
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, यात एक इसम निळ्या रंगाचा शर्ट घालून एका दुर्गा पंडाल मध्ये वाजत असलेल्या गाण्यांना बंद करताना दिसतो, यात एका असलम भाई यांचा उल्लेख होताना दिसतो. यूजर्स दावा करत आहेत कि मुंबई च्या मालाड मधील दुर्गा पंडाल मध्ये जबरदस्ती घुसून भजन बंद करवण्यात आले.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात असे कळले कि व्हायरल व्हिडिओ हा गम्मत म्हणून शूट करण्यात आला होता, पण नंतर हा व्हायरल होत असल्याचा समजले. या दाव्याला खरे मानून लोकांनी याला व्हायरल केले. मागच्या वर्षी देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला. संगीत बंद करावणाऱ्या माणसाचे नाव आशिष सिंह असे आहे. त्याने स्वतः सांगितले कि हा व्हिडिओ गम्मत म्हणून बनवला गेला आहे, याला खरे मानून लोकं त्याला व्हायरल करत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, शैलेंद्र आर चौधरी यांनी १९ ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ अपलोड करून लिहले:
‘दुर्गा पंडाल में घुसकर भजन बंद करवा कर बोला, “कॉलोनी में रहना है तो असलम भाई कहना है, यहां मोदी नहीं आएगा !” मलाड मुंबई की घटना ! पंडाल में अजान करवाकर उसे साम्प्रदायिक सद्भाव की मिसाल बताने वाले न्यूज़ चैनल में दम है ये खबर दिखाने की !
अर्थात: दुर्गा पंडाल मध्ये घुसून भजन बंद करवून बोलले, “कॉलनी मध्ये राहायचे असेल तर असलम भाई यांचा नाव घ्यावे लागेल, इथे मोदी नाही येणार.” हि मुंबई मालाड ची घटना आहे. पंडाल मध्ये अजान करून सांप्रदायिक सद्भाव ची मिसाल देणारे न्यूज चॅनेल आता हि बातमी दाखवण्याची हिम्मत ठेवतील का?
या व्हायरल पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला InVID टूल मध्ये अपलोड केले आणि त्यातून बरेच स्क्रिनशॉट मिळवले. त्यानंतर त्याला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून इंटरनेट वर शोधले. आम्हाला goanews.in नावाच्या वेबसाईट वर हा व्हिडिओ एका छायाचित्रासोबत मिळाले. या बातमी ला १८ ऑक्टोबर २०१९ रोजी पब्लिश केले गेले होते. बातमीत मध्ये सांगितले केले कि मालाड चे काँग्रेस चे आमदार असलं शेख यांना बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. पूर्ण बातमी इथे वाचा.
या नंतर आम्ही वेग-वेगळे कीवर्डस वापरून यासंबंधित बातम्या आणि व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला मालाड चे आमदार असलम शेख यांचा एक व्हिडिओ मिळाला. यूट्यूब वर १० ऑक्टोबर २०१९ रोजी याला अपलोड केले गेले होते. या व्हिडिओ मध्ये ते व्हायरल व्हिडिओ वर आपले मत मांडताना दिसतात. त्यांनी या व्हिडिओला त्यांनी फेक असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ त्या क्षेत्राचे वातावरण बिगडवण्यासाठी बनवण्यात आला आहे.
तपासादरम्यान आम्हाला बीबीसी हिंदी ची एक बातमी सापडली. ११ ऑक्टोबर २०१९ पब्लिश या बातमीत असलम भाई यांच्या नावावर व्हायरल व्हिडिओ ने हिंदी मध्ये तपास केला आहे. व्हिडिओ मधून आम्हाला कळले, कि व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव आशिष सिंह आहे.
सर्च च्या वेळी आशिष सिंह यांचे फेसबुक आणि ट्विटर हॅन्डल मिळाले. विश्वास न्यूज ने आशिष सिंह यांना संपर्क केले. त्यांनी सांगितले कि हा व्हिडिओ मागच्या वर्षी पण व्हायरल झाला होता. व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी बनवला गेला होता. आम्ही लोकं आप-आपसात कैजुअली बोलत होतो. व्हिडिओ ला खोटे सांगून त्याला व्हायरल पण केले गेले आहे. त्यावरून पोलिसात तक्रार पण केली गेली होती असे त्यांनी सांगितले.
आशिष ने आम्हाला जुने ट्विट्स पण दाखवले. यात पोलिसांकडे केलेली तक्राराची कॉपी आणि व्हिडिओ व्हर्जन पण जोडलेले होते. हे ट्विट १० ऑक्टोबर २०१९ रोजी केले गेले होते. व्हिडिओ व्हर्जन मध्ये व्हायरल व्हिडिओ मध्ये असलेले इसम देखील होते. दोघं पण यात स्पष्टीकरण देताना दिसतात.
या नंतर आम्ही मालवणी पोलीस स्टेशन चे सीनियर पुलिस इंस्पेक्टर जगदेव कालापड यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज सोबत बोलताना सांगितले कि व्हायरल व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे. याला घेऊन तक्रार पण केली गेली होती. नंतर आम्हाला कळले कि व्हिडिओ ला टिकटॉक स्टाईल मध्ये गम्मत मध्ये बनवला गेला होता.
शेवटी आम्ही खोटे पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला असे कळले कि यूजर शैलेंद्र आर चौधरी युपी चे रहिवासी आहे. या अकाउंट ला तीन शे पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात, ते एका विशिष्ठ राजनीतिक पार्टी सोबत जुडलेले आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. मागच्या वर्षी मुंबई मध्ये गम्मत म्हणून हा एक व्हिडिओ बनवला गेला आहे. व्हिडिओ ला खरे मानून लोकं व्हायरल करत आहेत.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.