओ ने देखील पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

  • Claim Review : बीएमसी ची अडवायजरी
  • Claimed By : फेसबुक यूजर ज़फर अली शेख
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later