
नवी दिल्ली (विश्वास टीम). सोशल मीडिया वर टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या नावाने एक संदेश व्हायरल होत आहे. या संदेशात तज्ञांवर टीका करत लिहिले आहे की तज्ञ म्हणतात की कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होईल पण खरंच तज्ञांवर विश्वास केला असता तर दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जपानला भविष्य नव्हते, आज पर्यंत अरब देशाने इस्त्राइलचा नायनाट केला असता. पण वस्तूस्थिती वेगळीच आहे.
विश्वास न्यूजच्या तपासणीत हा संदेश खोटा आहे असे आढळले. टाटा ग्रुपच्या अध्यक्षांनी असा कोणताही संदेश दिलेला नाही.
काय आहे या व्हायरल पोस्टमध्ये?
रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या संदेशाला अनेक लोकांनी सोशल मिडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म वर शेयर करणे सुरु केले. बॉलीवूड अभिनेता अरशद वारसी यांनी पण या खोट्या संदेशावर विश्वास ठेवत त्यांच्या वेरिफाइड ट्विटर हँडल (आर्काइव्ह लिंक) वरून शेयर केला.
संदेश व्हायरल झाल्यानंतर रतन टाटांनी स्वतः त्याचे खंडन केले. रतन टाटांनी आपल्या वेरिफाइड ट्विटर हँडल वर संदेशाचे खंडन करत म्हटले, “मी असे काहीही म्हटले नाही किंवा लिहिले नाही. मी तुम्हाला विनंती करतो की व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडिया वर व्हायरल होणाऱ्या संदेशाची सत्यता जरूर पडताळून पहावी.”
त्यांनी म्हटले, “जर मला काही म्हणायचे असेल तर मी माझ्या अधिकृत चॅनेलच्या माध्यमातून सांगेन. आशा करतो की तुम्ही सुरक्षित असाल. आपली काळजी घ्या.”
Disclaimer: कोरोनावायरसफैक्ट डाटाबेस रिकॉर्ड फैक्ट-चेक कोरोना वायरस संक्रमण (COVID-19) की शुरुआत से ही प्रकाशित हो रही है। कोरोना महामारी और इसके परिणाम लगातार सामने आ रहे हैं और जो डाटा शुरू में एक्यूरेट लग रहे थे, उसमें भी काफी बदलाव देखने को मिले हैं। आने वाले समय में इसमें और भी बदलाव होने का चांस है। आप उस तारीख को याद करें जब आपने फैक्ट को शेयर करने से पहले पढ़ा था।
निष्कर्ष: टाटा ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होणारा संदेश खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.