
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सऐप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक छायाचित्र सध्या व्हायरल होताना दिसतंय. या छायाचित्राच्या माध्यमाने लोकं देशातील आईपीएस आणि आईएएस ऑफिसर ला प्रश्न करताना दिसतायत. या व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात, तीन पोलीस अधिकारी आणि अजून एक व्यक्ती एका नेत्यासमोर झुकताना दिसतात. सोशल मीडिया यूजर या छायाचित्राला खरे मानून त्याला शेअर करत आहे.
विश्वास न्यूज ला त्यांच्या तपासात असे कळले कि २०११ मध्ये आलेल्या एका सिनेमा चा हा सीन आहे ज्याला लोक आता व्हायरल करत आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, वेद प्रकाश ने एक पोस्ट शेअर करून दावा केला आहे कि: ‘मुझे नहीं मालूम यह फोटो कहां का है पर जो यह ब्यान कर रहा है वह समझने में काफी है। बहुत से लोग यह हल्ला करते हैं कि फलां IPS हो गया फलां IAS हो गया। यह चित्र इन सब की पोल खोल रहा है।आजाद भारत पर यह कालिख है।‘
अर्थ: मला माहिती नाही हे छायाचित्र कुठले आहे पण जे यात दिसत आहे तेच पुरे आहे, बरेच लोक खूप गवगवा करतात कि हा IPS झाला किंवा तो IAS झाला, पण हे छायाचित्र त्या सगळ्यांचे पितळ उघडे पाडत आहे. स्वतंत्र भारतावर हा एक धब्बा आहे.
या छायाचित्रात, तीन पोलीस ऑफिसर एका व्यक्ती समोर हाथ जोडताना उभे दिसतात. या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट ला गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधले. आम्हाला www.koimoi.com वर ‘क्या यही सच है’ या फिल्म च्या रिव्यू मध्ये हे व्हायरल छायाचित्र मिळाले. ३० डिसेंबर २०११ रोजी प्रकाशित या रिव्यू मध्ये आम्हाला कळले कि हे छायाचित्र एका फिल्म चा सीन आहे. या सिनेमा ला वाईपी सिंह यांनी बनवले होते.
तपासादरम्यान आम्ही या सिनेमाचं नाव गूगल सर्च केला. आम्हाला imdb मधून कळलं कि ‘क्या यही सच है’ हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाचे लेखक आणि निर्देशक वाई पी सिंह आहेत.
अजून माहिती करता आम्ही, वाई पी सिंह यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी आमहाला सांगितले, व्हायरल छायाचित्र त्यांचा चित्रपट, ‘या यही सच है’ चा एक सीन आहे. त्यांनी आम्हाला त्यांच्या चित्रपटाची यूट्यूब लिंक पाठवली. आम्हाला 1:48 तासावर तोच सीन मिळाला, ज्याचे छायाचित्र आता व्हायरल होत आहे.
शेवटी आम्ही फेसबुक यूजर वेद प्रकाश यांच्या अकाउंट चा तपास केला, त्यात आम्हाला असे कळले कि यूजर चंडीगढ़ चे रहिवासी आहेत जे सध्या उदयपूर मध्ये राहतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. हा एका चित्रपटाचा सीन आहे, ज्याला खरे मानून लोकं व्हायरल करत आहेत.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.