X

Fact-Check: व्हायरल इमेज ज्यात दावा करण्यात येत आहे कि ते संघाचे कोविड केअर सेन्टर आहे, ते कतार चे स्टेडियम आहे

इंदोर मध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे कोविड सेन्टर या दाव्यासोबत व्हायरल होणारे छायाचित्र अल बायत स्टेडियम, कतार चे आहे. व्हायरल दावे खोटे आहे.

  • By Vishvas News
  • Updated: June 5, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक छायाचित्र व्हायरल होत असताना दिसले, या छायाचित्रात दावा करण्यात येत होता कि छायाचित्रात दिसत असलेले दृश्य हे भारतातील दुसऱ्या स्थळाचे सर्वात मोठे कोविड सेन्टर आहे जे संघाद्वारे बांधण्यात आले आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि हे व्हायरल छायाचित्र अल बायत स्टेडियम, कतार चे आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Mahesh Tari यांनी हे व्हायरल पोस्ट २९ एप्रिल रोजी पोस्ट करून लिहले “RSS अप्रतिम कार्य!!”
व्हायरल इमेज वर लिहले होते, “भारतातील दुसऱ्या नंबर सर्वात मोठे चे कोविड सेंटर. आरएसएस ने ६००० बेड तयार केले आणि ४५ एकर क्षेत्रात ४ ऑक्सिजन प्लांट्स इंदूरी मध्ये उभारले आहे.”
हा मजकूर एका छायाचित्रावर लिहला गेला आहे, जो त्या जागेचा ड्रोन शॉट असल्याचा भास होतो.

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आपला टप्पास, गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली. आम्हाला या तपासादरम्यान अल जझीरा ची एक बातमी मिळाली.
या रिपोर्ट मध्ये दिले होते, “कतार २०२२: फुटबॉल वर्ल्ड कप स्टेडियम्स इथे बघा”, त्यात वर्ल्ड कप ला दोन वर्षे असताना त्यांनी आठ स्टेडियम्स बद्दल माहिती दिली होती जिथे फुटबॉल मॅच होणार होत्या.
कॅप्शन मध्ये दिल्या प्रमाणे हे छायाचित्र अल बायत स्टेडियम, कतार चे आहे.

पुढे आम्ही अल बायत स्टेडियम चे अजून छायाचित्र गूगल वर तपासले.
कीवर्ड सर्च चा वापर करून आम्हाला कतार ट्रिब्यून वर हे छायाचित्र मिळाले.

ह्या छायाचित्राला जुलै २४, २०१९ रोजी अपलोड केले गेले होते.
कॅप्शन मध्ये लिहले होते: @roadto2022 posted photos of the Al Bayt Stadium in Al Khor. The 60,000 capacity giant tent structure will host matches through to the semi-finals of the 2022 FIFA World Cup Qatar. The arena will reach more people around the globe and like a true nomad’s tent, the stadium will be portable. The upper tier of modular design seating will be removed following the World Cup and donated to developing nations that need sporting infrastructure.

अर्थात: ६०,००० लोकांची क्षमता असलेल्या या स्टेडियम मध्ये २०२२ च्या फिफा वर्ल्ड कॅप चे सेमी फायनल होतील. हा स्टेडियम पोर्टबेल राहील. मॅच झाल्यावर वरील भाग हटवून त्या देशांना दान करण्यात येईल जिथे खेळण्यासाठी बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर नाही.
विश्वास न्यूज ला हे छायाचित्र गेटी इमेजस च्या वेबसाईट वर देखील मिळाले. हे छायाचित्र १८ डिसेंबर २०१९ रोजी अपलोड करण्यात आले होते.

आता हे कळले होते कि हे छायाचित्र अल बायत स्टेडियम, कतार चे आहे.

विश्वास न्यूज च्या पुढच्या तपासात आम्ही हे जाणून घयायचा प्रयत्न केला कि खरंच व्हायरल मजकुरात दिलेले सेंटर हे भारतातील दुसऱ्या नंबर वरचे सगळ्यात मोठे स्टेडियम आहे कि नाही. हे शोधताना आम्हाला  News18.com वर एप्रिल २२, २०२१ रोजी अपलोड केलेली एक बातमी मिळाली.

बातमीत दिले होते कि इंदोर मध्ये देशातील दुसऱ्या नंबर वरचे सगळ्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे ज्याची क्षमता ६,२०० बेड्स ची आहे.
हि बातमी इथे वाचा.

या संपूर्ण बातमीत संघाचा कुठेच उल्लेख नव्हता.
याचाच अर्थ या सेंटर चा संघासोबत संबंध नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र कुमार यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि इंदोर चे कोविड सेंटर संघानी बांधले नाही, संघानी फक्त त्यांना सहयोग केला आहे. आणि व्हायरल होत असलेले छायाचित्र हे देखील कोविड सेंटर चे नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही त्या फेसबुक यूजर चा तपास केला ज्याने हि पोस्ट शेअर केली आहे. महेश तारी हे मुंबई चे रहिवासी आहेत.  

निष्कर्ष: इंदोर मध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे कोविड सेन्टर या दाव्यासोबत व्हायरल होणारे छायाचित्र अल बायत स्टेडियम, कतार चे आहे. व्हायरल दावे खोटे आहे.

  • Claim Review : संघाने बांधलेल्या कोविड केअर सेंटर चे छायाचित्र
  • Claimed By : Mahesh Tari
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later