Fact Check: 7 वर्ष जुना योगी आदित्यनाथ चा व्हिडिओ व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. नुपूर शर्मा च्या समर्थानात व्हायरल होत असलेले वक्तव्य आताचे नाही, योगी आदित्यनाथ चा जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
- By Vishvas News
- Updated: June 12, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारी नुपूर शर्मा अनेक दिवसांपासून इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. यामध्ये तो हिंदू एकतेबद्दल बोलताना दिसतो. योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ आल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात हा दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ जवळ पास सात वर्ष जुना आहे. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ ने गाजियाबाद मध्ये एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले आहे. ह्या भाषणाचा काही भाग आता नुपूर शर्मा च्या समर्थानात योगी आदित्यनाथ चे सांगून व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘ग्लोबल हिंदुस्तान’ ने 10 मे रोजी एक व्हिडिओ अपलोड केला, त्यांनी दावा केला: ‘योगी आदित्यनाथ का आया तगड़ा बयान नूपुर शर्मा के समर्थन में!’
व्हिडिओ मध्ये लिहले होते: ‘योगी आदित्यनाथ का आया तगड़ा बयान नूपुर शर्मा के समर्थन में बोले झुकूंगा नहीं भंगुंगा नहीं। योगी जी बोले सामना करो, भागो मत, मैं तो नहीं भागूंगा, आ जाए कोई भी।’
व्हायरल व्हिडिओ दुसरे यूजर्स देखील शेअर करत आहे. फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास बघा. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल व्हिडिओबद्दल जाणून घेण्यासाठी, विश्वास न्यूजने प्रथम तो InVid टूलमध्ये अपलोड केला आणि अनेक कीफ्रेम काढल्या. मग गुगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्समध्ये अपलोड करून शोध सुरू केला. आम्हाला यूट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओसारखाच एक छोटा व्हिडिओ सापडल. तो 22 ऑगस्ट 2021 रोजी अपलोड केले होते. व्हिडिओवर विश्व हिंदू महासंघ असे लिहिले होते. या व्हिडिओमध्ये मठ मंदिराचे नाव लिहिलेले दिसत होते. याशिवाय व्हायरल व्हिडिओमध्ये योगींच्या मागे उभी असलेली व्यक्तीही दिसत होती.
अधिक तपास करत गुगल ओपन सर्च टूलची मदत घेण्यात आली. व्हायरल व्हिडिओच्या वर, आम्ही गाझियाबादच्या श्वरनाथ मठ मंदिराचे लिखाण पाहिले. त्याआधारे वेगवेगळे कीवर्ड शोधण्यात आले.
ओरिजिनल व्हिडिओ मध्ये आम्हाला उपासना टीवी नावाचा एक युट्युब चॅनेल दिसला. ह्याला 15 मे 2015 रोजी अपलोड करण्यात आले होते. त्यात सांगितले गेले कि हा व्हिडिओ विश्व हिंदू महासंघ च्या प्रांतीय संमेलनाचा आहे. व्हायरल व्हिडिओ च्या सव्वीसाव्या मिनिटावर हि क्लिप मिळाली, जी आता नुपूर शर्मा च्या नावावर व्हायरल होत आहे.
आता आम्ही हे जाणून घेतले कि आदित्यनाथ ह्यांनी नुपूर शर्मा च्या समर्थानात काही वक्तव्य केले का. गूगल सर्च केल्यावर आम्हाला अशी कुठली बातमी मिळाली नाही.
तपास सुरू ठेवत विश्वास न्यूजने गाझियाबाद ब्युरो चीफ आशुतोष अग्निहोत्री ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेला व्हिडिओ अनेक वर्षे जुना आहे. त्यावेळी योगी आदित्यनाथ गाझियाबादमधील एका मंदिरात एका कार्यक्रमासाठी आले होते. व्हायरल झालेली क्लिप त्याच घटनेची आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक पेज ग्लोबल हिंदुस्तान ची सोशल स्कँनिंग केली. त्यात कळले कि ह्या पेज चे 1.92 लाख फॉलोवर्स आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. नुपूर शर्मा च्या समर्थानात व्हायरल होत असलेले वक्तव्य आताचे नाही, योगी आदित्यनाथ चा जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
- Claim Review : ‘योगी आदित्यनाथ का आया तगड़ा बयान नूपुर शर्मा के समर्थन में!’
- Claimed By : ग्लोबल हिंदुस्तान
- Fact Check : Misleading

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com