Fact Check: घायाळ महिलेचे छायाचित्र बांगलादेश चे आहे, पश्चिम बंगाल चे नाही
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. हे छायाचित्र पश्चिम बंगाल चे नाही, बांगलादेश चे आहे.
- By Vishvas News
- Updated: May 10, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात एक घायाळ महिला दिसते. व्हायरल छायाचित्रात एक महिलेच्या डोक्यातून रक्त निघताना दिसत आहे. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि च्याचीत्र बंगाल चे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. खरे तर बांगलादेश चे आहे.
जेव्हाकी, हे नक्की खरे आहे कि २ मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर पश्चिम बंगाल मध्ये हिंसा झाली होती. ज्यात बऱ्याच लोकांचा नुकसान झाला, अश्या बऱ्याच बातम्या समोर आल्या.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर @Isha5384 ने ४ मे रोजी हे छायाचित्र अपलोड करून लिहले, “आबरू लूट गयीं बंगाल की। 😢🙏क्या ये महिला नहीं, क्या बंगाल की बेटी नहीं, क्या बंगाली और महिला केवल ममता ही है । धिक्कार उन को जो महिला है और ममता का अब भी बेशर्मी से समर्थन कर रही है”
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज टूल च्या मदतीने शोधले. या व्हायरल छायाचित्राला आम्ही अपलोड करून सर्च केल्यावर हे छायाचित्र आम्हाला Raju Das 🇧🇩 @RajuDas7777 नावाच्या ट्विटर अकाउंट वर ४ नोव्हेंबर २०२० रोजी अपलोड केलेले मिळाले. छायाचित्रावर लिहले होते “On 3/11/2020, land robber Md: Rubel & his terrorist forces attacked a poor Hindu family at East Yugir Hat in Aman Bazar, Hathazari Police Station,Chittagong,Bangladesh. Land robber Md: Rubel has been trying to occupy d victim’s place for a long time. #HinduLivesMatterInBangladesh”

आम्हाला हे छायाचित्र फेसबुक पोस्ट वर मिळाले. ४ नोव्हेंबर रोजी মরণ ফাঁদ-লাভ জিহাদ नावाच्या एका बांगलादेशी पेज वर पोस्ट केलेले मिळाले, त्यात लिहले होते, “चटगाँव जिले के हत्ज़ारी पुलिस स्टेशन के अमन बाज़ार के पूर्वी हिस्से में युगीन हट में भूमि हड़पने वालों ने एक गरीब परिवार पर हमला किया।”

या विषयी अधिक माहिती साठी आम्ही या व्हिडिओ वर दिलेल्या नोव्हेंबर मध्ये ट्विट करणारे यूजर राजू दास सोबत संपर्क केला. राजू दास एकबांगलादेशी हिंदू आक्टिविस्ट आहे. आमच्या सोबत फोन वर बोलताना त्यांनी सांगितले कि हि घटना बांगलादेश च्या चटगाँव मध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये झाली आहे.
दैनिक जागरण च्या वेबसाईट वर ६ मे रोजी प्रकाशित बातमी प्रमाणे, “बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजनेतिक हिंसा सुरूच आहे. प्रदेश भाजप ने गुरुवारी दावा केला कि मागील २४ तासात त्यांच्या २ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. त्याशिवाय राज्यातील बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला. अधिक माहिती साठी हि बातमी इथे वाचा.
आता आम्ही त्या दावा करणाऱ्या यूजर चा तपास केला, आम्हाला कळले कि यूजर ईशा बजाज @Isha5384 चे ४,०८६ फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. हे छायाचित्र पश्चिम बंगाल चे नाही, बांगलादेश चे आहे.
- Claim Review : व्हायरल घायाळ महिलेचे छायाचित्र बंगाल चे आहे
- Claimed By : @Isha5384
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Telegram 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com