
नवी दिल्ली, विश्वास न्यूज:
जगावरचं कोरोनाव्हायरस च संकट कधी एकदा जातंय याची सगळे वाट बघत असतानाच, चीनमधल्या इनर मंगोलिया या स्वायत्त प्रदेशात ब्युबॉनिक प्लेगचे (गाठीचा रोग किंवा प्लेग) रुग्ण आढळले आहेत. या नवीन संकटाची चाहूल लागली असताना, ब्युबॉनिक प्लेग बाबतीत विविध संदेश व्हायरल होणे साहजिक आहे. नुकतेच ट्विटर वर आम्हाला एक पोस्ट सापडली, ज्यात असा दावा करण्यात आला आहे कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरसंघचालक यांनी असे वक्तव्य केले आहे कि ज्या भारतीयाला ब्युबॉनिक प्लेग ची लागण होईल त्याला देशद्रोही घोषित करण्यात येईल. विश्वास न्युज च्या तपासात हा दावा खोटा ठरला.
हि पोस्ट इथे वाचा.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर वर @notrepublictv या अकाउंट ने हा मजकूर आपल्या हॅन्डल वर पोस्ट केला:
BREAKING: “Any Indian testing postive for the China-Originated Bubonic Plague will be declared an Anti-National”, says RSS chief Mohan Bhagwat.
#bubonicplague
अर्थात: “कुठल्याही भारतीयाला चीन मधून उगम झालेल्या ब्युबॉनिक प्लेग ची लागण झाल्यास, त्याला देशद्रोही घोषित करण्यात येईल,” असे RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटले.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी,कीवर्ड सर्च करून हि बातमी कुठे आली आहे का, याचा तपास घेतला. सरसंघचालक मोहन भागवत, यांनी असे वक्तव्य केल्याचे आम्हाला कुठेच आढळले नाही.
ब्युबॉनिक प्लेग चा रुग्ण आढळल्याची बातमी आम्हाला ‘जागरण इंग्लिश‘ वर सापडली.
नंतर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख, नरेंदर कुमार यांना संपर्क केला त्यांनी हि बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. डॉ मोहन भागवत यांनी ब्युबॉनिक प्लेगवर असे कुठलेही वक्तव्य केले नाही, असे देखील त्यांनी सांगितले.
विश्वास न्यूज ने या पोस्ट च्या मजकुराचा तपास करायला सुरु केला तेव्हा हा पोस्ट ज्या अकाउंट वरून शेअर झाला ते तपासले.
हि पोस्ट, “Republic TV” या ट्विटर हॅन्डल ने शेअर केली पण त्याचा युजरनेम “@notrepublictv” असा आहे.
या ट्विटर हॅन्डल च्या बायो मध्ये, “India’s most t̶r̶u̶t̶h̶f̶u̶l̶ hateful source of news.” असे लिहले गेले आहे.
अर्थात: भारताचे सगळ्यात जास्तं हिंसा फैलावणारे न्यूज स्रोत.
कुठल्याही न्यूज चॅनेलच्या ट्विटर प्रोफाइल समोर ‘वेरिफाइड’ (ब्लू टिक) असते, जे या ट्विटर हॅन्डल वर नव्हते, तसेच या हॅन्डल चे 529 फोल्लोवर्स आहेत आणि ते 284 लोकांना फॉलो करतात. हे अकाउंट मार्च २०२० मध्ये बनवण्यात आले होते.
हे एक ‘इम्पोस्टर अकाउंट’ आहे.
इम्पोस्टर म्हणजे, “एखादी व्यक्ती किंवा संस्था जी इतरांना फसविण्याकरिता, खासकरून फसव्या फायद्यासाठी इतर कोणीतरी असल्याचे भासवते.”
या बाबतीत या अकाउंट ने लोकांना, “Republic TV” चे ट्विटर अकाउंट असल्याचे भासवले आहे आणि लोकांची दिशाभूल करत आहे.
निष्कर्ष: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्युबॉनिक प्लेग वर कुठलेही वक्तव्य केले नाही. व्हायरल होत असलेले संदेश खोटे आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.